AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Sharma : ‘त्या’ गोष्टीमुळे रोहित शर्माचं काय होणार? माजी दिग्गज खेळाडूचा दावा काय? आता सर्वांच्या नजरा…

Rohit Sharma : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ला 19 फेब्रुवारीपासून सुरूवात झाली असून आज भारताचा सामना बांग्लादेशविरोधात होणार आहे. या स्पर्धेत उत्तम खेळ करून विजेतेपद पटाकवण्याची प्रत्येक संघाचीच इच्छा आहे, टीम इंडिया सरस खेळ करून जिंकण्यात यशस्वी होईल का ? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Rohit Sharma : 'त्या' गोष्टीमुळे रोहित शर्माचं काय होणार? माजी दिग्गज खेळाडूचा दावा काय? आता सर्वांच्या नजरा...
रोहित शर्मा
| Updated on: Feb 20, 2025 | 12:28 PM
Share

Mohammad Kaif On Rohit Sharma : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीदरम्यान चांगला खेळ करण्यात टीम इंडिया आणि रोहित शर्मा हे अपयशी ठरले. तसेच त्यापूर्वी न्युझीलंड विरुद्धच्या टेस्ट मॅच सीरिजमध्येही रोहित शर्माची बॅट फारशी तळपली नव्हती. मात्र या अपयशाने खचून न जाता इंग्लंडविरुद्धच्या कटक वनडेमध्ये शानदार शतक झळकावून रोहितने त्याच्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलं होतं. मात्र आता चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरूवात झाली असून आज भाराता सामना बांगलादेशशी होणार आहे. पण या स्पर्धेत भारतीय संघाचा परफॉर्मन्स ढेपाळला तर रोहित शर्माचं काय होईल ? असा सवाल अनेकांच्या मनात आहे.

लाखो क्रिकेटप्रेमींच्या मनात घोंगावणाऱ्या या प्रश्नाचं माजी भारतीय खेळाडूने उत्तर दिलं आहे. भारतीय संघातील माजी क्रिकेटपटून मोहम्मद कैफ यावर स्पष्ट बोलला आहे. त्यानवे यूट्यूब चॅनेलवर मन की बात सांगितली असून रोहित शर्माचे खूप कौतुक केलं आहे.

रोहित शर्माने कॅप्टन म्हणून जे मिळवलं…

रोहित शर्माने कर्णधार म्हणून जे काही मिळवले आहे ते प्रत्येकालाच शक्य नाही, असं मोहम्मद कैफ म्हणाला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 2023 च्या वनडे वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहोचला. मात्र, त्यानंतर भारतीय संघ बरेच एकदिवसीय सामने खेळला नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघाची कामगिरी निराशाजनक राहिली तर कोचिंग स्टाफला दोष दिला जाऊ शकतो, पण त्यामुळे रोहित शर्माला काहीही फरक पडणार नाही, असे तो म्हणाला. तुम्ही कसोटी फॉरमॅटमध्ये रोहित शर्माला पर्याय शोधू शकता, पण एकदिवसीय फॉरमॅटमध्ये (त्याची जागा कोणी घेण्याचा) प्रश्नच येत नाही, असही कैफने नमूद केलं.

चॅम्पियन्स ट्रॉफीत रोहित शर्मा अपयशी ठरला तर..

रोहित शर्माचे वनडे फॉरमॅटमधील आकडे हे सिद्ध करतात की तो कर्णधार म्हणून उत्कृष्ट आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जरी रोहित शर्मा फ्लॉप झाला तरी तो 2027 चा वनडे वर्ल्डकप खेळण्याच्या स्थितीत असेल, असा विस्वास मोहम्मद कैफने व्यक्त केला. सध्या रोहित शर्माचा फॉर्म उत्तम आहे. त्यामुळे या गोष्टीचा फायदा चॅम्पियन्स ट्रॉफीत भारतीय संघाला नक्कीच होईल, असा दावाही मोहम्मद कैफने केला.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.