AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : David Warner याचं ‘श्रीवल्ली’ भूत काही उतरेना, मैदानात आला अन्…. पाहा व्हिडीओ

David Warner Dance Video : ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर हा फक्त क्रिकेटरनसून रीलस्टारही म्हणून भारतात प्रसिद्ध आहे. याची झलकही आज सर्व चाहत्यांना पाहायला मिळाली. साऊथचा सुपरहिट चित्रपट 'पुष्पा' मधील गाण्यावर त्याने अनेक रीस्स बनवले आहेत

Video : David Warner याचं 'श्रीवल्ली' भूत काही उतरेना, मैदानात आला अन्.... पाहा व्हिडीओ
| Updated on: Oct 03, 2023 | 10:59 PM
Share

मुंबई : ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानमधील सराव सामन्यामध्ये कांगारूंनी 14 धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाने 351 धावांचा डोंगर उभारला होता. ग्लेन मॅक्सवेल आणि कॅमेरून ग्रीन यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर कांगारूंनी 350 धावांचा टप्पा पार केला. या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाला 50 ओव्हरमध्ये 337 धावाच करता आल्या. या सामन्यातील डेव्हिड वॉर्नर याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

नेमकं काय करत आहे वॉर्नर?

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर हा फक्त क्रिकेटरनसून रीलस्टारही म्हणून भारतात प्रसिद्ध आहे. याची झलकही आज सर्व चाहत्यांना पाहायला मिळाली. साऊथचा सुपरहिट चित्रपट ‘पुष्पा’ मधील गाण्यावर त्याने अनेक रीस्स बनवले आहेत. महत्त्वाचं म्हणजे हे रील्स मोठ्या प्रमाणात व्हायरलही झालेले पाहायला मिळाले होते. हैदराबादमध्ये झालेल्या सराव सामन्यामध्ये स्टेडिअममध्ये पुष्पा श्रीवल्ली गाणं लावताच वॉर्नर पुष्पा स्टाईल करू लागला.

पाहा व्हिडीओ-

डेव्हिड वॉर्नर याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेला पाहायला मिळत आहे. आपल्या संघातील सहकाऱ्यासोबत बोलताना गाण्याचे बोल कानावर पडताच भाऊने ठेका धरला होता. वॉर्नर याने आयपीएलमध्ये भारतीय चाहत्यांसोबत एक वेगळं नात तयार केलं आहे.

दरम्यान, या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नर 48 धावा, लाबुशेन 40 धावा, ग्लेन मॅक्सवेल 77 धावा, कॅमेरून ग्रीन 50 धावा, जोश इंग्लिस 48 धावा केल्या. या फंलदाजांच्या जोरावर कांगारूंनी 350 धावा केल्या. मात्र लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाची खराब सुरूवा झाली. इफ्तियार अहमद 87 धावा, बाबर आझम 90 धावा आणि मोहम्मद नवाज 50 धावा करत संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला मात्र तो अपुर पडला.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.