Rahul Dravid : राहुल द्रविडकडे भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा, श्रीलंका दौरा गाजवणार?

जुलै महिन्यात भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात राहुल द्रविडकडे प्रशिक्षकपदाची सूत्रे हातात हातात देण्यात आली आहे. (Rahul Dravid to coach Indian Cricket team on Sri Lanka tour)

Rahul Dravid : राहुल द्रविडकडे भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा, श्रीलंका दौरा गाजवणार?
राहुल द्रविड
Follow us
| Updated on: May 20, 2021 | 2:02 PM

मुंबई : भारतीय संघ जुलै महिन्यात होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यासाठी (India Tour Of Sri Lanka) सज्ज आहे. अशातच टीम इंडियाचा माजी दिग्गज फलंदाज राहुल द्रविडकडे (Rahul Dravid) श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती देण्यात आली आहे. जुलै महिन्यात भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात राहुल द्रविडकडे प्रशिक्षकपदाची सूत्रे हातात हातात देण्यात आली आहे. याअगोदर 2014 साली इंग्लंड दौऱ्यावर द्रविड भारतीय संघाचा बॅट्समन कोच म्हणून गेला होता. आता त्यानंतर जवळपास 7 वर्षांनी भारताच्या सिनिअर संघाबरोबर विदेशातल्या दौऱ्यावर द्रविड जाणार आहे. द्रविडकडे सध्या द्रविडकडे राष्ट्रीय क्रिकेट अॅकॅडमी (NCA) च्या अध्यक्षपदाची जबाबदारी आहे. (Rahul Dravid to coach Indian Cricket team on Sri Lanka tour)

युवा खेळाडूंना द्रविडचं मार्गदर्शन मिळणार

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात जुलै महिन्यात तीन एकदिवसीय आणि तीन ट्वेन्टी सामने खेळवले जाणार आहे. इंडियाची एक टीम विराट कोहलीच्या नेतृत्वात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप आणि इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. तर दुसऱ्या बाजूला युवा खेळाडूंची पलटण श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. याच संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी द्रविडकडे देण्यात आली आहे.

बीसीसआय अधिकाऱ्याची महत्त्वाची माहिती

भारताची एक टीम इंग्लंड दौऱ्यावर असणार आहे त्यामुळे बराचसा कोचिंग स्टाफ इंग्लंडमध्ये असणार आहे. अशावेळी नवोदित खेळाडूंना द्रविडकडून मार्गदर्शन मिळेल हे चांगलंच आहे. कारण द्रविडने यापूर्वी जवळपास सर्व ‘भारत ए’ साठी खेळलेल्या खेळाडूंबरोबर काम केले आहे. त्यामुळे द्रविडच्या मार्गदर्शनाचा युवा खेळाडूंना अतिरिक्त फायदा होईल, असं बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने एएनआयशी बोलताना सांगितलं.

द्रविडची प्रशिक्षकपदाची कारकीर्द

द्रविडने 2016 ते 2019 पर्यंत भारत-ए आणि इंडिया अंडर -19 संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे. त्याच्या प्रशिक्षणाखालीच अंडर 19 भारताच्या संघाने विश्चचषक जिंकला होता. द्रविडकडे बीसीसीआयने 2019 मध्ये राष्ट्रीय क्रिकेट अकादमी अर्थात एनसीएचे डायरेक्टर केलं.

भारताचा श्रीलंका दौरा कसा असणार

भारतीय संघ 5 जुलैला श्रीलंकेला पोहोचेल. 13, 16 आणि 19 जुलैला एकदिवसीय सामने खेळेल. तर त्यानंतर 22, 24 आणि 27 जुलैला टीम इंडिया श्रीलंकेसोबत टी 20 सामने खेळेल. दरम्यान हा दौरा संपवून टीम इंडिया 28 जुलैपर्यंत भारतात परतण्याची शक्यता आहे.

(Rahul Dravid to coach Indian Cricket team on Sri Lanka tour)

हे ही वाचा :

माजी महिला क्रिकेटरला विराट कोहलीची लाखमोलाची मदत, आईच्या उपचारासाठी 6.77 लाख रुपये दिले!

17 वर्षांची असताना भारताविरोधात पदार्पण, धोनीसारखं शार्प डोकं, टॉपलेस फोटो टाकून उडवला धुराळा!

23 रन्सवर सगळा संघ ऑलआऊट, भले भले दिग्गज गारद, 5 खेळाडू शून्यावर आऊट!, वाचा त्या मॅचबद्दल…

Non Stop LIVE Update
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....