AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विराट कोहलीची इच्छा BCCI कडून पूर्ण, ‘तो’ वादग्रस्त निर्णय काढून टाकला!

आयपीएलच्या 14 व्या हंगामात मैदानी अंपायरला आता सॉफ्ट सिग्नल डिसीजनचा वापर करता येणार नाही. (BCCI removes Upmire Soft Signal From IPL 2021 Season

विराट कोहलीची इच्छा BCCI कडून पूर्ण, 'तो' वादग्रस्त निर्णय काढून टाकला!
Umpire Soft Signal
| Updated on: Mar 28, 2021 | 7:51 AM
Share

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने (BCCI) कर्णधार विराट कोहलीची (Virat kohli) इच्छा पूर्ण केली आहे. वादग्रस्त सॉफ्ट सिग्नल (Soft Signal) निर्णय हटवण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. येत्या आयपीएलच्या 14 व्या हंगामात मैदानी अंपायरला आता सॉफ्ट सिग्नल डिसीजनचा वापर करता येणार नाही. (BCCI removes Upmire Soft Signal From IPL 2021 Season)

मैदानी अंपायरकडून सॉफ्ट सिग्नल निर्णय दिला जायचा. भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी ट्वेन्टी मालिकेदरम्यान हा निर्णय वादग्रस्त ठरला. मैदानी अंपायर्सच्या चुकीमुळे भारताला याचा फटका बसला. कर्णधार विराट कोहलीने या सगळ्या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली. तसंच अनेक माजी खेळाडूंनीही या निर्णयावर टीका केली होती. आयसीसी अशा नियमांना बदलायला जरा उशीर करते परंतु बीसीसीआयने या प्रकरणी एक पाऊल पुढे टाकून आयपीएलच्या 14 व्या हंगामात मैदानी अंपायर सॉफ्ट सिग्नल डिसीजनचा वापर करणार नाहीत. किंबहुना सॉफ्ट सिग्नल निर्णय हटवण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे.

सॉफ्ट सिग्नल निर्णयाचा सूर्यकुमार शिकार

भारत आणि इंग्ल्ड यांच्यातील चौथ्या टी ट्वेन्टी सामन्यादरम्यान वाद झाला होता. सूर्यकुमारचा कॅप डीप फाईन लेगच्या फिल्डरने क्रिकेटच्या नियमांनुसार पकडला नव्हता. मैदानी अंपायर्सने सॉफ्ट सिग्नल निर्णय आऊट दिला होता. हे प्रकरण तिसऱ्या अंपायर्सच्या कोर्टात गेल्यानंतर त्यांनी सॉफ्ट सिग्नल निर्णयावर कायम राहत सूर्यकुमारला आऊट घोषित केलं.

विराट कोहलीकडून सवाल, बीसीसीआयचा महत्त्वपूर्ण निर्णय

या सगळ्या प्रकरणावर कर्णधार विराट कोहली नाराज झाला. विराटने या निर्णयाचा विरोध करत हा निर्णय बदल्याची मागणी केली. मीडिया रिपोर्टसच्या म्हणण्यानुसार आयसीसीच्या या नियमाला बदलण्याविषयी हालचाली नाहीयत परंतु बीसीसीआयने मात्र तत्परता दाखवत आयपीएल 2021 मधून हा निर्णय हटवला आहे.

आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत निर्णय

आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत बीसीसीआयने ‘मॅच प्लेइंग कंडिशन्स’ अर्थात नवीन हंगामासाठी खेळल्या जाणार्‍या सामन्यांसाठी काही नियम अटी बदलल्या आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे ‘सॉफ्ट सिग्नल’ काढून टाकण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे.

आता थर्ड अंपायर ‘शक्तीमान’

आयपीएल 2021 च्या हंगामात कोणतेही मैदानी अंपायर तिसर्‍या अंपायरकडे कोणताही निर्णय सॉफ्ट सिग्नल म्हणून निर्णय सांगू शकत नाहीत. थर्ड अंपायर त्यांच्या समजुतीनुसार आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे निर्णय घेतील, ज्यामुळे संघांना फायदा होईल अशी अपेक्षा आहे.

नो बॉल- शॉर्ट रन नियमांमध्ये बदल

आता तिसरे अंपायर मैदानातील अंपायरचा नो बॉल आणि शॉर्ट रन निर्णय बदलू शकतील. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्या नो बॉल फक्त तिसरे अंपायर पाहायचे, परंतु शॉर्ट रन्ससंबंधीचा निर्णय बदलण्याचा अधिकार थर्ड अंपायरला नाहीय.

(BCCI removes Upmire Soft Signal From IPL 2021 Season)

हे ही वाचा :

‘लक्ष्य कितीही मोठं राहू द्या, आम्ही घाबरत नाही’, तिसऱ्या वनडेआधी बेन स्टोक्सने रणशिंग फुंकलं

Ind vs Eng : तिसऱ्या सामन्यात या दोन खेळाडूंना डच्चू?, मालिका विजयासाठी विराट सेनेची नवी रणनीती!

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.