WTC Points Table | वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानी; भारत-पाकिस्तानला धक्का, इंग्लंडचीही घसरगुंडी

WTC Points Table | वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानी; भारत-पाकिस्तानला धक्का, इंग्लंडचीही घसरगुंडी

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (world test championship) क्रमवारीत भारत आणि पाकिस्तानला जोरदार धक्का देत ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने दुसरा क्रमांक पटकावला आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मनोज कुलकर्णी

Dec 12, 2021 | 3:22 PM

नवी दिल्लीः वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (world test championship) क्रमवारीत भारत आणि पाकिस्तानला जोरदार धक्का देत ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने दुसरा क्रमांक पटकावला आहे. पहिल्या जागी श्रीलंकेचे (Sri Lanka) वर्चस्व अबाधित आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत ऑस्ट्रेलियाने फक्त एक कसोटी सामना खेळून विजय मिळवला आहे. सध्या ऑस्ट्रेलियाचे 12 गुण आहेत, तर श्रीलंकेचे 24 गुण आहेत.

इंग्लंड 7 व्या स्थानी

टक्केवारीच्या तुलनेत श्रीलंका आणि ऑस्टेलिया समान स्थानी आहेत. आता संघाची क्रमवारी ही टक्केवारीवरील गुणावरून ठरणार आहे. अॅशेस मालिकेतल्या (Ashes Series) पहिल्या कसोटीत मानहानीकारक पराभवामुळे इंग्लंडला जबर धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाने इंग्लडला (Australia vs England) गोबा मैदानावर नऊ गडी राखून धूळ चारली. त्यामुळे इंग्लडच्या क्रमवारीत चक्क 7 व्या स्थानापर्यंत घसरण झाली आहे.

भारत-पाकिस्तानचे नुकसान

ऑस्ट्रेलियाच्या विजयामुळे भारत आणि पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे. पाकिस्तानची दुसऱ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. भारताची तिसऱ्यावरून चौथ्या क्रमवारीवर घसरण झाली आहे. भारताने आतापर्यंत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपनुसार एकूण 6 कसोटी सामने खेळले आहेत. ज्यात तीन सामन्यात विजय मिळवला, एकात पराभव पत्करावा लागला, तर दोन सामने अनिर्णित राहिले. भारताचे एकूण 42 गुण आहेत. मात्र, पाकिस्तान 24 गुण असूनही तिसऱ्या स्थानी आहे. पाकिस्तानने दोन सामने जिंकले असून, एका सामन्यात पराभव पत्करला आहे.

9 संघ सहभागी

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा हा दुसरा हंगाम आहे. यात एकूण 9 संघ सहभागी आहेत. दक्षिण आफ्रिकेशिवाय सर्व संघांनी कमीत कमी एक सामना खेळला आहे. टीम इंडिया या महिन्यात दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात तीन कसोटी सामने होणार आहेत. या मालिकेमुळे दक्षिण आफ्रिकाही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत खेळणार आहे. दुसरीकडे भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर आतापर्यंत एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही.

अशी आहे क्रमवारी

– श्रीलंका – 100% – (24 गुण)
– ऑस्ट्रेलिया – 100% – (12 गुण)
– पाकिस्तान – 75% – (36 गुण)
– भारत – 58.33% – (42 गुण)
– वेस्ट इंडिज – 25% – (12 गुण)
– न्यूझिलंड – 16% – (4 गुण)
– इंग्लंड – 15% – (9 गुण)
– बाग्लांदेश – 0% – (0 गुण)

इतर बातम्याः

Sharad Pawar Birthday : शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या नेहरू सेंटरच्या कार्यक्रमात अजित पवार यांचं दाटलेल्या आवाजातल भाषण …

Katrina and Vicky Mehendi Photos | ‘मेहेंदी लगाके रखना डोली सजाके सखना’, क्यूट प्रपोज करत , विकी कॅटरिनाने शेअर केले मेहेंदीचे फोटो

Gopinath Munde: गोपीनाथ गड गावा-गावात पोहोचवण्याचा संकल्प! गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त पंकजा मुंडे यांचं वक्तव्य

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें