AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी अशी असेल प्लेइंग 11! आकाश चोप्रा म्हणाला…

भारत आणि इंग्लंड कसोटी मालिका सर्वार्थाने महत्त्वाची आहे. या मालिकेतून टीम इंडियाच्या भवितव्याचा अंदाज बांधला जाणार आहे. असं असताना अनुभवी फलंदाज नसताना शुबमन गिल कोणत्या 11 खेळाडूंसह मैदानात उतरणार याबाबत खलबतं सुरु आहेत. असं असताना माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने आपले फासे टाकले आहेत.

IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी अशी असेल प्लेइंग 11! आकाश चोप्रा म्हणाला...
IND vs ENG : पहिल्या कसोटीसाठी प्लेइंग 11 मध्ये या खेळाडूंना मिळणार संधी, आकाश चोप्राने सांगितलं कारणImage Credit source: Darrian Traynor/Getty Images
| Updated on: Jun 17, 2025 | 5:23 PM
Share

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका 20 जूनपासून सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना लीड्सवर होणार आहे. या सामन्यात शुबमन गिलच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे. कारण विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी निवृत्ती घेतल्यानंतर अनुभवी खेळाडूंची उणीव भासणार आहे. त्यामुळे शुबमन गिल पहिल्याच सामन्यात प्लेइंग 11 मध्ये कोणत्या खेळाडूंना स्थान देतो याची उत्सुकता आहे. असं असताना पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने टीम इंडियाच्या प्लेइंग 11 बाबत आपले फासे टाकले आहेत. आकाश चोप्राने प्लेइंग 11 जाहीर रकता गोलंदाजी आणि फलंदाजीबाबत समतोल राखला आहे. तसेच प्लेइंग 11 मध्ये शार्दुल ठाकुर स्थान मिळावं अशी शिफारसही केली आहे. शार्दुल ठाकुरला आठव्या स्थानावर खेळण्याची संधी मिळावी असं त्याने सांगितलं. दरम्यान, इंट्रा स्क्वॉड सामन्यात शार्दुल ठाकुरने शतकी खेळी केली आहे. शार्दुल ठाकुरने जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि अर्शदीप सिंग यांच्याविरुद्ध दमदार फलंदाजी केली आहे. त्यामुळे त्याला संघात स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे. त्याची इंग्लंडमधील कामगिरीही चांगली आहे.

आकाश चोप्राने प्लेइंग 11 निवडताना सांगितलं की…

आकाश चोप्राने अधिकृत युट्यूब चॅनेलवर एक व्हिडीओ शेअर करत सांगितलं की, ‘जर करुण नायर सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करत असेल तर सातव्या क्रमांकावर जडेजाला ठेवा. यावर कोणतीची चर्चा होऊ शकत नाही. त्याला सातव्या क्रमांकावर ठेवायचं की नाही. त्याने पाचव्या क्रमांकावर इंग्लंडमध्ये फलंदाजी केली आहे आणि धावाही केल्या आहेत. जडेजाला सातव्या क्रमांकावर फलंदाजी दिली पाहीजे. आठव्या क्रमांकावर शार्दुल ठाकुरला ठेवू शकता. कारण इंट्रा स्क्वॉड सामन्यात त्याने चांगली कामगिरी केली आहे. जर शार्दुल ठाकुर आठव्या क्रमांकावर खेळत असेल तर टीम इंडियासाठी एका दिवसात 17 ते 18 षटकं टाकू शकतो.’

आकाश चोप्राने संघ निवडताना सलामीला यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल यांची निवड केली आहे. तिसर्‍या क्रमांकावर साई सुदर्शन तर विराट कोहलीच्या चौथ्या क्रमांकाच्या जागेसाठी शुबमन गिलला संधी दिली आहे. विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत पाचव्या क्रमांकासाठी, तर फॉर्मात असलेला करूण नायर सहाव्या क्रमांकावर, रवींद्र जडेजा सातव्या, शार्दुल ठाकुर आठव्या, जसप्रीत बुमराह नवव्या, मोहम्मद सिराज दहाव्या आणि प्रसिद्ध कृष्णाला 11व्या स्थानासाठी पसंती दिली आहे. तीन वेगवान गोलंदाजांसह शार्दुल ठाकुर चौथा पर्याय असेल. तर फिरकीची जबाबदारी रवींद्र जडेजाच्या खांद्यावर असेल.

Follow Us
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
रुपाली चाकणकर यांच्या विधानामुळे संताप, नेमकं काय म्हणाल्या?
Video : सावित्रीबाई फुलेंनीही 200 वर्षांपूर्वी…. रुपाली चाकणकर यांच्या विधानामुळे संताप, नेमकं काय म्हणाल्या?