शुबमन गिल-यशस्वी जयस्वाल आशिया कप स्पर्धेतून आऊट? या पाच खेळाडूंना बाहेरचा रस्ता
आशिया कप 2025 स्पर्धेसाठी टीम इंडियाची निवड येत्या 10 दिवसात होईल. या संघात दिग्गज खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला जाण्याची शक्यता आहे. यात पाच दिग्गज खेळाडूंची नावं आहे. यात शुबमन गिल आणि यशस्वी जयस्वाल यांची नावंही आहेत.

टीम इंडियाला कसोटी क्रिकेटचं नेतृत्व करणारं भविष्य सापडलं आहे. इंग्लंड दौऱ्यात शुबमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघाने चमकदार कामगिरी केली. शुबमन गिलने नेतृत्वासह फलंदाजीतही कमाल केली. आता भारतीय संघ मायदेशी परतला असून आशिया कप स्पर्धेचे वेध लागले आहेत. त्यामुळे या स्पर्धेसाठी कोणता संघ असेल याची उत्सुकता आहे. असं असताना मिडिया रिपोर्टनुसार, शुबमन गिलसह चार खेळाडू या स्पर्धेत खेळणार नाहीत. आशिया कप स्पर्धा 9 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. चला जाणून घेऊयात त्यांच्याबाबत सविस्तर काय ते
शुबमन गिल : भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुबमन गिलने इंग्लंड कसोटी मालिकेत 754 धावांची खेळी केली. सध्या शुबमन गिल जबरदस्त फॉर्मात आहे. पण आशिया कप स्पर्धेत खेळणार नाही. शुबमन गिल दुलीप ट्रॉफी स्पर्धेत नॉर्थ झोनचं नेतृत्व करणार आहे. त्यामुळे टी20 फॉर्मेटमध्ये त्याला जागा मिळणं कठीण आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन ओपनिंग करतील.
यशस्वी जयस्वाल : टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, यशस्वी जयस्वालला देखील या संघात स्थान मिळणार नाही. कारण वेस्ट झोनसाठी दुलीप ट्रॉफी स्पर्धेत खेळणार आहे. त्यामुळे आशिया कप स्पर्धेत खेळणार नाही. यशस्वी जयस्वालन टी20 फॉर्मेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. पण संघात स्थान मिळणं कठीण दिसत आहे.
केएल राहुल : टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, केएल राहुल देखील आशिया कप स्पर्धेत खेळणार नाही. त्याची संघात निवड होणं कठीण आहे. कारण टी20 साठी टॉप ऑर्डर ते मिडल ऑर्डर पूर्णपणे तयार आहे. त्यामुळे त्याला यात जागा मिळवणं कठीण आहे. संजू सॅमसनच्या रुपाने विकेटकीपर बॅट्समन आहे.
ऋषभ पंत : टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतचा आशिया कप स्पर्धेत काही संबंध येत नाही. कारण इंग्लंड दौऱ्यात त्याच्या बोटाला फ्रॅक्चर झालं आहे. अशा स्थितीत त्याला सहा आठवडे आराम करण्याच सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे त्याचं खेळणं शक्यच नाही.
जसप्रीत बुमराह : जसप्रीत बुमराह देखील आशिया कप स्पर्धेत खेळणार नसल्याची माहिती आहे. चौथ्या कसोटी सामन्यात त्याला दुखापत झाल्याची माहिती आहे. पण याबाबत अधिकृत काहीच समोर आलेलं नाही. त्यामुळे बुमराह देखील निवडीसाठी नसेल.
