AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashes: इंग्लंडची कसोटी मालिकेवरील पकड सैल, ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवशी केले हाल

ऑस्ट्रेलिया इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यावर ऑस्ट्रेलियाने वर्चस्व गाजवलं. सध्या मालिकेत 2-0 अशी स्थिती आहे. त्यामुळे इंग्लंडला काहीही करून तिसरा सामना जिंकणं भाग आहे. असं असताना इंग्रजांची स्थिती मात्र नाजूक आहे.

Ashes: इंग्लंडची कसोटी मालिकेवरील पकड सैल, ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवशी केले हाल
इंग्लंडची कसोटी मालिकेवरील पकड सैल, ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी केले हाल Image Credit source: Cricket Australia X
| Updated on: Dec 18, 2025 | 4:32 PM
Share

एशेज कसोटी मालिका गमवण्याचं सावट आता इंग्लंडवर असल्याचं दिसत आहे. तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात इंग्लंडने निराशाजनक कामगिरीचं दर्शन घडवलं. ऑस्ट्रेलियाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने सर्व गडी गमवून 371 धावा केल्या. इंग्लंडला या मालिकेत कमबॅक करायचं तर पहिल्या डावातील या धावांचा पल्ला गाठणं आवश्यक आहे. पण दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडने 8 गडी गमवून 213 धावा केल्या. अजूनही इंग्लंडचा संघ 158 धावांनी पिछाडीवर आहे. इंग्लंडकडून बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर खिंड लढवत आहे. बेन स्टोक्स नाबाद 45, तर जोफ्रा आर्चर नाबाद 30 धावांवर खेळत आहे. दोघांनी नवव्या विकेटसाठी 83 चेंडूत 45 धावांची भागीदारी केली आहे. इंग्लंडला या भागीदारीवर शेवटची आस आहे. या दोघांनी जर तिसऱ्या दिवशी तग धरला तर काही अंशी धावांचं अंतर कमी होऊ शकतं.

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात केलेल्या 371 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात काही चांगली झाली नाही. झॅक क्राउलीच्या रुपाने पहिली विकेट 37 धावांवर पडली. त्यानंतर दोन विकेट धडाधड पडल्या. ओली पोप 3 आणि बेन डकेट 29 धावांवर बाद झाला. जो रूटही खाही खास करू शकला नाही. त्याने 31 चेंडूत 19 धावा केल्या आणि पॅट कमिन्स गोलंदाजीवर बाद होत तंबूत परतला. हॅरी ब्रूक आणइ बेन स्टोक्स यांनी पाचव्या विकेटसाठी 56 धावांची भागीदारी केली. या जोडीकडून फार अपेक्षा होत्या. पण अपेक्षा भंग झाला. हॅरी ब्रूक 63 चेंडूत 45 धावा करून तंबूत परतला. जेमी स्मिथने बेन स्टोक्सला थोडी फार साथ दिली आणि 32 धावांची भागीदारी केली. पण 22 धावांवर असताना जेमी स्मिथ बाद होत तंबूत परतला.

विल जॅक्स 6 आणि ब्रायडन कार्सला खातंही खोलता आलं नाही. त्यामुळे इंग्लंडचा संघ दुसऱ्या दिवशीच तंबूत परततो की काय असं वाटत होतं. पण बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चरची जोडी जमली आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने भेदक गोलंदाजी केली. त्याने 3 विकेट काढल्या. तर स्कॉट बोलँड आणि नाथन लायन यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. तर कॅमरून ग्रीनच्या खात्यात एक विकेट गेली.

जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.
दमानियांचा सुषमा अंधारे यांना पाठिंबा; शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी
दमानियांचा सुषमा अंधारे यांना पाठिंबा; शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी.
सनसनाटी निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न! शंभूराज देसाईंचा टोला
सनसनाटी निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न! शंभूराज देसाईंचा टोला.
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.