AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यात मोडला 45 वर्ष जुना विक्रम, एका दिवसात पडल्या 17 विकेट

भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी एकूण 17 विकेट पडल्या. चेपॉकमध्ये पहिल्यांदाच एका दिवसात इतक्या विकेट पडल्या आहेत. यासोबतच या मैदानावर बनवलेला 45 वर्ष जुना विक्रमही मोडीत निघाला आहे.

भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यात मोडला 45 वर्ष जुना विक्रम, एका दिवसात पडल्या 17 विकेट
| Updated on: Sep 20, 2024 | 11:08 PM
Share

भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना चेन्नईत सुरु आहे. सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या दोन सत्रात बांगलादेशने भारताला बॅकफूटवर ढकलले होते, मात्र त्यानंतर अश्विन आणि जडेजाने इनिंग सांभाळली. त्यानंतर भारताने दुसऱ्या दिवसाच्या अखेरपर्यंत सामन्यावर आपली पकड मजबूत केली. दुसऱ्या दिवशी अनेक विकेट्स पडल्या आणि त्यामुळे भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्याची रेकॉर्ड बुकमध्ये नोंद झाली आहे.

पहिल्या डावात रविचंद्रन अश्विन (113 धावा) ने शतक ठोकले. तर रवींद्र जडेजा 86 धावा केल्या. या 199 धावांच्या भागीदारीच्या जोरावर भारतीय संघ 376 धावांवर ऑलआऊट झाला. अश्विनने 133 चेंडूत 11 चौकार आणि 2 षटकार ठोकले, तर जडेजाने 124 चेंडूत 86 धावांच्या खेळीत 10 चौकार आणि 2 षटकार ठोकले. या दोघांनी सातव्या विकेटसाठी 240 चेंडूत 199 धावांची आक्रमक भागीदारी केली. सहा बाद 339 धावांवरून दिवसाची सुरुवात करणाऱ्या भारताने केवळ 37 धावा जोडल्यानंतर शेवटच्या चार विकेट गमावल्या.

भारताच्या पहिल्या डावातील 376 धावांना प्रत्युत्तर देताना बांगलादेशचा पहिला डाव अवघ्या 149 धावांवर आटोपला. भारताने पहिल्या डावात 227 धावांची मोठी धावसंख्या गाठली. यानंतर भारताने दुसऱ्या डावात तीन गडी गमावून 81 धावा केल्या. दुसऱ्या दिवशी एकूण 17 विकेट पडल्या. भारताने 7 गडी गमावले आणि बांगलादेशने 10 विकेट गमावल्या. यासह दोन्ही संघांनी मिळून 45 वर्षांनंतर चेन्नईच्या या मैदानावर मोठा विक्रम मोडीत काढला. चेपॉक येथील कसोटीत पहिल्यांदाच एका दिवसात १७ विकेट पडल्या आहेत. यापूर्वी 1979 मध्ये भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या सामन्यात 15 विकेट पडल्या होत्या.

दिवसाच्या सुरुवातीच्या सत्रात बांगलादेशने पहिल्या डावात २६ धावांत तीन विकेट गमावल्या. संघाला मधल्या फळीतील फलंदाजांकडून प्रभावी खेळीची अपेक्षा होती, परंतु त्यांनी उत्साह दाखवला नाही आणि दुसऱ्या सत्रात 27 षटकांच्या खेळात 85 धावा जोडताना पाच विकेट गमावल्या.

लिटन दास (42 चेंडूत 22 धावा) आणि शाकिब अल हसन (64 चेंडूत 32 धावा) यांनी संघाची सर्वात मोठी निराशा केली. या दोन्ही अनुभवी फलंदाजांनी क्रीजवर वेळ घालवल्यानंतर आक्रमक फटके खेळून विकेट गमावल्या. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 94 चेंडूत 51 धावांची भागीदारी केली. दुसऱ्या सत्रात बांगलादेशने कर्णधार नझमुल हसन शांतो (२०) आणि मुशफिकुर रहीम (आठ) यांचे अनुक्रमे मोहम्मद सिराज (३० धावांत एक विकेट) आणि बुमराह यांच्या विकेट्स गमावल्या.

चेपॉकमध्ये कसोटीत एका दिवसात सर्वाधिक विकेट्स

17 – IND वि BAN, 2024 (दुसरा दिवस)

15 – IND vs WI, 1979 (तिसरा दिवस)

15 – IND वि ENG, 2021 (दिवस 4, पहिली कसोटी)

15 – IND वि ENG, 2021 (दिवस 2, दुसरी कसोटी)

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.