AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गौतम गंभीर की आशीष नेहरा! बेस्ट कोच कोण? शुबमन गिल म्हणाला..

इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाच्या कर्णधार शुबमन गिलने आशिष नेहरा आणि गौतम गंभीर यांच्या कोचिंगबाबत मोठं विधान केलं आहे. आयपीएलमध्ये आशिष नेहरा, तर टीम इंडियात गौतम गंभीरच्या प्रशिक्षणाखाली शुबमन गिल खेळत आहे. अशा स्थितीत त्याने या दोन्ही कोचमधील फरक स्पष्ट केला.

गौतम गंभीर की आशीष नेहरा! बेस्ट कोच कोण? शुबमन गिल म्हणाला..
गौतम गंभीर की आशीष नेहरा! बेस्ट कोच कोण? शुबमन गिल म्हणाला...Image Credit source: PTI
| Updated on: Jun 17, 2025 | 4:27 PM
Share

शुबमन गिलच्या खांद्यावर कसोटी संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वात टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या दौऱ्यात शुबमन गिलच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे. अशा स्थितीत शुबमन गिलच्या विचार करण्याच्या पद्धतीकडे लक्ष लागून आहे. असं असताना माजी क्रिकेटपटू दिनेश कार्तिक याने एका मुलाखतीत शुबमन गिलला बुचकळ्यात टाकणारा प्रश्न विचारला. यात गौतम गंभीर की आशीष नेहरा? कोण बेस्ट कोच आहे? कारण आयपीएल स्पर्धेत गुजरात टायटन्सचं शुबमन गिल आशिष नेहराच्या प्रशिक्षणासाठी नेतृत्व पार पाडतो. तर कसोटी क्रिकेटमध्ये गौतम गंभीरच्या प्रशिक्षणाखाली पहिल्या मालिकेला सामोरं जाणार आहे. त्यामुळे हा प्रश्न शुबमन गिलसाठी गुगली होता. पण शुबमन गिलने या प्रश्नाला सपक उत्तर देत दोन्ही दिग्गजांचा कोचिंगमधील फरक स्पष्ट केला.

शुबमन गिलने दिनेश कार्तिकला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, आशिष नेहरा हा एक अतिशय व्यावहारिक प्रशिक्षक आहे आणि हे त्याच्या प्रशिक्षणातून दिसून येते. त्याला जे काही सांगायचं ते तो सर्वांसमोर थेट बोलतो. दुसरीकडे, गौतम गंभीरबाबत सांगायचं तर खूप लक्ष केंद्रीत करणारा व्यक्ती आहे. त्याला जो काही संदेश द्यायता तो सर्व खेळाडूंना सांगतो. त्याची मानसिकचा आशिष नेहरापेक्षा खूप वेगळी आहे. पण शेवटी प्रत्येकाचं ध्येय एकच आहे. फक्त मार्ग वेगळे आहेत. दरम्यान, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने इंग्लंडविरुद्धची मालिका महत्त्वाची आहे. या मालिकेतील कामगिरीवर पुढचा प्रवास ठरणार आहे. कारण विजयी टक्केवारी कायम ठेवायची तर या मालिकेत चांगली कामगिरी करावीच लागणार आहे.

इंग्लंड विरूद्धच्या मालिकेबाबत शुबमन गिलने मन मोकळं केलं. त्याने या मालिकेआधी सांगितलं की, ‘आमच्या फलंदाजी क्रमात आणि त्यांच्या गोलंदाजी क्रमात अनुभवाची उणीव आहे. म्हणून मी सांगेन की हे संतुलित आहे. आम्ही सर्व खेळाडू प्रत्येक सामन्यात आणि प्रत्येक सत्रात चांगली कामगिरी करू इच्छितो. आम्ही कोणत्याही एका गोलंदाजाकडे पाहत नाही. परिस्थिती समजून घेत सर्वकाही पुढचं ठरवलं जाईल.’

Follow Us
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
रुपाली चाकणकर यांच्या विधानामुळे संताप, नेमकं काय म्हणाल्या?
Video : सावित्रीबाई फुलेंनीही 200 वर्षांपूर्वी…. रुपाली चाकणकर यांच्या विधानामुळे संताप, नेमकं काय म्हणाल्या?