AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PAK vs AFG : नवख्या टीमची वर्ल्ड कप विजेत्या पाकिस्तानवर मात, विजय मिळवत रचला इतिहास

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यामधील तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेमधील पहिलाच सामना अफगाणिस्तानने जिंकला आहे. पाकिस्तान संघावर 6 विकेट्सने मात करत पहिलाच सामना खिशात घातलाय. हा सामना जिंकत अफगाणिस्तान संघाने इतिहास रचला आहे.

PAK vs AFG : नवख्या टीमची वर्ल्ड कप विजेत्या पाकिस्तानवर मात, विजय मिळवत रचला इतिहास
| Updated on: Mar 25, 2023 | 5:30 PM
Share

मुंबई : पाकिस्तान आणि अफगाणिस्तान (PAK vs AFG) यांच्यामधील तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेमधील पहिलाच सामना अफगाणिस्तानने जिंकला आहे. पाकिस्तान संघावर 6 विकेट्सने मात करत पहिलाच सामना खिशात घातलाय. हा सामना जिंकत अफगाणिस्तान संघाने इतिहास रचला आहे. 2009 साली वर्ल्ड कप वर नाव कोरणाऱ्या पाकिस्तान संघाचा अफगाणिस्तान संघाविरूद्ध पहिला पराभव झालाय. या सामन्यामध्ये पाकिस्तान संघाला 100 धावाही करत आल्या नाहीत.

शादाब खान कर्णधारपदाची धुरा सांभाळत आहे. मात्र त्याचा प्रथम फलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय पाकिस्तानच्या अंगाशी आला. पाकिस्तानची सूरूवात खराब झाली, सलामीला मैदानात मोहम्मद हरिस आणि सईम अयुब उतरलले होते. मात्र 17 धावांवरच पहिला धक्का अफगाणिस्तानला बसला. मोहम्मद बाद झाला त्यानंतर आलेल्या अब्दुल्ला शफीक याला भोपळाही फोडता आला नाही. पाकिस्तानकडून तय्यब ताहिर 16 धावा, इमाद वसीम 18 धावा आणि शादाब खान यांना वगळता इतर कोणालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. अफगाणिस्तानच्या फजलहक फारूकी, मुजीब रहमान आणि मोहम्मद नबी यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. पाकिस्तान संघाचा डाव 92 धावांवर रोखला.

अफगाणिस्तानकडून सलामीला आलेल्या रहमानुल्लाह गुरबाजने 16 धावा केल्या. मात्र इब्राहिम जादरान 09 आणि गुलबदीन नायब 0 यांना मोठी खेळी करता आली नाही. मात्र मोहम्मद नबीने मैदानावर थांबत नाबाद 38 धावांची खेळी केली. त्यासोबतच नजीबुल्लाह जादरान यानेही नाबाद 17 धावा केल्या, दोघांच्या खळीने संघाला एतिहासिक विजय मिळवून दिला.

दरम्यान, तीम सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना अफगाणिस्तानने जिंकत 1-0 ने जिंकला आहे. दोन सामने बाकी असून त्यातील दुसरा सामना उद्या म्हणजेच 26 मार्च आणि तिसरा सामना 27 मार्चला खेळवला जाणार आहे. पाकिस्तानला आता मालिका वाचवायची असेल तर हा सामना जिंकणं महत्त्वाचं आहे.

शादाब खान (कर्णधार), अब्दुल्ला शफीक, आझम खान, फहीम अश्रफ, इफ्तिखार अहमद, इहसानुल्ला, इमाद वसीम, मोहम्मद हरिस, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, सईम अयुब, शान मसूद , तय्यब ताहिर, जमान खान,

त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.