AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! पाकिस्तानाला सर्वात मोठा झटका; पाकचा संघ वर्ल्डकपमधून आऊट?

पाकिस्तानला एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. मेंस वर्ल्डकप मध्ये खेळण्याच्या पाकिस्तानच्या आशेवर पाणी फिरणार असल्याची बातमी समोर येत आहे.

मोठी बातमी! पाकिस्तानाला सर्वात मोठा झटका; पाकचा संघ वर्ल्डकपमधून आऊट?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 12, 2025 | 9:19 PM
Share

पाकिस्तानला एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. पुढील वर्षी होणाऱ्या एफआयएच मेंस वर्ल्डकप (Hockey World Cup) मध्ये खेळण्याच्या पाकिस्तानच्या आशेवर पाणी फिरू शकतं. कारण पाकिस्तानचा संघ या वर्षाच्या शेवटी होणाऱ्या ज्युनियर पुरुष वर्ल्ड कप आणि आशिया कपसाठी भारत दौऱ्यावर येणार नाहीये, एएफपीने दिलेल्या एका रिपोर्टनुसार सध्या दोन्ही देशांमध्ये तणावपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे भारतात होणाऱ्या या दोन महत्त्वाच्या स्पर्धांसाठी पाकिस्तानचा संघ भारतात न पाठवण्याचा निर्णय होऊ शकतो.

पाकिस्तानच्या क्रीडा मंत्रालयाच्या खात्रीलायक सूत्रांनी एएफपीला दिलेल्या माहितीनुसार पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष शिगेला पोहोचला होता, त्यानंतर भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला, या एअर स्ट्राईकमध्ये पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील 9 दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त झाले, ज्यामध्ये 100 पेक्षा अधिक दहशतवादी ठार झाले. भारतानं पाकिस्तानवर केलेल्या या हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती, मात्र त्यानंतर युद्धविरामाची घोषणा करण्यात आली. मात्र जरी युद्धविरामाची घोषणा करण्यात आली असली तरी देखील अजूनही दोन्ही देशांमधील संघर्ष कमी झालेला नाही. अशा परिस्थितीमध्ये आम्हाला आमच्या खेळांडूंची सुरक्षा महत्त्वाची असल्याचं पाकिस्तानच्या क्रीडा मंत्रालयानं म्हटलं आहे. त्यामुळे समोर येत असलेल्या माहितीप्रमाणे पाकिस्तान भारतात नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या ज्युनिअर वर्ल्डकप स्पर्धेत देखील सहभागी होणार नाहीये.

जागतिक हॉकी स्पर्धांमध्ये पाकिस्तानी संघाचा चांगलाच दबदबा राहिला आहे. त्यांनी आतापर्यंत तीन ऑलिंपिक सुवर्णपदकं आणि चार जागतिक विजेतेपदे जिंकली आहेत.मात्र सध्या त्यांच्या क्रमवारीमध्ये मोठी घसरण झाली आहे, सध्या ते जागतिक क्रमवारीमध्ये 15 व्या स्थानावर आहेत. अशा परिस्थितीमध्ये त्यांचा संघ जर भारतामध्ये होणाऱ्या या स्पर्धेत सहभागी न झाल्यास त्यांचा वर्ल्डकपमधून देखील पत्ता कट होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानला 2026 मध्ये नेदरलँड्स आणि बेल्जियममध्ये होणाऱ्या वर्ल्डकप स्पर्धेला मुकावे लागण्याची शक्यता आहे.  2026 ला नेदरलँड्स आणि बेल्जियममध्ये ही स्पर्धा होणार असून, या स्पर्धेत सहभागाच्या पाकिस्तानच्या आशा धुसर दिसत आहेत.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.