AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : ‘दादा’कडून बिग बी’ यांची फिरकी, पण बच्चनच ते, केबीसीच्या मैदानात सौरव गांगुलीला आस्मान दाखवलं!

दादाने कार्यक्रमाची खास बिग बी यांच्या स्टाईलमध्ये सुरुवात केली. "देवी और सज्जनौ... मेरे सामने हॉटसीट पर बैठे हैं अमिताभ बच्चन... नाम तो आपने सुना ही होगा... इससे बडा नाम भारतीय फिल्म इंडट्री में मैंने ना सुना है, ना आपने सुना होगा...! लेस्ट प्ले कौन बनेगा करोडपती.........!

Video : 'दादा'कडून बिग बी' यांची फिरकी, पण बच्चनच ते, केबीसीच्या मैदानात सौरव गांगुलीला आस्मान दाखवलं!
अमिताभ बच्चन आणि सौरव गांगुली
| Edited By: | Updated on: Sep 08, 2021 | 4:16 PM
Share

मुंबई : ‘कौन बनेगा करोडपती’च्या मंचावर अनेक जण हजेरी लावत असतात… मागील आठवड्यात क्रिकेटचं एक पर्व जगलेल्या दोन धडाकेबाज बॅट्समनने केबीसीच्या मंचावर हजेरी लावली होती. भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली आणि सलामीवीर वीरेंद्र सेहवाग यांनी बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासमोर आपली हुशारी दाखवली. पण त्याचवेळी सौरवला देखील अमिताभ बच्चन यांची फिरकी घेण्याचा मोह आवरता आला नाही. पण शेवटी बच्चनच ते….. त्यांनी सौरवने विचारलेल्या क्रिकेटच्या प्रश्नांची अगदी बरोबर उत्तरे देत सौरवला केबीसीच्या मैदानात आस्मान दाखवलं. (Amitabh Bacchhan And Sourav Ganguly Question Answer KBC Show)

केबीसीच्या मंचावर स्पर्धक हॉटसीटवर बसत असतात आणि बिग बी त्यांच्या खास स्टाईलमध्ये स्पर्धकांना प्रश्न विचारत असतात. पण केबीसीच्या मंचावर पहिल्यांदा असं घडलं की बिग बी हॉटसीटवर बसले आणि सौरव गांगुलीने निवेदकाची भूमिका पार पाडली. बिग बी यांच्या सोबतीला मदत म्हणून वीरेंद्र सेहवाग होता. यावेळी दादाने अमिताभ बच्चन यांना एकच लाईफलाईन दिली. ती लाईफलाईन म्हणजे वीरेंद्र सेहवाग….!

मात्र ही लाईफलाईन देताना सेहवागवर विश्वास ठेऊ नका, असं सांगून दादाने बच्चन यांच्यासमोरच्या अडचणी वाढवल्या. मात्र बिग बी यांनी सौरवच्या प्रश्नांची अगदी करेक्ट उत्तरे दिली. अमिताभ बच्चन यांचं क्रिकेटमधील नॉलेज पाहून सौरव देखील भारावून गेला.

देवी और सज्जनौ… मेरे सामने हॉटसीट पर बैठे हैं अमिताभ बच्चन

दादाने कार्यक्रमाची खास बिग बी यांच्या स्टाईलमध्ये सुरुवात केली. “देवी और सज्जनौ… मेरे सामने हॉटसीट पर बैठे हैं अमिताभ बच्चन… नाम तो आपने सुना ही होगा… इससे बडा नाम भारतीय फिल्म इंडट्री में मैंने ना सुना है, ना आपने सुना होगा…! लेस्ट प्ले कौन बनेगा करोडपती………!

दादाने एक फोटो दाखवत बिग बी यांना फोटोतील क्रिकेटर ओळखण्यास सांगितलं. यावेळी अमिताभ बच्चन यांनी दादाची फिरकी घेतली… “भाईसाहाब ये फोटो आऊटफोकस हैं….!”, असं बिग बी म्हणाले. त्यावर उपस्थित प्रेक्षकही खळखळून हसले…. सेहवागने क्लू म्हणून त्यांना, “हा खेळाडू आपला चाहता आहे”, असं सांगितलं. त्यावर थोडासा अंदाज लावत बिग बी यांनी उत्तर दिलं, एम एस धोनी…..!” हे बरोबर उत्तर होतं…

सचिनचा फेव्हरेट शॉट कोणता?

