इंग्लंड दौऱ्यावर अर्धा डझन वेगवान गोलंदाज, पण सगळ्यात खतरनाक कोण? VVS लक्ष्मणने सांगितलं नाव!

लक्ष्मणच्या म्हणण्यानुसार, मोहम्मद सिराज इंग्लंडच्या दौऱ्यावर त्याचा सर्वोत्तम परफॉर्मन्स देईल. इंग्लंडच्या भूमीत तो प्रतिस्पर्धी संघांच्या फलंदाजांना जेरीस आणेल. (VVS Laxman Indian bowler Who will most Dangerous India England tour)

इंग्लंड दौऱ्यावर अर्धा डझन वेगवान गोलंदाज, पण सगळ्यात खतरनाक कोण? VVS लक्ष्मणने सांगितलं नाव!
VVS Laxman
Follow us
| Updated on: May 20, 2021 | 3:03 PM

मुंबई : भारताच्या इंग्लंड दौऱ्याची (India Tour Of England) जोरदार तयारी सुरु आहे. खेळाडूंना मुंबईत क्वारंन्टाईन होण्याचा तारखा जवळपास आल्या आहेत. लवकरच भारत इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. भारतीय संघ आपल्या सोबत अर्धा डझनपेक्षा अधिक वेगवान गोलंदाज घेऊन चालला आहे. यामध्ये जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव यांचा समावेश आहे. या सगळ्यांमध्ये इंग्लंडच्या भूमीत कोण वरचढ ठरणार? असा प्रश्न व्हीव्हीएस लक्ष्मणला (VVS laxman) विचारण्यात आला. यावेळी त्याने मोहम्मद सिराजचं (Mohammed Siraj) नाव सांगत तो इंग्लंडच्या भूमीवर कमाल करेन, अशी भविष्यवाणी वर्तवली. (VVS Laxman Indian bowler Who will most Dangerous India England tour)

लक्ष्मणच्या म्हणण्यानुसार, “मोहम्मद सिराज इंग्लंडच्या दौऱ्यावर त्याचा सर्वोत्तम परफॉर्मन्स देईल. इंग्लंडच्या भूमीत तो प्रतिस्पर्धी संघांच्या फलंदाजांना जेरीस आणेल. सिराजने ऑस्ट्रेलियात दौऱ्यात चमक दाखवली होती. आताही तो ऑस्ट्रेलिया दौऱ्याची पुनरावृत्ती करायला सज्ज आहे”.

सिराज खतरनाक बोलर

इंग्लंड दौर्‍यावर अर्धा डझन भारतीय वेगवान गोलंदाज जातायेत. त्यापैकी मोहम्मद सिराज हा प्रतिस्पर्धी संघासाठी सर्वात धोकादायक आहे. वेगवान गोलंदाजासाठी 2 गोष्टी आवश्यक आहेत. प्रथम, त्याने बॉल स्विंग केला पाहिजे आणि दुसरे म्हणजे, जास्त ओव्हर्स टाकताना त्याने थकू नये. सिराजमध्ये या दोन्ही गोष्टी आहेत. त्याचा स्टॅमिना खूप भारी आहे. तिसऱ्या स्पेलमध्येही तो तशीच गोलंदाजी करु शकतो जशी त्याने पहिल्या दोन स्पेलमध्ये केली, अशा शब्दात त्याने सिराजचं कौतुक केलं.

सिराज हार मानत नाही

सिराज असा खेळाडू आहे जो हार मानणाऱ्यांमधला नाही. शेवटपर्यंत लढायचं हे त्याच्या स्वाभावात आहे. संधी मिळेल तसं सिराज आक्रमकता दाखवतो. सातत्य हा त्याच्या करिअरचा स्ट्राँग पाँईंट आहे, जे त्याला भविष्यात अधिक उंचीवर नेणार आहे.

भारताचा इंग्लंड दौरा

टीम इंडियाला इंग्लंडमध्ये 6 कसोटी सामने खेळायचे आहेत. याची सुरुवात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या (WTC Final 2021) अंतिम सामन्याने होणार आहे. 18 ते 23 जूनदरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात साऊथहॅम्पटन येथे हा अंतिम सामना पार पडणार आहे. त्यानंतर भारताला इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे.

(VVS Laxman Indian bowler Who will most Dangerous India England tour)

हे ही वाचा :

Rahul Dravid : राहुल द्रविडकडे भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा, श्रीलंका दौरा गाजवणार?

माजी महिला क्रिकेटरला विराट कोहलीची लाखमोलाची मदत, आईच्या उपचारासाठी 6.77 लाख रुपये दिले!

17 वर्षांची असताना भारताविरोधात पदार्पण, धोनीसारखं शार्प डोकं, टॉपलेस फोटो टाकून उडवला धुराळा!

Non Stop LIVE Update
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.