CWG 2022, CWG 2022 Athletics : अन्नूने नीरजची कमतरता भासू दिली नाही… भालाफेकमध्ये उत्कृष्ट कामगिरी दाखवत कांस्यपदक

भारतीय महिला खेळाडू अन्नू राणीने (Annu Rani) राष्ट्रकुल स्पर्धेत यश मिळवले. अन्नूने महिलांच्या भालाफेक स्पर्धेत देशाला कांस्यपदक मिळवून दिले आहे. अन्नू राणीने 60 मीटर फेक करून कांस्यपदक जिंकले.

CWG 2022, CWG 2022 Athletics : अन्नूने नीरजची कमतरता भासू दिली नाही... भालाफेकमध्ये उत्कृष्ट कामगिरी दाखवत कांस्यपदक
अन्नूने नीरजची कमतरता जाणवू दिली नाही.Image Credit source: social
Follow us
| Updated on: Aug 07, 2022 | 5:57 PM

नवी दिल्ली : भारतीय महिला खेळाडू अन्नू राणीने (Annu Rani) रविवारी राष्ट्रकुल (CWG 2022) क्रीडा स्पर्धेत नेत्रदीपक यश मिळवले. अन्नूने महिलांच्या भालाफेक स्पर्धेत देशाला कांस्यपदक मिळवून दिले आहे. अन्नू राणीने 60 मीटर फेक करून कांस्यपदक (Bronze Medal) जिंकले. ऑस्ट्रेलियाच्या विश्वविजेत्या केल्सी ली बार्बरनं 64.43 मीटर फेक करून सुवर्णपदक जिंकले तर तिची देशबांधव मॅकेन्झी लिटिल 64.27 मीटर फेक करून द्वितीय आली. राणीच्या आधी राष्ट्रकुल चॅम्पियन काशिनाथ नायक आणि ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा यांनी पुरुषांच्या भालाफेकमध्ये अनुक्रमे कांस्य आणि सुवर्णपदक जिंकले आहे. नायकने 2010 च्या दिल्ली कॉमनवेल्थ गेम्समध्ये तर चोप्राने 2018 च्या गोल्ड कोस्टमध्ये पदके जिंकली होती.

भालाफेकमध्ये उत्कृष्ट कामगिरी दाखवत कांस्यपदक

इतिहास रचला

स्पर्धा-2022 मध्ये इतिहास रचला. अन्नूने या खेळांमध्ये महिलांच्या भालाफेकमध्ये कांस्यपदक जिंकले आणि अ‍ॅथलेटिक्समध्ये भारताच्या खात्यात आणखी एक पदक जमा केले. उत्तर प्रदेशातील मेरठ येथील अन्नूने 60 मीटर अंतरावर भालाफेक करताना तिसरा क्रमांक पटकावला. या स्पर्धेतील सुवर्ण आणि रौप्य पदके ऑस्ट्रेलियाच्या खात्यात राहिली. केल्सी ली बार्बरने सुवर्णपदक जिंकले, तर मॅकेन्झी लिटलने रौप्य पदक जिंकले. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अन्नूने चौथ्या प्रयत्नात 60 मीटर भालाफेक केली. राष्ट्रकुल स्पर्धेत पदक जिंकणारी ती भारतातील पहिली महिला खेळाडू ठरली आहे . अन्नूने यापूर्वी 2014 च्या इंचॉन आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते.

शिल्पा राणी सातव्या क्रमांकावर

ऑस्ट्रेलियाच्या केल्सीने 64.43 मीटरसह सुवर्ण तर मॅकेन्झीने 64.27 मीटरसह रौप्यपदक जिंकले. या स्पर्धेत सहभागी होणारी अन्य भारतीय महिला धावपटू शिल्पा राणी सातव्या क्रमांकावर राहिली. शिल्पाने 54.62 मीटरचा प्रयत्न केला.

16 सुवर्णांसह एकूण 47 पदके

भारताकडे आता या खेळांमध्ये 16 सुवर्णांसह एकूण 47 पदके आहेत. त्याने 12 रौप्य आणि 19 कांस्यपदकेही जिंकली आहेत. ऑस्ट्रेलिया पदक-तालिकेत अव्वल स्थानावर आहे, त्याने आतापर्यंत 61 सुवर्णपदके जिंकली आहेत.

Non Stop LIVE Update
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.