दादाने दुसरा प्रश्न विचारला, सचिन तेंडुलकरचा फेव्हरेट शॉट कोणता?, बिग बी यांनी क्षणार्धाचाही विचार न करता उत्तर द्यायला सुरुवात केली… “सचिन जेव्हाही स्ट्रेट ड्राईव्ह मारतो, तो शॉट पाहण्यासारखी दुसरी कोणतीच चांगली फिलिंग असू शकत नाही…” बच्चन यांच्या उत्तरावर टाळ्यांचा कडकडाट होतो…

जेव्हा बच्चन सेहवागवरही विश्वास ठेवत नाही…!

दादा तिसरा प्रश्न विचारतो, एम एस धोनीचा फेव्हरेट शॉट कोणता?, एकाही सेकंदाचा वेळ न दवडता बिग बी उत्तर देतात, हेलिकॉप्टर शॉट… त्यावर एकापाठोपाठ एक बरोबर उत्तरामुळे दादाने वाहत्या गंगेत हात धुवून घेण्याचा प्रयत्न केला… त्यांची फिरकी घेण्यासाठी दादा पुन्हा प्रश्न विचारतो, सेहवागचा फेव्हरेट शॉट कोणता?, त्यावेळी बिग बी गोंधळात पडतात… मग शेजारी बसलेला सेहवाग बिग बी यांना उद्देशून म्हणतो, सर मी तुमच्या शेजारी बसलोय, माझी मदत घेऊ शकता…. त्यावर वीरेंद्र सेहवाग हळूच बच्चन यांच्या कानात ‘स्क्वेअर कट’ असं सांगतो… पण बिग बी सेहवागवर विश्वास ठेवत नाहीत… त्यावेळी गांगुलीला हसू अनावर होतं… बच्चन म्हणतात, मला सेहवागच्या बोलण्यावर विश्वास नाहीय… माझं उत्तर मी देतो… तेव्हा गांगुली गमतीने म्हणतो, विरु बघ काय तुझं रेप्युटेशन आहे… !, मग बच्चन उत्तर देतात, ‘अप्पर कट’, त्यावर सेहवागही मान होकारार्थी मान डोलावतो आणि बिग बी यांच्यासमोर नतमस्तक होतो….!

आणि गांगुली शेवटचा प्रश्न विचारतो….. सौरवचा फेव्हरेट शॉट कोणता…. बिग बी या प्रश्नाचं उत्तर देखील खास पद्धतीने देतात… ते म्हणाले, “दादा तुम्ही जेव्हा ऑफ ड्राईव्ह खेळायचा… इट इज किंग ऑफ ऑल ड्राईव्ह्ज..!” बच्चन यांच्या उत्तरानंतर गांगुलीला देखील आश्चर्य वाटतं की त्यांना सगळ्याच प्रश्नाची उत्तरं कशी माहितीय… बच्चन यांचं क्रिकेटविषयीचं नॉलेज पाहून गांगुली देखील अचंबित होतो…!

सरतेशेवटी गांगुलीने आणखी एक फोटो दाखवला…. कोलकात्याच्या ईडन गार्डन स्टेडियममधला तो फोटो खुद्द अमिताभ बच्चन यांचा होता… फोटो पाहून अमिताभ बच्चन त्यांच्या स्टाईलमध्ये खळखळून हसतात आणि म्हणतात… “दादा ये तो हम ही हैंं…”

हे ही वाचा :

शिखर धनवसोबत घटस्फोट, आयशा मुखर्जी म्हणते, मी अजून कणखर झालीय, वाचा सविस्तर तिनं आणखी काय म्हटलंय?

मुंबईच्या लोकलमधून प्रवास करणाऱ्या शार्दूलचा क्रिकेट प्रवास, ऑस्ट्रेलियापासून ते इंग्लंडपर्यंत हवा, असा घडला ‘Lord शार्दूल ठाकूर’

PHOTO : शिखर धवनच नाही, ‘या’ भारतीय क्रिकेटपटूंनीही घेतला आहे घटस्फोट

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.