Team India : टीम इंडियाच्या 4 खेळाडूंमुळे गौतम गंभीरला टेन्शन, हेड कोच काय निर्णय घेणार?
Team India : इंग्लंड विरूद्धच्या कसोटी मालिकेआधी टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीर याचं 4 खेळाडूंनी टेन्शन वाढवलं आहे. ते 4 खेळाडू नक्की कोण? तसेच या 4 खेळाडूंनी कोणत्या बाबतीत गंभीरचं टेन्शन वाढवलंय? जाणून घ्या.

इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीर याचं टेन्शन वाढलं आहे. टीम इंडियाच्या 4 खेळाडूंमुळे गंभीरचं टेन्शन वाढलं आहे. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला 20 जूनपासून सुरुवात होणार आहे. इंग्लंडने या पहिल्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हन जाहीर करत आपण सज्ज असल्याचं जाहीर केलं आहे. मात्र टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनचा तिढा सुटता सुटत नाहीय. प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण खेळणार आणि कोण नाही? हे कॅप्टन शुबमन गिल आणि कोच गंभीर यांच्यात ठरलं असेल. मात्र 2 जागांसाठी 4 खेळाडूंमध्ये चांगलीच चुरस आहे. टीम इंडियाकडे अनेक पर्याय असल्याने कोणाला घ्यायचं आणि कुणाला बाहेर करायचं? हे ठरवणं गंभीरसमोर सर्वात मोठं आव्हान आहे. त्यामुळे गंभीरच्या डोक्याला ताप झालाय, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. प्लेइंग ईलेव्हनमध्ये 1 जागा पेस ऑलराउंडर तर दुसरी जागा ही स्पिन ऑलराउंडरची आहे.
शार्दूल ठाकुर विरुद्ध नितीश कुमार रेड्डी
प्लेइंग ईलेव्हनमधील पेस ऑलराउंडर या 1 जागेसाठी शार्दूल ठाकुर आणि नितीश कुमार रेड्डी यांच्यात चुरस आहे. तर स्पिन ऑलराउंडर या 1 जागेसाठी रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यात चढाओढ आहे. हे चारही खेळाडू सरस आहेत. त्यामुळे कुणाला संधी द्यायची? हा प्रश्न आहे.
टीम इंडियाचे बॉलिंग कोच मॉर्ने मोर्कल यांच्यानुसार, पेस ऑलराउंडर म्हणून कुणाला संधी द्यायची हे इंट्रा स्क्वॉड मॅचनंतरच निश्चित होईल. इंट्रा स्क्वॉड मॅच 13 ते 16 जून दरम्यान होणार आहे. मात्र या 4 खेळांडूपैकी इंग्लंडमधील परिस्थितीसह कोण एकरुप होऊन खेळतो? याकडे कोचिंग स्टाफचं विशेष लक्ष असणार आहे.
शार्दूल ठाकुर याने आतापर्यंत इंग्लंडमध्ये 3 कसोटी सामने खेळले आहेत. शार्दूलने या 3 सामन्यांमध्ये 122 धावा केल्या आहेत. शार्दूलची 60 ही इंग्लंडमधील सर्वोच्च धावसंख्या राहिली आहे. तसेच शार्दूलने 8 विकेट्सही घेतल्या आहेत. नितीश कुमार रेड्डी याच्याकडे इंग्लंडमध्ये खेळण्याचा अनुभव नाही. मात्र नितीशने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शतक करुन आपली छाप सोडली होती. नितीशने आतापर्यंतचे एकूण 5 कसोटी सामने ऑस्ट्रेलियातच खेळले आहेत. नितीशने या दरम्यान 1 शतकासह 298 धावा केल्या आहेत. तसेच 5 विकेट्स ही मिळवल्या आहेत.
रवींद्र जडेजा विरुद्ध वॉशिंग्टन सुंदर
स्पिन ऑलराउंडर म्हणून खेळण्यासाठी रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यात चुरस आहेत. जडेजाने इंग्लंडमध्ये 12 कसोटी सामने खेळले आहेत. जडेजाने या 12 सामन्यांमध्ये 642 धावा करण्यासह 27 विकेट्स घेतल्या आहेत. तर दुसर्या बाजूला वॉशिंग्टनकडे इंग्लंड विरुद्ध खेळण्याचा अनुभव आहे मात्र इंग्लंडमध्ये खेळण्याचा नाही. वॉशिंग्टने त्याच्या कसोटी कारकीर्दीत 9 कसोटी सामने खेळले आहेत. वॉशिंग्टनने या 9 सामन्यांमध्ये 42.54 च्या सरासरीने 468 धावा केल्या आहेत. तर 25 विकेट्स मिळवल्या आहेत.
कुणाला संधी मिळणार?
आता या चौघांपैकी कुणाला संधी द्यायची आणि कुणाला नाही? हे कॅप्टन आणि कोचची जोडी निश्चित करणार आहेत. शार्दूल आणि जडेजा दोघेही नितीश आणि वॉशिंग्टनच्या तुलनेत अनुभवी आहेत. तसेच दोघांना इंग्लंडमध्ये खेळण्याचा अनुभव आहे. त्यामुळे आता अनुभवाला प्राधान्य द्यायचं की युवा खेळाडूंची निवड करायची? हा मोठा प्रश्न गिल-गंभीर जोडीसमोर असणार आहे.