AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashes Series | पाचव्या कसोटीपूर्वी स्टीव स्मिथ आणि डेविड वॉर्नरबाबत मोठी बातमी, मायकल वॉन याने केलं आता असं भाकीत

Ashes Series : इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. मालिकेत ऑस्ट्रेलियाने 2-1 ने आघाडी घेतली आहे. असं असताना पाचव्या कसोटीपूर्वी इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने केलेल्या भाकितामुळे ऑस्ट्रेलियन चाहत्यांना धक्का बसला आहे.

Ashes Series | पाचव्या कसोटीपूर्वी स्टीव स्मिथ आणि डेविड वॉर्नरबाबत मोठी बातमी, मायकल वॉन याने केलं आता असं भाकीत
स्टीव स्मिथ आणि डेविड वॉर्नरबाबत मायकल वॉर्नने सांगितलं असं काही...! क्रीडाप्रेमींना बसेल धक्का
| Updated on: Jul 25, 2023 | 9:37 PM
Share

मुंबई : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे दोन क्रिकेट संघ पारंपरिक प्रतिस्पर्धी आहे. ॲशेस मालिका तर दोन्ही संघांच्या खेळाडूंसाठी युद्धासारखी असते, असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. जीव तोडून सामना जिंकवण्यासाठी दोन्ही संघाचे खेळाडू खेळत असतात. इतकंच काय तर प्रेक्षकही या सामन्यात तसाच प्रतिसाद देतात. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाने 2-1 ने आघाडी घेतली आहे. तर चौथा कसोटी सामना पावसामुळे ड्रॉ झाल्याने इंग्लंड संघावरील दडपण वाढलं आहे. तर ऑस्ट्रेलियाचं टेन्शन रिलीज झालं आहे. आता पाचवा कसोटी सामना इंग्लंडसाठी करो या मरोची लढाई असणार आहे. या दरम्यान इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने स्टीव स्मिथ आणि डेविड वॉर्नरबाबत मोठं भाकीत केलं आहे.

काय म्हणाला मायकल वॉन?

पाचव्या कसोटी सामन्यापूर्वी मायकल वॉन याने सांगितलं की, “हा सामना ऑस्ट्रेलियाच्या आक्रमक फलंदाज डेविड वॉर्नर व ऑस्ट्रेलियाचा कसोटीतील पाठीचा कणा म्हणून ख्याती असलेल्या स्टीव स्मिथसाठी शेवटचा असेल. पाचव्या सामन्यानंतर हे दोन्ही खेळाडू कसोटी क्रिकेटला रामराम ठोकतील.” फॉक्स स्पोर्टशी बोलताना त्याने ही शक्यता वर्तवली आहे. ॲशेज मालिकेतील पाचवा व शेवटचा सामना 27 जुलैपासून इंग्लंडच्या ‘द ओवल’ या क्रिकेट मैदानावर खेळवला जाणार आहे.

“जेव्हा सामन्यादरम्यान पाऊस पडतो तेव्हा पञकारांशी गप्पा मारण्याची संधी मिळते. यावेळी बऱ्याच गोष्टींचा उलगडा होत असतो. वॉर्नर व स्मिथ पाचवा सामना हा शेवटचा सामना असू शकतो. पण मी फक्त या गोष्टी ऐकल्या आहेत. त्यामुळे याबाबत खरं खोटं काही माहिती नाही.” असंही मायकल वॉन याने पुढे सांगितलं.

डेविड वॉर्नरने निवृत्तीबाबत काय सांगितलं होतं?

ॲशेस मालिकेदरम्यान वॉर्नरने क्रिकेट कारकिर्दीबाबत सांगितलं होतं. पुढच्या वर्षी जानेवारीत सिडनी क्रिकेट मैदानावर पाकिस्तानविरुद्ध होणारा कसोटी सामना हा त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना असेल, असं वॉर्नरने सांगितलं होतं.पण स्मिथने त्याच्या निवृत्तीबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही, त्यामुळे वॉनच्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे.

स्टीव स्मिथ हा ऑस्ट्रेलियाचा मधल्या फळीचा कणा आहे. स्टीव स्मिथची कसोटी मालिकेतील कामगिरी चांगली राहिली आहे. भारताविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतही शतकी खेळी केली होती. त्यामुळे तो निवृत्ती घेईल, असं वॉनचं म्हणणं अनेकांना रुचलेलं नाही. त्यामुळे आता पाचव्या कसोटीनंतर खरं काय ते समोर येईल.

बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने...
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने....
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.