‘आराम करायचा असेल तर शुबमन गिलने आयपीएल सोडावं’, कर्णधारपदही सोडण्याचा दिला सल्ला
दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्याच सामन्यात शुबमन गिलला दुखापत झाली आणि सर्व समीकरणच बदललं. पहिल्याच सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं. आता त्याच्या दुखापतीवर सल्ले मिळण्यास सुरुवात झाली आहे. आकाश चोप्राने तर त्याला आयपीएल स्पर्धेत गुजरातचं कर्णधारपद सोडण्याचा सल्ला दिलाय.

दक्षिण अफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 अंतिम फेरीच्या दृष्टीने किती महत्त्वाची आहे, हे क्रीडाप्रेमींना माहिती आहे. त्यात पहिलाच सामना गमावल्याने विजयी टक्केवारीवर परिणाम झाला आहे. आता कसोटी मालिका गमवण्याची वेळ आली आहे. असं असताना शुबमन गिल दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार की नाही याबाबत स्पष्टता नाही. त्यात त्याच्या मानेच्या दुखापतीमुळे वर्कलोड मॅनेजमेंटच्या चर्चा होऊ लागल्या आहेत. असं असताना आकाश चोप्राने या चर्चांवर भाष्य करताना म्हणाला की, गौतम गंभीरतही म्हणणं आहे की खेळाडूंना वर्कलोड मॅनेजमेंट हवं असेल तर पहिल्यांदा आयपीएस सोडलं पाहीजे. आकाश चोप्राने भारत दक्षिण अफ्रिका दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी सांगितलं की, ‘मी गौतम गंभीरला वर्कलोड मॅनेजमेंटबाबत प्रश्न विचारला तेव्हा त्याने स्पष्ट सांगितलं की तुम्हाला वर्कलोड मॅनेजमेंट करायचं असेल तर आयपीएल सोडा.’
आकाश चोप्राने शुबमन गिलला एक वैयक्तिक सल्लाही दिला. त्याने सांगितलं की, शुबमन गिलने आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स कर्णधारपद सोडायला हवं. कारण अतिरिक्त जबाबदारीमुळे दबाव वाढतो. फलंदाज म्हणून खेळल्यास तुम्ही मानसिकरित्या ताजेतवाने राहता. आकाश चोप्रा म्हणाला की, ‘जर तुम्हाला वाटतं की आयपीएल संघाचं कर्णधारपद जास्त दबाव टाकत आहे तर कर्णधारपद सोडावं. एक फलंदाज म्हणून चांगल्या प्रकारे खेळू शकतो.’ विराट कोहलीनेही याच पद्धतीने तिन्ही फॉर्मेट खेळले आणि आयपीएलमध्येही धावा केल्या.
आकाश चोप्रा म्हणाला की, ‘विराट कोहली गेली अनेक वर्षे असं करत आहे. तिन्ही फॉर्मेट खेळले. कधी ब्रेक घेतला नाही. मी गौतमच्या मताशी सहमत आहे. जेव्हा तुम्ही भारतासाठी खेळता तेव्हा भारतासाठीच खेळता. जर तुम्हाला ब्रेक हवा असेल तर काही सामन्यांसाठी किंवा आयपीएलमध्ये कर्णधारपदावरून ब्रेक घेऊन भार हलका करू शकता.’ दरम्यान, शुबमन गिल दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळणं जवळपास कठीण आहे. इतकंच काय तर वनडे मालिकेलाही मुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे संघाची धुरा ऋषभ पंतच्या खांद्यावर येऊ शकते.
