AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup : स्टोक्स, रसेल की हार्दिक पांड्या? या तिघांपैकी कोण नंबर वन प्लेअर, वसीम अकरमनं सांगितलं उत्तर…

कोणी भारताचा हार्दिक पंड्या, कोणी इंग्लंडचा बेन स्टोक्स आणि वेस्ट इंडिजचा आंद्रे रसेलला नंबर वनचा खेळाडू म्हणत आहे. यावर वसीम अक्रमनेही मत मांडलं आहे. याविषयी जाणून घ्या..

Asia Cup : स्टोक्स, रसेल की हार्दिक पांड्या? या तिघांपैकी कोण नंबर वन प्लेअर, वसीम अकरमनं सांगितलं उत्तर...
स्टोक्स, रसेल की हार्दिक पांड्या, या तिघांपैकी कोण नंबर वन प्लेअर, वसीमनं दिलं उत्तरImage Credit source: social
| Updated on: Aug 30, 2022 | 6:38 PM
Share

नवी दिल्ली : आशिया चषक स्पर्धेतील (Asia Cup 2022) पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा (IND vs PAK) पाच गडी राखून पराभव केला. टीम इंडियाच्या (Team India) विजयाचा हिरो ठरला अष्टपैलू हार्दिक पांड्या (Hardik Pandya). तीन विकेट घेण्यासोबतच त्याने मॅचविनिंग इनिंगही खेळली. हार्दिकनं 17 चेंडूत नाबाद 33 धावा केल्या. यानंतर सध्याच्या नंबर वन वेगवान अष्टपैलू खेळाडूबाबत सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे. कोणी भारताचा हार्दिक पंड्या, कोणी इंग्लंडचा बेन स्टोक्स आणि वेस्ट इंडिजचा आंद्रे रसेल यांना नंबर वनचा खेळाडू म्हणत आहे. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रमनेही या प्रकरणी आपलं मत मांडलं आहे. त्यानं हार्दिक पांड्याचे वर्णन जगातील महान अष्टपैलू खेळाडू म्हणून केले आहे.

अष्टपैलू खेळाडू

भारत विरुद्ध पाकिस्तान आशिया चषक सामन्यानंतर एका वाहिनीशी बोलताना अक्रम म्हणाला की, ‘माझ्यासाठी हार्दिक सध्या जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू आहे. तो आंद्रे रसेल आणि इतर सर्वांपेक्षा चांगला आहे. हार्दिक फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात चमत्कार करू शकतो.’

त्याच्या खेळीनं सर्वांना थक्क करतो

अक्रम पुढे म्हणाला की, ‘हार्दिकला हे देखील माहित आहे की तो सध्या जगातील महान अष्टपैलू खेळाडू आहे. त्यांचा टॉप स्पीड 140 kmph पेक्षा जास्त आहे. जोपर्यंत फलंदाजीचा प्रश्न आहे, तो सामन्यातील परिस्थिती आणि शक्यतांनुसार आपला डाव पुढे नेतो. ही क्षमता त्याला भारताचा सर्वात महत्त्वाचा खेळाडू बनवते. भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणनेही वसीम अक्रमच्या विधानाशी सहमती दर्शवली. पठाण म्हणाला की, हार्दिक हा खऱ्या अर्थानं भारतासाठी एक्स-फॅक्टर आहे. तो सुरुवातीला आपला वेळ घेतो आणि नंतर त्याच्या खेळीने सर्वांना थक्क करतो.

यंदा एकही टी-20 खेळला नाही

स्टोक्सने या वर्षात इंग्लंडकडून एकही टी-20 खेळलेला नाही. त्याच वेळी, 2020 आणि 2021 मध्ये त्याची कामगिरी फारशी खास नव्हती. 2020 मध्ये स्टोक्सने सहा सामन्यात 126 धावा केल्या होत्या. याशिवाय सहा विकेट्स घेतल्या. त्याच वेळी, 2021 मध्ये, स्टोक्सने पाच सामन्यात 84 धावा केल्या होत्या आणि तीन विकेट घेतल्या होत्या. त्याचवेळी हार्दिकबद्दल सांगायचे तर, या वर्षी त्याने भारतासाठी 14 टी-20 सामने खेळले असून, 144 च्या स्ट्राइक रेटने 314 धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने 11 विकेट्सही घेतल्या आहेत.

रसेलविषयी जाणून घ्या…

2020 मध्ये हार्दिकने तीन टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. यामध्ये त्याने 156 च्या स्ट्राईक रेटने 78 धावा केल्या. हार्दिकने २०२० मध्ये एकदाही गोलंदाजी केली नाही. 2021 मध्ये, हार्दिकने 11 T20 मध्ये 139.83 च्या स्ट्राइक रेटने 165 धावा केल्या आणि एकही विकेट घेऊ शकला नाही. 2022 मध्ये हार्दिकच्या कामगिरीत बरीच सुधारणा झाली आहे. त्याचवेळी वेस्ट इंडिजच्या रसेलसाठी गतवर्ष खूप चांगले होते.

छोटा पुढारी गावागावात... काय आहे गावगाड्यात सुरू; गुलाल कुणाचा उधळणार?
छोटा पुढारी गावागावात... काय आहे गावगाड्यात सुरू; गुलाल कुणाचा उधळणार?.
तुम्हीही काही धुतल्या तांदळासारखे नाहीत, नाईकांना सुनावले
तुम्हीही काही धुतल्या तांदळासारखे नाहीत, नाईकांना सुनावले.
गायिका अंजली भारतींच्या वादग्रस्त वक्तव्यावर किशोरी पेडणेकरांचा निषेध
गायिका अंजली भारतींच्या वादग्रस्त वक्तव्यावर किशोरी पेडणेकरांचा निषेध.
आदिवासी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होतात परंतु अंमलबजावणी...
आदिवासी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होतात परंतु अंमलबजावणी....
औकातीत राहा... नाईक-शिंदे वादात या महिला नेत्याची उडी
औकातीत राहा... नाईक-शिंदे वादात या महिला नेत्याची उडी.
आरती केली, अन्... सयाजी शिंदेंनी केला झाडाचा दणक्यात वाढदिवस
आरती केली, अन्... सयाजी शिंदेंनी केला झाडाचा दणक्यात वाढदिवस.
कोश्यारींना पुरस्कार मिळताच महाराष्ट्रात संतापाची लाट
कोश्यारींना पुरस्कार मिळताच महाराष्ट्रात संतापाची लाट.
पुन्हा परीक्षा पे चर्चा, भारतात किती विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग?
पुन्हा परीक्षा पे चर्चा, भारतात किती विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग?.
आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या ZP निवडणुकांची मोठी अपडेट सुनावणीची तारीख..
आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या ZP निवडणुकांची मोठी अपडेट सुनावणीची तारीख...
महापौर निवड प्रक्रियेला वेग; भाजप- सेना वेगवेगळा गट स्थापन करणार?
महापौर निवड प्रक्रियेला वेग; भाजप- सेना वेगवेगळा गट स्थापन करणार?.