India tour of Sri Lanka 2021 | सामने कधी आणि कुठे? प्रशिक्षक कोण? राहुल द्रविडची भूमिका काय? जाणून घ्या सर्वकाही

टीम इंडिया (Team india) जुलै महिन्यात एकदिवसीय आणि टी 20 मालिकेसाठी ( Tour sri lanka) श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे.

1/5
Team India, India Tour Sri Lanka 2021, Colombo, Paras Mhambrey, Premdasa Stadium, Rahul Dravid,
टीम इंडिया जुलै महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर (India tour of Sri Lanka in July) जाणार असल्याची माहिती बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) काही दिवसांपू्र्वी दिली. टीम इंडियाची बी टीम या दौऱ्यावर जाणार आहे. याच वेळेस टीम इंडियाचा पहिला संघ हा इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. त्या संघात अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे. त्यामुळे या श्रीलंका दौऱ्यासाठी युवा खेळाडूंन खेळण्याची संधी मिळणार आहे.
2/5
Team India, India Tour Sri Lanka 2021, Colombo, Paras Mhambrey, Premdasa Stadium, Rahul Dravid,
भारतीय संघ श्रीलंका विरुद्ध प्रत्येकी 3 वनडे आणि टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारताचा ब संघ या दौऱ्यासाठी 5 जुलैपर्यंत श्रीलंकेत दाखल होण्याची शक्यता आहे.
3/5
Team India, India Tour Sri Lanka 2021, Colombo, Paras Mhambrey, Premdasa Stadium, Rahul Dravid,
या दौऱ्यामधील सर्वसामन्यांचे आयोजन हे एकाच स्टेडिममध्ये करण्यात आले आहे. हे सर्व सामन्यांचे आयोजन प्रेमदासा स्टेडियममध्ये करण्यात आले आहे. याबाबतची माहिती श्रीलंका क्रिकेटचे चेयरमन अर्जुन डी सिल्वांनी स्टार स्पोर्ट्ससोबत बोलताना दिली. "आम्ही सर्व सामने हे एकाच स्टेडियममध्ये घेण्यासाठी इच्छूक आहोत. तसेच आमच्या नियोजनानुसार प्रेमदासा स्टेडियम निश्चित आहे", असं डीसिल्वा म्हणाले.
4/5
Team India, India Tour Sri Lanka 2021, Colombo, Paras Mhambrey, Premdasa Stadium, Rahul Dravid,
स्टार स्पोर्ट्सनुसार, "या दौऱ्यासाठी पारस म्हाम्ब्रे हे टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदाची जबाबदारी सांभाळतील. टीम इंडियाचे नियमित मुख्य प्रशिक्षक हे या वेळेस इंग्लंडमध्ये असतील. तसेच राहुल द्रविडही श्रीलंका दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे". मात्र याबाबतीत अजूनही बीसीसीआयकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
5/5
Team India, India Tour Sri Lanka 2021, Colombo, Paras Mhambrey, Premdasa Stadium, Rahul Dravid,
भारतीय संघ 13, 16 आणि 19 जुलैला एकदिवीसीय सामने खेळेल. तर त्यानंतर 22, 24 आणि 27 जुलैला टीम इंडिया श्रीलंकेसोबत टी 20 सामने खेळेल. दरम्यान हा दौरा संपवून टीम इंडिया 28 जुलैपर्यंत भारतात परतण्याची शक्यता आहे.