AUS vs ENG, Ashes 2nd Test, Day 4: ऑस्ट्रेलियासमोर हतबल इंग्लंड पराभवाच्या छायेत

या स्थितीतून उद्या इंग्लंडने कसोटी सामना वाचवला, तरी ती मोठी गोष्ट ठरेल. ऑस्ट्रेलियाने आज एक बाद 45 वरुन डाव पुढे सुरु केल्यानंतर दुसऱ्या डावात नऊ विकेट गमावून 230 धावांवर डाव घोषित केला.

AUS vs ENG, Ashes 2nd Test, Day 4: ऑस्ट्रेलियासमोर हतबल इंग्लंड पराभवाच्या छायेत
Follow us
| Updated on: Dec 19, 2021 | 6:00 PM

मेलबर्न : अ‍ॅडलेड कसोटीत (Adelaide Test) विजय ऑस्ट्रेलियाच्या दृष्टीपथात आला आहे. पहिल्या दिवसापासून या डे-नाईट कसोटी सामन्यावर ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व आहे. आज चौथ्या दिवसाचा खेळ संपताना इंग्लंच्या चार बाद 86 धावा झाल्या होत्या. इंग्लंडला विजयासाठी 386 धावांची आवश्यकता आहे. यजमान ऑस्ट्रेलियाने इंग्लंडसमोर 468 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रुट आणि डेविड मलान यांच्यासारखे फॉर्ममध्ये असलेले फलंदाज बाद झाल्याने इंग्लंडची अवस्था बिकट आहे.

या स्थितीतून उद्या इंग्लंडने कसोटी सामना वाचवला, तरी ती मोठी गोष्ट ठरेल. ऑस्ट्रेलियाने आज एक बाद 45 वरुन डाव पुढे सुरु केल्यानंतर दुसऱ्या डावात नऊ विकेट गमावून 230 धावांवर डाव घोषित केला. ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात मार्नस लाबुशेन आणि ट्रेविड हेडने अर्धशतकी खेळी केली.

इंग्लंडचे दोन्ही सलामीवर रोरी बर्न्स (34) आणि हासीब हमीद (०) तंबूत परतले आहेत. उद्या ऑस्ट्रेलियाच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लिश फलंदाजांची कसोटी असेल. अ‍ॅशेस मालिकेतील पहिली कसोटी आधीच इंग्लंडने गमावली आहे. मालिकेत ते 1-0 ने पिछाडीवर आहेत. मालिकेतील हा दुसरा कसोटी सामना आहे. इंग्लंडचा पहिला डाव 236 धावात आटोपला.

अ‍ॅशेस मालिकेत कोरोनाची एंट्री अ‍ॅडलेड ओव्हल मैदानावर (Adelaide Oval) सुरु असलेल्या अ‍ॅशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याचे प्रसारण करणाऱ्या ब्रॉडकास्ट क्रू मधील एका सदस्याला कोरोनाची लागण (Corona virus) झाली आहे. त्याचा कोविड-१९ चा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सामना स्थळाच्या आयोजकांकडून पत्रक जारी करुन रविवारी ही माहिती देण्यात आली. संबंधित परिसर सॅनिटाईज करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या: स्टीव्ह स्मिथचे बेडरुममधील चाळे पत्नीने केले उघड, मध्यरात्री एकच्या सुमारास…. ‘भारतीयही बोलतील, आमच्याकडे बाबर-रिझवान सारखे खेळाडू नाहीत’, पाकच्या माजी क्रिकेटपटूने उधळली मुक्ताफळं Ind vs SA: केएल राहुल उपकर्णधार झाल्याने मुंबईकर अजिंक्य रहाणेचं संघातील स्थान धोक्यात? 26 डिसेंबरला काय होणार?

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.