AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AFG vs SL : अँजेलो मॅथ्यूजने चौकार मारला खरा पण एक चूक नडली, थेट मैदानातून पडावं लागलं बाहेर Watch Video

भारत अफगाणिस्तान यांच्यात एकमेव कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात श्रीलंकेकडे मजबूत आघाडी आहे. पहिल्या डावात २४१ धावांची आघाडी घेतली आहे. यामुळे अफगाणिस्तानचा संघ बॅकफूटवर आहे. पण या सामन्यात एक विचित्र प्रकार पाहायला मिळाला. अँजेलो मॅथ्यूजला त्याच्या चुकीचा फटका बसला.

AFG vs SL : अँजेलो मॅथ्यूजने चौकार मारला खरा पण एक चूक नडली, थेट मैदानातून पडावं लागलं बाहेर Watch Video
Video: टाईम आऊटनंतर अँजेलो मॅथ्यून पुन्हा नशिब निघालं फुटकं, चौकार मारूनही स्वत:च्या चुकीमुळे गमवावी लागली विकेटImage Credit source: Twitter
| Updated on: Feb 04, 2024 | 3:08 PM
Share

मुंबई : श्रीलंका अफगाणिस्तान यांच्यात कसोटी सामना सुरु आहे. पहिल्या डावात श्रीलंकेने सर्वबाद ४३९ धावा करत २४१ धावांची आघाडी घेतली. त्यामुळे अफगाणिस्तानला ही आघाडी मोडीत काढून विजयासाठी धावा देण्याचं आव्हान आहे. असं सर्व असताना या सामन्यात अँजेलो मॅथ्यूज पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धेत अँजेलो मॅथ्यूज टाईम आऊटमुळे चर्चेत आला होता. बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात उशिरा मैदानात आल्याने विकेट गमवावी लागली होती. त्यानंतर बराच वादंग झाला होता. आता मॅथ्यूजची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे.कारण मॅथ्यूज या सामन्यात विचित्र पद्धतीने बाद झाला. त्यामुळे निराश होत त्याला जमिनीवर बसण्याची वेळ आली. कोलंबोत दुसऱ्या दिवशीचा खेळ संपण्यासाठी अवघ्या १७ चेंडूचा खेळ बाकी होता आणि तेव्हाच हा प्रकार घडला.

अँजोलो मॅथ्यूज स्ट्राईकवर असताना अफगाणिस्तानकडून कैश मोहम्मद षटक टाकत होता. षटकाचा दुसरा चेंडू खेळपट्टीच्या एकदम बाहेर जात होता. त्यामुळे या संधीच्या फायदा घेण्यासाठी मॅथ्यूजने जोरदार प्रहार केला. चेंडू सीमारेषेवर जाऊन आदळला. चौकार मिळणार असं वाटत असताना मॅथ्यूज मैदानावर हताश होऊन बसला होता. कारण फटका मारताना मॅथ्यूजची बॅट स्टम्पवर आदळली होती. मॅथ्यूज १४१ धावांवर हिट विकेट झाला.

मॅथ्यूजने जवळपास सहा तास अफगाणिस्तानच्या गोलंदाजांचा घाम काढला होता. २५९ चेंडूंचा सामना करत १४१ धावांची खेळी केली. दीडशे धावा आरामात होऊ शकल्या असत्या. पण एक चूक महागात पडली. मॅथ्यूजने क्रिकेट कारकिर्दीतलं १६ वं शतक ठोकलं.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

अफगाणिस्तान (प्लेइंग इलेव्हन): इब्राहिम झद्रान, नूर अली झद्रान, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), नासिर जमाल, इक्रम अलीखिल (विकेटकीपर), झिया-उर-रेहमान, कैस अहमद, निजात मसूद, मोहम्मद सलीम साफी, नवी झदरन

श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): दिमुथ करुणारत्ने, निशान मदुष्का, कुसल मेंडिस, अँजेलो मॅथ्यूज, दिनेश चंडिमल, धनंजया डी सिल्वा (कर्णधार), सदीरा समरविक्रमा (विकेटकीपर), चमिका गुणसेकरा, प्रभात जयसूर्या, विश्व फर्नांडो, असिथा फर्नांडो

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.