ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात अभिषेक शर्मा फेल, बाद झाल्यानंतर थेट गंभीरने बोलवलं
टी20 क्रिकेटमध्ये दहशत असलेल्या अभिषेक शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात काही खास करू शकला नाही. अभिषेक फक्त 19 धावा करून बाद झाला. तंबूत परतल्यानंतर गौतम गंभीरने त्याला जवळ बोलावलं आणि काहीतरी सांगितलं. काय ते जाणून घेऊयात

ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या टी20 मालिकेतील पहिला सामना पावासामुळे रद्द झाला. भारताने 9.4 षटकं खेळत एक गडी गमवून 97 धावा केल्या होत्या. मात्र त्यानंतर पावसाने हा खेळ पुढे होऊ दिला नाही. पण या सामन्यात एकमेव विकेट गेली ती अभिषेक शर्माची.. त्याने चार चौकार मारत आक्रमक सुरुवात करून दिली. पण त्याच्यासाठी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी खास रणनिती आखली होती. त्यांच्या प्लानमध्ये अभिषेक शर्मा पुरता फसला. अभिषेक शर्मा 14 चेंडूत 19 धावा करून बाद झाला. खरं तर अभिषेक शर्मा 200हून अधिकच्या स्ट्राईक रेटने खेळतो. पण या सामन्यात त्याचा स्ट्राईक रेट हा 140 पेक्षा कमी होता. खरं तर या सामन्यात अभिषेक शर्माने 8 चेंडूवर एकही धाव काढली नाही. अभिषेक शर्मा बाद झाल्यानंतर तंबूत परतला तेव्हा गौतम गंभीर तयारच बसला होता. त्याने अभिषेक शर्माला बोलवलं आणि चर्चा सुरु केली. त्याचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अभिषेक शर्माची कमकुवत बाजूवर कांगारुंचा प्रहार
अभिषेक शर्मा बाद झाल्यानंतर गौतम गंभीर व्हिडीओ विश्लेषकाच्या बाजूला जाऊन बसला. त्यानंतर अभिषेक शर्मा कसा बाद झाला याचं निरीक्षण केलं. त्यानंतर त्याच्याकडून काय चूक झाली याचं आकलन गंभीरने केलं. त्यानंतर गंभीरने त्याला जवळ बोलावलं आणि काय चुकलं ते समजावून सांगितलं. अभिषेक शर्मा नाथन एलिसच्या स्लोअर चेंडूवर फसला. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी त्याला सलग आखुड टप्प्याची गोलंदाजी केली. तसेच फटका मारता येणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली. त्यानंतर नाथन एलिसने अचानक पुढ्यात स्लोअर बॉल टाकला. त्यावर फटका मारताना अभिषेक चुकला आणि चेंडू वर चढला. मिड ऑफला असलेल्या टिम डेविडने त्याचा झेल पकडताना चूक केली नाही.
Abhishek Sharma was seen having a chat with Gautam Gambhir after today’s dismissal.
Can you guess the conversation?#AUSvsIND pic.twitter.com/a0zAAI7hTw
— CricTracker (@Cricketracker) October 29, 2025
अभिषेक शर्माला ऑस्ट्रेलियात आणि ते देखील ऑस्ट्रेलियाविरुद्ध आक्रमक खेळी करणं वाटतं तितकं सोपं नाही. कारण कांगारू चिवट खेळीसाठी ओळखले जातात. त्यात ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्ट्या या उसळी घेणाऱ्या आहेत. त्यामुळे भारतात करतो तशीच फलंदाजी करणं सोपं नाही. त्यामुळे त्याला ऑस्ट्रेलियात फलंदाजीची स्टाईल बदलावी लागू शकते. अभिषेक शर्मा दुसऱ्या टी20 सामन्यात काय कामगिरी करतो याकडे लक्ष असणार आहे. दुसऱ्या वनडे सामन्यात आक्रमक खेळी करण्यात यशस्वी झाला तर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची रणनिती पूर्णपणे फेल जाईल.
