समोर आला स्टीव्ह स्मिथचा अनोखा फोटो, पत्नीने पोस्ट शेअर करत सांगितली वेगळीच सवय!

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) आपल्या बॅटिंगसाठी आणि अनोख्या हरकतींसाठी प्रसिद्ध आहे. (Australian Player Steve Smith Wife Dani Willis Share Funny Photo)

समोर आला स्टीव्ह स्मिथचा अनोखा फोटो, पत्नीने पोस्ट शेअर करत सांगितली वेगळीच सवय!
स्टीव्ह स्मिथ आणि त्याची पत्नी डेनी विलिस
Akshay Adhav

|

Jun 01, 2021 | 9:53 AM

मुंबई : ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) आपल्या बॅटिंगसाठी आणि अनोख्या हरकतींसाठी प्रसिद्ध आहे. खेळाबरोबरच त्याच्या नजाकतीने तो प्रेक्षकांचे मन आपल्याकडे वेधून घेण्यात यशस्वी होतो. मैदानाबाहेरही तो नेहमी शॅडो बॅटिंग करतो… आता शॅडो बॅटिंग म्हणजे काय तर हातात बॅट नसतानाही तो बॅटिंगची मजा घेतो, म्हणजेच क्रिकेटचं वेड त्याला शांत बसू देत नाही… तो एकटा असतानाही, हातात बॅट नसताना तशी ॲक्शन करुन तो फलंदाजीचा आस्वाद घेतो. त्याच्या पत्नीने त्याची हीच सवय एक इन्स्टाग्राम पोस्ट करून सगळ्या जगासमोर आणली आहे. (Australian Player Steve Smith Wife Dani Willis Share Funny Photo)

बायकोच जेव्हा पोलखोल करते….

स्टीव स्मिथची पत्नी डेनी विलिसने (Dani Willis) इन्स्टाग्राम वर एक फोटो शेअर केलेला. हा फोटो आहे स्टीव्ह स्मिथ याचा… या फोटोमध्ये स्टीव्ह स्मिथ बॅटिंग करताना दिसून येतो आहे. पण तो बॅटिंग करतोय एका रुममध्ये दाराच्या समोर उभा राहून… दारात अनेक बॅट मांडलेल्या आहेत. या फोटोमध्ये त्याच्या डोक्याला त्याने टॉवेल गुंडाळलेला आहे आणि हातात बॅट आहे… समोर बॉल वगैरे काहीही नसताना तो बॅटिंगची प्रॅक्टिस करताना दिसून येत आहे. हाच अफलातून आणि अनोख्या फोटोला डेनीने कॅप्शन दिलंय… ‘कोणती बॅट चांगली आहे याचा अंदाज तो घेतो आहे….’

View this post on Instagram

A post shared by Dani Willis (@dani_willis)

संघ सहकाऱ्यांच्या अफलातून कमेंट

या फोटोवर स्मिथच्या संघातील सहकाऱ्यांनीही कमेंट केल्या आहेत. यावर ऑस्ट्रेलियाचा मर्यादित षटकांचा संघाचा कर्णधार आरोन फिंचने हास्याची इमोजी पोस्ट केली आहे. त्याचप्रमाणे स्पोर्ट्स प्रझेंटर इर्विन हॉलंड आणि नेरोली मीडोज यांनीही या फोटोवर कमेंट केली आहे.

स्मिथ आयपीएलमध्ये दिल्लीकडून खेळतो

स्मिथ आयपीएल 2021 मध्ये दिल्ली कॅपिटलकडून खेळला. कोरोना व्हायरच्या मैदानातील एन्ट्रीने आयपीएलचं 14 वं पर्व स्थगित करण्यात आलं. यानंतर स्टीव्ह स्मिथ मायदेशी परतला आहे. स्टीव्ह स्मिथ वर्ष 2018 पर्यंत ऑस्ट्रेलियाच्या संघाचा कर्णधार होता. परंतु बॉल टेम्परिंगच्या मुद्द्यावरुन त्याला संघाची धुरा सोडावी लागली.

(Australian Player Steve Smith Wife Dani Willis Share Funny Photo)

हे ही वाचा :

त्रिनिदादमध्ये जन्म, अर्थशास्त्रात पदवी, भारतीय संघाचा ऑलराऊंडर, फिल्डिंगमध्ये याचा हात कुणीच धरला नाही!

सामन्यात विजय मिळवूनही 10 लाखांचा दंड, महिला खेळाडूला एक चूक पडली महागात!

‘बॅटिंगवर लक्ष दे, ट्विटरवर नको…’, शहाणपण शिकवणाऱ्या फॅन्सना धोनीचं संयमी उत्तर, म्हणाला…

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें