AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अहमदाबादावरून लंडनला जाणाऱ्या विमान दुर्घटनेत युवा क्रिकेटपटूचा मृत्यू, पाच दिवसानंतर सत्य आलं समोर

अहमदाबाद एअर इंडिया विमान दुर्घटनेत प्रवास करणाऱ्या 241 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये एका युवा क्रिकेटपटूचा समावेश होता. देशांतर्गत क्रिकेटमध्ये नावलौकीक मिळवलेल्या खेळाडूच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.

अहमदाबादावरून लंडनला जाणाऱ्या विमान दुर्घटनेत युवा क्रिकेटपटूचा मृत्यू, पाच दिवसानंतर सत्य आलं समोर
अहमदाबाद विमान दुर्घटनाImage Credit source: PTI
| Updated on: Jun 17, 2025 | 7:52 PM
Share

अहमदाबाद विमान दुर्घटनेचं दृष्य पाच दिवस झाले तरी डोळ्यासमोर जात आहे. विमानातील प्रवासी आणि विमान पडलं त्या ठिकाणच्या लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. एअर इंडियाचं विमान 12 जून रोजी बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेल बिल्डिंगवर क्रॅश झालं. विमानाने अहमदाबादहून लंडनच्या दिशेने उड्डाण घेतलं होतं. पण अवघ्या काही सेकंदात हा अपघात घडला. या अपघातात एका युवा क्रिकेटपटूचंही निधन झालं आहे. एअर इंडिया विमान अपघातात 23 वर्षीय युवा क्रिकेटपटू दृढ पटेल याचाही समावेश आहे. या बातमीमुळे क्रीडाविश्वात शोककळा पसरली आहे. दृढ पटे इंग्लंडच्या लीड्स मोडर्नियन्स क्रिकेट क्लबचा अष्टपैलू खेळाडू होता. त्याने हर्ड्सफील्ड युनिवर्सिटीतून आर्टिफिशियल इंटेलिजंसमध्ये मास्टर्स केलं होतं. तसेच क्रिकेट मैदानात त्याच्या खेळीने सर्वांचं मन जिंकलं होतं. भविष्यात मोठा क्रिकेटपटू होईल असं सर्वांनाच वाटत होते. पण विमान अपघातात होत्याचं नव्हतं झालं.

मागच्या पर्वात दृढ पटेलने इंग्लंडच्या लीड्स मोडर्नियन्स क्रिकेट क्लबसाठी 312 धावा केल्या होत्या. तसेच 29 विकेट घेतल्या होत्या. त्यामुळे क्लबचा महत्त्वाचा खेळाडू होता. आक्रमक फलंदाजी आणि गोलंदाजीतही फलंदाजांना चकवण्यात प्रावीण्य असल्याने एक ओळख निर्माण केली होती. पण अवघ्या 23 व्या वर्षी त्याला या जगाचा निरोप घ्यावा लागला आहे. दृढ पटेल 2024 मध्ये लीड्स मॉडर्नियन्ससाठी विदेशी खेळाडू म्हणून खेळला होता. त्याच्या अशा जाण्याने क्लबला मोठा धक्का बसला आहे.

दृढ पटेलचं क्रिकेट आणि तंत्रज्ञानाच्या जगात नावलौकिक मिळवण्याचं स्वप्न होतं. त्याने अभ्यास आणि खेळ यांचा योग्य समतोल राखला होता. त्यामुळे त्याच्या खेळीचं आणि अभ्यासाचं सर्वच कौतुक करत होते. दृढ पटेल हा मूळचा गुजरातचा आहे. दरम्यान, विमान अपघातात एकमेव प्रवासी वाचला. त्याचं नाव विश्वास कुमार रमेश आहे. 40 वर्षीय विश्वास हा ब्रिटीश नागरीक आहे. तसेच तो एअर इंडियाच्या प्लाइट क्रमांक एआय171च्या 11ए सीटवर बसला होता. या अफघातानंतर हातात मोबाईल घेऊन बाहेर निघताना दिसला. त्याला स्थानिक लोकांनी रुग्णालयात दाखल केलं.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.