IPL च्या उरलेल्या 31 मॅचचं वेळापत्रक तयार, 29 तारखेला BCCI मोठी घोषणा करणार?

बीसीसीआयचे अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आयपीएलचे सीओओ हेमंग अमीन यांनी आयपीएल 2021 मधील उर्वरित 31 सामन्यांचे आयोजन करण्यासाठी 2 वेळापत्रक तयार केले आहेत. (BCCI Interim CEO hemang Amin CEO ready With 2 Separate Schedule IPL 2021)

IPL च्या उरलेल्या 31 मॅचचं वेळापत्रक तयार, 29 तारखेला BCCI मोठी घोषणा करणार?
आयपीएल 2021
Follow us
| Updated on: May 21, 2021 | 12:46 PM

मुंबई : बीसीसीआयचे (BCCI) अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आयपीएलचे सीओओ हेमंग अमीन (Hemang Amin) यांनी आयपीएल 2021 मधील उर्वरित 31 सामन्यांचे आयोजन करण्यासाठी 2 वेळापत्रक तयार केले आहेत. बीसीसीआय सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान स्पर्धेच्या 14 व्या हंगामातील उर्वरित 31 सामन्यांचे आयोजन करण्यास उत्सुक आहे. आयपीएल 2021 मधील 29 सामने यापूर्वीच खेळविण्यात आले आहेत. ज्यानंतर खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग झाला आणि परिणामी कोरोनाच्या संक्रमणामुळे आयपीएलचं 14 वं पर्व अनिश्चित काळासाठी पुढे ढकलावं लागलं. (BCCI Interim CEO Hemang Amin CEO ready With 2 Separate Schedule IPL 2021)

TOI चा रिपोर्ट काय सांगतो?

टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, हेमांग अमीन यांनी आयपीएल 2021 च्या उर्वरित सामन्यांसाठी 2 वेळापत्रक तयार केले आहे. पहिलं वेळापत्रक इंग्लंडला डोळ्यासमोर ठेऊन तयार केलं गेलं आहे आणि दुसरं वेळापत्रक यूएईतील (दुबई) नियोजनानुसार आखलं आहे. आता आयपीएल स्पर्धेच्या उर्वरित मॅचेसचं आयोजन कुठे करायचं याचा निर्णय भारतीय क्रिकेट बोर्डावर आहे. 29 मे रोजी होणा BCCI च्या बैठकीत याबाबत अंतिम निर्णय होऊन त्याची घोषणा केली जाईल, अशी शक्यता आहे.

बीसीसीआयच्या बैठकीत 29 तारखेला मोठी घोषणा

आयपीएलचा 13 वा मोसम यूएईमध्ये यशस्वीपणे पार पडला होता. त्यामुळे युएईमध्येच आयपीएल 2021 चा 14 हंगाम आयोजित करावा, अशी मागणी होत होती. पण बीसीसीआयने धाडसाने भारतातील 6 शहरांत स्पर्धेचं नियोजन केलं. परंतु कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे स्पर्धी निम्म्यातच तहकूब करावी लागली. उर्वरित सामन्यांसाठी 2 वेळापत्रकांसह तयार अमीन तयार आहेत. येत्या 29 मे रोजी बीसीसीआयच्या एसजीएम बैठकीच्या टेबलावर ते वेळापत्रक ठेवतील.

टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, आयपीएलच्या उर्वरित सामन्यांचं वेळापत्रक प्रोयोरिटीने अमीन बीसीसीआय पुढे मांडतील. त्यापाठीमागे तीन कारणे आहेत…

पहिलं कारण म्हणजे– इंग्लंडमध्ये स्पर्धा घेणे उचित नसू शकते. कारण सप्टेंबरमध्ये तिथे पावसाळा असतो. अशा परिस्थितीत सामने पार पडतील की नाही, याबाबत शंका आहे. दुसरीकडे सप्टेंबरमध्ये युएईचेहवामान अधिक चांगले असते. तिथे सप्टेंबरमध्ये पावसाचा धोका नाही.

दुसरं कारण म्हणजे– इंग्लंडमध्ये स्पर्धा आयोजित करणे युएईच्या तुलनेत एक महागडा व्यवहार आहे. कारण, बीसीसीआयला तेथे पाउंडमध्ये पैसे द्यावे लागतील. युएईमध्ये दिरहममध्ये कमी खर्चात स्पर्धा पार पडेल.

तिसरं कारण म्हणजे-  आयपीएल स्पर्धा यापूर्वी युएईमध्ये झाल्या आहेत आणि त्या यशस्वीही झाल्या आहेत. 13 वा हंगाम यूएईमध्ये पार पडण्याअगोदर 2014 हंगामातील काही आयपीएलचे सामनेही तिथे खेळले गेले होते.

(BCCI Interim CEO Hemang Amin CEO ready With 2 Separate Schedule IPL 2021)

हे ही वाचा :

इंग्लंडच्या एका निर्णयावर IPL 2021 चं भवितव्य अवलंबून, BCCI च्या ‘या’ प्रस्तावाला ECB साद देणार?

इंग्लंड दौऱ्यावर अर्धा डझन वेगवान गोलंदाज, पण सगळ्यात खतरनाक कोण? VVS लक्ष्मणने सांगितलं नाव!

Rahul Dravid : राहुल द्रविडकडे भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा, श्रीलंका दौरा गाजवणार?

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.