AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Arshdeep Singh Controversy: कोल्ड ड्रिंकचे पैसे मागणारे…! अर्शदीप सिंग नव्या वादात अडकला

आयपीएल 2026 स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात असताना पंजाब किंग्सची गाडी रूळावरून घसरली आहे. आता प्लेऑफमध्ये स्थान मिळवणं कठीण झालं आहे. असं असताना अर्शदीप सिंग एका पोस्टमुळे वादात अडकला आहे. एका युजर्सला दिलेल्या प्रत्युत्तरामुळे चर्चेत आला आहे.

Arshdeep Singh Controversy: कोल्ड ड्रिंकचे पैसे मागणारे...! अर्शदीप सिंग नव्या वादात अडकला
Arshdeep Singh Controversy: कोल्ड ड्रिंकचे पैसे मागणारे...! अर्शदीप सिंग नव्या वादात अडकलाImage Credit source: PTI
| Updated on: May 15, 2026 | 5:48 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धा सुरू असून पंजाब किंग्सने या स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात जबरदस्त कामगिरी केली. सात सामन्यांचा खेळ संपला तेव्हा सहा विजय मिळवले. तसेच एक सामना पावसामुळे ड्रॉ झाला आणि एक गुण मिळाला होता. पण त्यानंतर सलग पाच पराभव पदरी पडल्याने प्लेऑफचं गणित लांबलं आहे. आता प्लेऑफमध्ये स्थान मिळवेल की नाही अशी स्थिती आहे. दुसरीकडे, पंजाब किंग्सचा वेगवान गोलंदाज गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आला आहे. मैदानाबाहेरील त्याची कृती वादग्रस्त ठरत आहे. नुकतंच त्याने तिलक वर्मावर टीका केली होती. त्यामुळे त्याला सोशल मीडियावर ट्रोल केलं गेलं. आता एका युजर्सच्या कमेंटवर त्याने पोस्ट केली आहे, त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. अर्शदीप सिंगने तिलक वर्मावर केलेल्या कमेंटनंतर एका चाहत्याने स्नॅपचॅटवर पंजाब किंग्सला आयपीएलमधून काढण्याची मागणी केली. त्यानंतर अर्शदीपने कमेंट केली आणि चर्चेत आहेत.

अर्शदीप सिंगचा युजर्ससोबत वाद

एका युजर्सने स्नॅपचॅटवर लिहिलं की, पंजाबला आयपीएलमधून काढलं पाहिजे. अर्शदीप सिंग, का आमची लाज घालवत आहे? यावर अर्शदीपने त्या युजर्सला उत्तर दिलं आहे. त्याने प्रत्युत्तर दिलं की, ‘तू पंजाबसाठी काय केलं आहेस की तुला लाज वाटत आहे. जे लोक कोल्ड ड्रिंक आणि चिप्स खाण्यासाठी कुटुंबाकडून पैसे घेतात, ते आम्हाला सल्ला देत आहे की नाव ठेवायचं की नाही.’ अर्शदीप सिंगने दिलेल्या प्रत्युत्तराचा स्क्रिनशॉट आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर चाहते त्याला आणखी ट्रोल करत आहेत.

तिलक वर्माला काय म्हणाला होता?

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी अर्शदीप सिंगने तिलक वर्मावर टिपणी केल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली. या टिपणीचा अर्थ त्वचेच्या रंगाशी जोडला जात आहे. त्यामुळे अनेकांनी अर्शदीप सिंगवर कारवाईची मागणी केली आहे. त्याच्या पोस्टवर मुंबई इंडियन्सने पोस्टद्वारे उत्तर दिलं होतं. अर्शदीप वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची ही काय पहिली वेळ नाही. यापूर्वीही त्याने तिलक वर्मावर टीका केली होती. तसेच साई सुदर्शन याचीही खिल्ली उडवली होती.

दरम्यान, पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात तिलक वर्माने मॅच विनिंग खेळी केली. त्याच्या खेळीमुळे पंजाबला पाचव्या पराभवाचं तोंड पाहावं लागलं. यानंतर मुंबई इंडियन्सने एक पोस्ट केली आहे. ते अर्शदीप सिंगच्या कमेंट्सला प्रत्युत्तर होतं असं मानलं जात आहे.

Follow Us
नाशिक IT कंपनी धर्मांतरण प्रकरणी मोठी अपडेट समोर! मुख्य संशयित आरोपी..
Big Breaking | नाशिक IT कंपनी धर्मांतरण प्रकरणी मोठी अपडेट समोर! मुख्य संशयित आरोपी निदा खानला...
मोठी राजकीय घडामोडी! शरद पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची...
मोठी राजकीय घडामोडी! शरद पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची महत्त्वाची बैठक सुरू, बारामतीतील...
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी, वाहतूक मंदावल्याने
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी, वाहतूक मंदावल्याने प्रवाशांना त्रास!
पंचगंगा नदीचं महारौद्ररुप! पाणीपातळी थेट 34 फुटांपर्यंत, डोळे विस्फारण
पंचगंगा नदीचं महारौद्ररुप! पाणीपातळी थेट 34 फुटांपर्यंत, डोळे विस्फारणारं दृश्य
पाहणारे पाहतच राहिले! मुंबईत समुद्राला तुफान भरती, 4.26 मीटर उंच...
पाहणारे पाहतच राहिले! मुंबईत समुद्राला तुफान भरती, 4.26 मीटर उंच उसळल्या लाटा
उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली; बदलापूरमध्ये पूराचा मोठा धोका
Badlapur | धोक्याची घंटा! उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली; बदलापूरमध्ये पूराचा मोठा धोका
सतर्क राहा...मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आवाहन! 8 तारखेपर्यंत अलर्ट,
सतर्क राहा...मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आवाहन! 8 तारखेपर्यंत अलर्ट, 300 मिमी पावसासह ढगफुटी...
प्रशासनाचा मोठा निर्णय; पुढील आदेशापर्यंत मुंबई–पुणे एसटी बस बंद
मोठी बातमी! प्रशासनाचा मोठा निर्णय; पुढील आदेशापर्यंत मुंबई–पुणे एसटी बस बंद
पुणे हादरलं! मावळमधील दरड दुर्घटनेत तीघांचा मृत्यू तर एकाच कुटुंबातील
पुणे हादरलं! मावळमधील दरड दुर्घटनेत तीघांचा मृत्यू तर एकाच कुटुंबातील... थरकाप उडवणारे दृश्य समोर
नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट! शाळा, बाजार, मंदिरेही बंद
Nashik | नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट! शाळा, बाजार, मंदिरेही बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय