AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WTC Final नंतर इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिकेपूर्वी ‘या’ तीन खेळाडूंवर टांगती तलवार, संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्याची दाट शक्यता

भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्त्वात तिसऱ्यांदा भारतीय संघ आयसीसी ट्रॉफीच्या अगदी जवळ पोहचून पराभूत झाला. न्यूझीलंडने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारताला पराभूत केल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आलं आहे.

WTC Final नंतर इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिकेपूर्वी 'या' तीन खेळाडूंवर टांगती तलवार, संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्याची दाट शक्यता
jadeja bumrah gill
| Edited By: | Updated on: Jun 25, 2021 | 3:04 PM
Share

मुंबई : इंग्लंडच्या साऊदम्पटनमध्ये पार पडलेल्या कसोटी क्रिकेटच्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताला न्यूझीलंडकडून 8 विकेट्सने पराभव पत्करावा लागला. संपूर्ण स्पर्धेत अनेक अप्रतिम विजय मिळवलेल्या भारतीय संघाला अंतिम सामन्यात मात्र पराभव पत्करावा लागल्याने सर्वंच भारतीय क्रिकेट रसिकांचा हिरमोड झाला. विराट कोहलीच्या कप्तानीवरही अनेक प्रश्न यावेळी उठवण्यात आले. अंतिम सामन्यासाठी निवडलेला संघ चूकला असंही अनेकांनी म्हटल्याने संघात काही महत्त्वाचे बदल होणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील पराभवानंतर आता भारत इंग्लंडसोबत कसोटी मालिका खेळणार आहे. 4 ऑगस्टपासून सुरु होणारी ही मालिका कसोटी क्रिकेटमध्ये पुन्हा दमदार आगमनासाठी महत्त्वाची असल्याने भारतीय संघात या सामन्यांसाठी काही बदल होणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. यामध्ये तीन खेळाडूंच्या बदलीबाबत सर्वांत जास्त चर्चा आहे. हे तिघे खेळाडू म्हणजे रवींद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह आणि शुभमन गिल. यामध्ये बुमराहची  गोलंदाजी अंतिम सामन्यात चांगली पडली नसल्याने त्याला काही काळ विश्रांती देण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. तर दुसरीकडे शुभमनने ही एक सलामीवीर म्हणून हवी तशी कामगिरी केली नसल्याने त्याच्यावरही संघातून बाहेर जाण्याची टांगती तलवार आहे.

जाडेजाच्या जागी शार्दूलला दिली जाऊ शकते संधी

सर्वात जास्त धोका हा अष्टपैलू रवींद्र जाडेजाच्या स्थानाला असून फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही विभागात जाडेजा खास कामगिरी करेल यासाठी त्याला अंतिम सामन्यात अंतिम 11 मध्ये ठेवण्यात आले. मात्र त्याने फलंदाजीत जास्त धावा न करता गोलंदाजीतही केवळ एकच विकेट घेतल्याने त्यानोे सर्वांचीच निराशा केली. दरम्यान जाडेजाच्या जागी अष्टपैलू शार्दूल ठाकूरला संधी दिली जाऊ शकते. शार्दूल फलंदाजीतही चांगली कामगिरी करत असून त्याचा बॉलही चांगला स्वींग होत असल्याने त्याला संधी दिली जाऊ शकते.

हे ही वाचा :

WTC Final ची ट्रॉफी जिंकल्यानंतर केन विल्यमसनचं खास ठिकाणी फोटोशूट, आयसीसीने पोस्ट केले फोटो

WTC Final मध्ये का पराभूत झाला भारतीय संघ?, सचिन तेंडुलकरने सांगितलं कुठे चूकला विराट कोहली

WTC स्पर्धेत अश्विनचा डंका, सर्वाधिक विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड, कांगारु बोलरला पछाडलं!

(After losing in ICC WTC Final 2021 against New Zealand Indian Captain Virat Kohli May do Some changes in Test Team by removing Ravindra jadeja jasprit bumrah and shubhman gill)

कोकाटेंचं मंत्रिपद गेलं, राजीनामा मंजूर, अटकेसाठी पोलीस 3 तास लिलावतीत
कोकाटेंचं मंत्रिपद गेलं, राजीनामा मंजूर, अटकेसाठी पोलीस 3 तास लिलावतीत.
एपस्टिन कांडामुळं भारतात राजकीय उलथापालथ होणार,सामनातून सरकारवर निशाणा
एपस्टिन कांडामुळं भारतात राजकीय उलथापालथ होणार,सामनातून सरकारवर निशाणा.
...तर बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळे यांनी का दिला टोकाचा इशारा?
...तर बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळे यांनी का दिला टोकाचा इशारा?.
प्रज्ञा सातव भाजपवासी, एकाच प्रवेशात BJP कडून 2 शिकार?
प्रज्ञा सातव भाजपवासी, एकाच प्रवेशात BJP कडून 2 शिकार?.
पुणे निवडणुकीसाठी धंगेकरांना ठेवलं दूर, BJPच्या बैठकीत बोलवलंच नाही!
पुणे निवडणुकीसाठी धंगेकरांना ठेवलं दूर, BJPच्या बैठकीत बोलवलंच नाही!.
निवडणुकीत दोन्ही NCPच्या एकत्र येण्यास ठाकरेंचा विरोध, 'मविआ'त ठिणगी
निवडणुकीत दोन्ही NCPच्या एकत्र येण्यास ठाकरेंचा विरोध, 'मविआ'त ठिणगी.
दादांनंतर शिंदे आमदारामागे कोर्ट कचेरी, कोकाटेंनंतर कुडाळकर गोत्यात!
दादांनंतर शिंदे आमदारामागे कोर्ट कचेरी, कोकाटेंनंतर कुडाळकर गोत्यात!.
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.