AUS vs ENG Ashes 2nd Test, Day 4: ऑस्ट्रेलियाला लागोपाठ दोन झटके, इंग्लंड कमबॅक करेल ?

हॅरिसला स्टुअर्ट ब्रॉडने बटलरकरवी झेलबाद केले, तर नेसरला अँडरसनने क्लीन बोल्ड केले. आता क्रीझवर कर्णधार स्मिथ आणि मागच्या सामन्यातील शतकवीर लाबुशेनची जोडी मैदानावर आहे.

AUS vs ENG Ashes 2nd Test, Day 4: ऑस्ट्रेलियाला लागोपाठ दोन झटके, इंग्लंड कमबॅक करेल ?
Follow us
| Updated on: Dec 19, 2021 | 10:20 AM

मेलबर्न: अ‍ॅडलेड ओव्हल मैदानावर इंग्लंड-ऑस्ट्रेलियामध्ये चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. अ‍ॅशेस मालिकेतील (Ashes series) हा दुसरा कसोटी सामना आहे. या डे-नाईट कसोटीत इंग्लंड बॅकफूटवर असून यजमान ऑस्ट्रेलियाने कसोटीवर आपली पकड अधिक घट्ट केली आहे. आज सकाळच्या सत्रात प्रारंभीच ऑस्ट्रेलियाला दोन धक्के बसले आहेत. कालच्या एक बाद 45 वरुन डाव पुढे सुरु केल्यानंतर नाईट वॉचमन मायकल नेसर (3) आणि सलामीवीर मार्कस हॅरिस (23) झटपट बाद झाले.

हॅरिसला स्टुअर्ट ब्रॉडने बटलरकरवी झेलबाद केले, तर नेसरला अँडरसनने क्लीन बोल्ड केले. आता क्रीझवर कर्णधार स्मिथ आणि मागच्या सामन्यातील शतकवीर लाबुशेनची जोडी मैदानावर आहे. ऑस्ट्रेलियाकडे 290 धावांची भक्कम आघाडी आहे. इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखण्याचे लक्ष्य असेल. ऑस्ट्रेलियाने 500 धावापर्यंत मजल मारली, तर इंग्लंडला कसोटी जिंकणे अवघड होऊन बसेल. कर्णधार जो रुट दुखापतीमुळे आज मैदानावर उतरलेला नाहीय.

अ‍ॅशेस मालिकेत इंग्लंड आधीच 1-० ने पिछाडीवर आहे. काल इंग्लंडचा पहिला डाव 236 धावात आटोपला. इंग्लंडंकडून डेविड मलान आणि जो रुट यांचा अपवाद वगळता अन्य फलंदाजांनी निराशा केली. बेन स्टोक्स (34) आणि ख्रिस वोक्स (24) यांनी थोडाफार प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मलानने सर्वाधिक (80) आणि रुटने (62) धावा केल्या. दोघांनी दोन बाद 17 वरुन सकाळी डाव पुढे सुरु केल्यानंतर आश्वासक फलंदाजी केली. तिसऱ्या विकेटसाठी त्यांनी 138 धावांची भागीदारी केली.

संबंधित बातम्या: अंधेर नगरी चौपट राजा…गैरकारभाराचे बिंग फोडले म्हणून नाशिकमध्ये महिला वकिलावर भरदिवसा पेट्रोलहल्ला मुंबई NCB ला नवा प्रमुख मिळणार , समीर वानखेडेंचा कार्यकाळ संपणार, नेमकं कारण काय? राणे ज्या पक्षात जातात त्यांची सत्ता जाते, मोदी साहेबांनाही धोका होऊ शकतो: दीपक केसरकर

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.