AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asic Cup 2023 आधी टीमला मोठा झटका, ‘हा’ महत्त्वाचा मॅचविनर खेळाडू बाहेर

Asia Cup 2022 : टीम इंडियाचा आशिया कपमध्ये पहिला सामना पाकिस्तानसोबत पार पडणार आहे. .मात्र अशातच एक वाईट बातमी समोर आली आहे. आशिय कपमधून एक महत्त्वाचा खेळाडू बाहेर झाला आहे.

Asic Cup 2023 आधी टीमला मोठा झटका, 'हा' महत्त्वाचा मॅचविनर खेळाडू बाहेर
| Updated on: Aug 30, 2023 | 12:21 PM
Share

मुंबई : आशिया कप 2023 च्या थराराला आजपासून सुरुवात होत आहे. पहिला सामना पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यामध्ये पार पडणार आहे. मात्र त्याआधी एक वाईट बातमी समोर आली आहे. स्टार खेळाडू संपूर्ण आशिया कपमधून बाहेर झाला आहे. अचानक प्लेअर बाहेर झाल्यामुळे संघाला मोठा झटका बसला आहे. बांगलादेश संघाचा हा खेळाडू असून आजारपणामुळे त्याला स्पर्धेच्या बाहेर पडावं लागलं आहे.

कोण आहे तो खेळाडू?

आशिया कप स्पर्धेबाहेर पडलेला हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून लिटन दास आहे.  बांगलादेश संघाचा उद्या म्हणजेच 31ऑगस्टला श्रीलंकेसोबत होणार आहे. मात्र सामन्याआधी लिटन दास बाहेर झाल्याने संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे. बांगलादेश संघाला आक्रमक बॅटींग करून देण्यात लिटन दास याचं महत्त्वपूर्ण योगदान देतो. त्याच्या जागी वेगळ्या खेळाडूची निवड करण्यात आली आहे.

या खेळाडूची निवड-

आशिया कपमध्ये बांगलादेश क्रिकेट बोर्डाने लिटन दास याच्या जागी अनामूल हक बिजॉय याची निवड करण्यात आली आहे. बिजॉयने बांगलादेशकडून 44 वन डे  सामने खेळले असून यामध्ये तीन शतकांसह 1254 धावा केल्या आहेत. बिजॉयने त्याचा शेवटचा सामना गेल्या वर्षी डिसेंबरमध्येटीम इंडियाविरूद्धच्या घरच्या मालिकेमधील खेळला होता. बांगलादेश संघाची कर्णधारपदाची धुरा शकीब अल हसन याच्याकडे सोपण्यात आली आहे.

आशिया कपसाठी बांगलादेशचा संघ:-

शकीब अल हसन (कर्णधार), नजमुल हुसेन, तौहीद हृदयॉय, मुशफिकुर रहीम, अफिफ हुसैन, मेहदी हसन मिराज, तस्किन अहमद, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, शोरफुल इस्लाम, नसुम अहमद, शाक मेहेदी हसन, नईम शेख, शमीम हसन, शमीद हसन तमीम, तनझिम हसन साकिब आणि अनामूल हक बिजॉय

इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.