माजी महिला क्रिकेटरला विराट कोहलीची लाखमोलाची मदत, आईच्या उपचारासाठी 6.77 लाख रुपये दिले!

माजी महिला क्रिकेटरला विराट कोहलीची लाखमोलाची मदत, आईच्या उपचारासाठी 6.77 लाख रुपये दिले!
विराट कोहली मदतीसाठी पुढे सरसावला

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) भारताची माजी महिला क्रिकेटर के एस श्रावंती नायडूला (K S Sravanthi Naidu) मदतीचा हात दिला आहे. (Virat Kohli help K S Sravanthi Naidu For medical treatment)

Akshay Adhav

|

May 20, 2021 | 12:40 PM

मुंबई :  भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) भारताची माजी महिला क्रिकेटर के एस श्रावंती नायडूला (K S Sravanthi Naidu) मदतीचा हात दिला आहे. कोहलीने तिच्या आईच्या उपचारासाठी 6 लाख 77 हजार रुपयांची मदत केली आहे. के. एस. श्रावंतीच्या आईवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र तिच्याकडे उपचारासाठी पुरेसे पैसे नाहीयत. श्रावंतीच्या आईची प्रकृती गंभीर आहे. अशावेळी विराटने श्रावंतीला मदतीचा हात दिला आहे. (Virat Kohli help Former Indian Women Cricketer K S Sravanthi Naidu For medical treatment)

के एस श्रावंतीने आई वडिलांच्या उपचारासाठी आतापर्यंत 16 लाख रुपये खर्च केले आहेत. परंतु अजूनही तिच्या आई बाबांना बरं वाटत नाहीय. श्रावंतीने बीसीसीआय आणि हैदराबाद क्रिकेट असोसिएशनकडे मदत मागितली होती. ज्यानंतर बीसीसीआय साऊथ झोनचे माजी संयोजक एन विद्या यादव यांनी ट्विट करुन श्रावंतीला मदतीचं आवाहन केलं होतं, ज्यामध्ये विराट कोहलीला देखील टॅग केलं होतं.

आर श्रीधर यांचाही श्रावंतीच्या मदतीसाठी प्रयत्न

श्रावंतीच्या आई वडिलांच्या प्रकृती अस्वास्थ्याबद्दल विराटला ट्विटच्या माध्यमातून कळालं. पण जसंही विराटच्या कानावर हा प्रसंग आला त्याने लगोलग मदतीचा हात देऊ केला आहे. 6 लाख 77 हजारांची रक्कम विराटने श्रावंतीला दिली आहे. टीम इंडियाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांनीही श्रावंतीच्या आईसाठी पैसे जमा केले होते तसंच त्यांनीही याबद्दल विराट कोहलीला माहिती दिली होती.

कोलहीच्या मदतीने एन विद्या यादव भारावल्या

श्रावंतीला लगोलग झालेली मदत पाहून एन विद्या यादव यांना हायसं वाटलं. त्या म्हणाल्या, ‘खरं सांगायचं झालं तर लगोलग झालेली मदत पाहून आश्चर्य वाटलं. भारतीय संघातल्या मोठ्या क्रिकेटपटूने असे स्वागतार्ह वाऊल उचललं. भारतीय क्रिकेट संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांची देखील मी कृतज्ञ आहे. कोहलीशीही माझं बोलणं झालं.

विराट अनुष्काची ‘केट्टो’ मोहिम

कोरोनाच्या कठीण काळात विराटने कोरोनाग्रस्तांसाठी एक विशेष मोहिम सुरु केलीय. त्या मोहिमेअंतर्गत विराट आणि अनुष्का फंड जमा करुन तो फंड कोरोनाग्रस्तांना देत आहेत. विराट अनुष्काच्या आवाहनाला लोकंही भरभरुन प्रतिसाद देत आहेत.

(Virat Kohli help Former Indian Women Cricketer K S Sravanthi Naidu For medical treatment)

हे ही वाचा :

17 वर्षांची असताना भारताविरोधात पदार्पण, धोनीसारखं शार्प डोकं, टॉपलेस फोटो टाकून उडवला धुराळा!

23 रन्सवर सगळा संघ ऑलआऊट, भले भले दिग्गज गारद, 5 खेळाडू शून्यावर आऊट!, वाचा त्या मॅचबद्दल…

‘तुझ्या सौंदर्याचं वर्णन शब्दात शक्य नाही, डेटवर येतेस का?’ चाहत्याच्या प्रश्नावर मयंती लँगरचं मजेदार उत्तर

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें