Arjun Tendulkar : अर्जुन तेंडुलकरचा मुंबई इंडियन्स सोडण्याचा निर्णय, या कारणामुळे नाराज?

Arjun Tendulkar Leaves Mumbai Indians : अर्जुन तेंडुलकर हा डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. सध्या तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनचा भाग आहे. तसेच आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सशीही संबंधित आहे.

Arjun Tendulkar : अर्जुन तेंडुलकरचा मुंबई इंडियन्स सोडण्याचा निर्णय, या कारणामुळे नाराज?
अर्जुन तेंडुलकरचा मुंबई इंडियन्स सोडण्याचा निर्णयImage Credit source: social
Follow us
| Updated on: Aug 12, 2022 | 6:51 AM

मुंबई : भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) हा केवळ टीम इंडियाचा (Mumbai Indians) सुपरस्टार फलंदाज म्हणून ओळखला जात नाही, तर त्यानं आधीच प्रसिद्ध असलेल्या मुंबई क्रिकेटलाही अधिक उंचीवर नेलं आहे. मूळचा मुंबईचा असलेला आणि मुंबईच्या मैदानातून क्रिकेट शिकणारा सचिन आपले संपूर्ण देशांतर्गत क्रिकेट मुंबईसाठी खेळला. सचिननंतर त्याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) यानंही मुंबईतूनच क्रिकेटची शाळा सुरू केली. मात्र आता तो बदलाच्या दिशेनं पावलं टाकत असून मुंबई क्रिकेट सोडण्याची तयारी केली आहे. पीटीआयनं दिलेल्या वृत्तानुसार डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकरनं देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपली कारकीर्द घडवण्यासाठी मुंबई क्रिकेटऐवजी दुसऱ्या संघाचा भाग होण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी अर्जुननं त्याच्या होम असोसिएशन मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून ना हरकत प्रमाणपत्रासाठी (NOC) अर्ज केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार अर्जुन पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या देशांतर्गत क्रिकेट हंगामात गोव्याकडून खेळताना दिसणार आहे.

अर्जुनला संधींची गरज

या संदर्भात सचिन तेंडुलकरच्या व्यवस्थापंन कंपनी एसआरटी स्पोर्ट्स मॅनेजमेंटनं एक निवेदन जारी केले असून अर्जुनला खेळण्यासाठी अधिकाधिक संधी देण्याची हीच योग्य वेळ आहे. एजन्सीने एका निवेदनात म्हटले आहे. करिअरच्या या टप्प्यावर अर्जुननं जास्तीत जास्त वेळ मैदानावर घालवणं महत्त्वाचं आहे. दुसऱ्या स्थानावरून खेळल्यानं अर्जुनला अधिक स्पर्धात्मक सामने खेळण्याची संधी मिळेल, असा आम्हाला विश्वास आहे. तो त्याच्या क्रिकेट कारकिर्दीचा नवा पर्व सुरू करत आहे.

गोवा क्रिकेट संघात स्थान मिळेल

गोवा क्रिकेट असोसिएशनही या प्रकरणात रस दाखवत असून ज्युनियर तेंडुलकरला राज्य संघात स्थान मिळू शकतं, असं त्यांनी म्हटलं आहे. गोवा क्रिकेट असोसिएशनचे (जीसीए) अध्यक्ष सूरज लोटलीकर यांनी पीटीआयला सांगितले की, “आम्ही डावखुरा वेगवान गोलंदाज शोधत आहोत. म्हणूनच आम्ही अर्जुन तेंडुलकरला गोवा संघात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे. हंगामापूर्वी आम्ही मर्यादित षटकांचे सराव सामने खेळू आणि तो या सामन्यांमध्ये खेळेल. या सामन्यातील त्याच्या कामगिरीच्या आधारे निवड समिती त्याला संघात ठेवण्याचा निर्णय घेतील.

मुंबईसाठी फक्त 2 सामने खेळले

22 वर्षीय अर्जुन तेंडुलकर मुंबई क्रिकेट संघात आपले स्थान निर्माण करण्यात अपयशी ठरला आहे. भारतीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबईमध्ये सर्वोत्तम प्रतिभावान क्रिकेटपटू आहेत आणि अशा परिस्थितीत अर्जुनसाठी स्थान मिळवणे सोपे नव्हते. 2020-21 च्या मोसमात त्याने निश्चितपणे लहान फॉरमॅटच्या संघात स्थान मिळवले. त्यानंतर अर्जुनने मुंबईकडून सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये हरियाणा आणि पुद्दुचेरीविरुद्ध दोन सामने खेळले. अर्जुनसाठी सर्वात मोठी निराशा म्हणजे या मोसमात त्याला स्वत:ला सिद्ध करण्याची संधी न मिळाल्याने मुंबई संघातून वगळण्यात आले. तो सध्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा भाग आहे, पण त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.