AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी : कसोटी सामन्याला अवघे काही तास बाकी, टीमचा हुकमी खेळाडू बाहेर

कसोटी सामन्याला काही तास बाकी असताना टीमला मोठा झटका बसला आहे. टीममधील स्टार खेळाडूबाबत मोठी अपडेट बातमी समोर आली आहे. पाहा कोण आहे तो खेळाडू जाणून घ्या.

मोठी बातमी : कसोटी सामन्याला अवघे काही तास बाकी, टीमचा हुकमी खेळाडू बाहेर
| Updated on: Sep 08, 2024 | 9:18 PM
Share

अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात उद्या म्हणजेच 9 सप्टेंबरपासून एकमेव कसोटी सामना होणार आहे. हा सामना भारतामध्ये पार पडणार आहे. सामना सुरू होण्यासाठी अवघे काही तास बाकी असताना एक वाईट बातमी समोर आली आहे. एक स्टार खेळाडू सरावादरम्यान जखमी झाला आहे. त्यामुळे जखमी खेळाडू कसोटी सामन्यात खेळणार की नाही याबाबत साशंकता आहे. कोण आहे तो खेळाडू जाणून घ्या.

कोण आहे तो खेळाडू?

कसोटी सामन्याला सुरुवात होण्याआधी अफगाणिस्ता टीमला मोठा झटका बसला आहे. भारतातील ग्रेटर नोएडा येथे होणाऱ्या कसोटी सामन्याआधी अफगाणिस्तान संघाचा खेळाडू इब्राहिम झद्रान हा सरावावेळी जखमी झालाय. याबाबत सामन्याआधी होणाऱ्या पत्रकार परिषदेमध्ये कॅप्टन हशमतुल्ला शाहिदी याने माहिती दिली. सरावावेळी इब्राहिम झद्रानच्या घोट्याला दुखापत झाली. उद्याच्या सामन्यासाठी तो फिट असेल की नाही हे सांगता येत नाही, असं हशमतुल्ला शाहिदी याने सांगितलं.

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात झद्रान जर खेळू शकला नाहीतर आमच्यासाठी हा मोठा धक्का असणार आहे. अफगाणिस्तानसाठी त्याने कायम चांगली कामगिरी केल्याचं हशमतुल्ला शाहिदीने म्हटलं आहे.

2019 मध्ये इब्राहिम झद्रान याने अफगाणिस्तान संघाकडून पदार्पण केलं होतं. 7 कसोटी सामन्यांमध्ये 541 धावा केल्या आहेत ज्यात एक शतक आणि चार अर्धशतकांचा समावेश आहे. 33 एकदिवसीय सामन्यांमध्ये 1440 धावा आणि 44 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 1105 धावा केल्या आहेत. अफगाणिस्तान क्रिकेट संघाने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये  9 कसोटी सामने खेळले आहेत.

हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), इब्राहिम झदरन, रहमत शाह, अब्दुल मलिक, रियाझ हसन, अफसर झझाई, इक्रिम अलीखिल (यष्टीरक्षक), बहीर शाह मेहबूब, शाहिदुल्ला कमाल, अजमतुल्ला उमरझाई, शम्स उर रहमान, झिया उर रहमान अकबर, झहीर खान, खलील अहमद, निजात मसूद.

न्यूझीलंड संघ : डेव्हॉन कॉनवे, टॉम लॅथम, केन विल्यमसन, डॅरिल मिशेल, विल यंग, ​​ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर, एजाज पटेल, टिम साऊदी (कर्णधार), मॅट हेन्री, टॉम ब्लंडेल, रचिन रवींद्र, बेन सियर्स

दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं
दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं.
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं.
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद.
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!.
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल.
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर.
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही...
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही....
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात.
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ.
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल.