पाकिस्तान युएई सामन्यात आश्चर्यकारक घडामोडी! आता…
आशिया कप 2025 स्पर्धेतील पाकिस्तान युएई सामना रद्द झाला आहे. सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांना कायम ठेवल्याने पाकिस्तानने या सामन्यावर बहिष्कार टाकला होता. पण भिकेच्या डोहाळे लागलेल्या पाकिस्तानने पुन्हा पलटी मारली आणि सामना खेळण्याची तयारी दाखवली.

आशिया कप 2025 स्पर्धेतील 10वा सामना पाकिस्तान आणि युएई यांच्यात होणार होता. दोन्ही संघांसाठी हा सामना करो या मरोची लढाई होती. या सामन्यात विजयी संघ थेट सुपर 4 फेरीत जागा मिळवणार होता. मात्र या सामन्यावर पाकिस्तानने बहिष्कार टाकला आहे. सामनाधिकार अँडी पायक्रॉफ्ट यांच्यावर कारवाई न केल्याने पाकिस्तानने हा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीसीबीने बुधवारच्या सामन्यासाठी आपला संघ मैदानात उतरवण्यास नकार दिला. हा सामना रात्री 8 वाजल्यापासून दुबईमध्ये खेळवला जाणार होता. पण पाकिस्तानी संघ सामन्याच्या दोन तास आधीही त्यांच्या हॉटेलमध्ये होता. तसेच मैदानात जाण्यास नकार दिला. त्यामुळे हा सामना रद्द केल्याचं बोललं जात आहे. आशियाई क्रिकेट परिषदेने सामन्याचं ट्वीट डिलीट केल्याने याला दुजोरा मिळला होता. पण नाटकी करून काहीच पदरी पडलं नसल्याने पुन्हा खेळण्याची तयारी दाखवली
पाकिस्तानने भारताकडून पराभूत झाल्यापासून नाटक सुरु केलं होतं. सुरुवातीला हँडशेकचा बहाणा केला. त्यानंतर सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट असतील तर खेळणार नाही, असं सांगितलं. सामन्याच्या एक दिवस आधीही त्यांनी पत्रकार परिषद रद्द केली होती. पण आयसीसी अकादमीत सराव करून सामना खेळणार असल्याची तयारी दाखवली होती. मात्र सामन्याला काही तास सुरु असताना पुन्हा नाटक सुरु केलं. सामन्याला एक तास शिल्लक असताना पाकिस्तानी संघाची बस हॉटेलच्या बाहेर उभी होती. युएईची संघ मैदानात पोहोचला होता. मात्र पाकिस्तानी संघाने खेळण्यास नकार दिला. पण पुन्हा एकदा त्यांनी पलटी मारली आणि सामना खेळण्याची तयारी दर्शवली आहे.
भारत पाकिस्तान सामन्यानंतर या वादाला फोडणी मिळाली होती. भारताने या सामन्यात पाकिस्तान खेळाडूंना हात मिळवला नव्हता. नाणेफेक आणि सामन्यानंतरही तसंच झालं होतं. यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांना जबाबदार धरलं होतं. यासाठी त्यांनी आयसीसीकडे तक्रार केली होती. मात्र त्यांच्या तक्रारीला आयसीसीने केराची टोपली दाखवली. त्यामुळे पाकिस्तानची नाचक्की झाली होती. त्यामुळे पाकिस्तान हा सामना खेळणार की नाही अशी चर्चा रंगली होती. पाकिस्तानी मीडियात हा सामना खेळणार अशीच चर्चा रंगली. मात्र आता त्यांनी हा सामना न खेळण्याचा निर्णय घेतला होता. हा सामना एक तास उशिराने सुरु होणार आहे.
