AUS vs IND : टीम इंडियाकडून फायनल टी 20I साठी मोठा बदल, मॅचविनर खेळाडूचा पत्ता कट, कुणाला संधी?

Australia vs India 5th T20I Toss Result and Playing 11 : ऑस्ट्रेलियाने पराभवानंतरही पाचव्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये एकही बदल केलेला नाही. तर टीम इंडियाने फिनिशरचा अंतिम 11 मध्ये समावेश केला आहे.

AUS vs IND : टीम इंडियाकडून फायनल टी 20I साठी मोठा बदल, मॅचविनर खेळाडूचा पत्ता कट, कुणाला संधी?
Australia vs India 5th T20I Toss
Image Credit source: Bcci x Account
Updated on: Nov 08, 2025 | 2:03 PM

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया पाचव्या आणि अंतिम टी 20I सामन्याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून राहिलं आहे. टीम इंडियाने या मालिकेतील तिसरा आणि चौथा सामना जिंकून मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली. त्यामुळे भारताला पाचव्या टी 20I मध्ये सलग तिसरा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला ऑस्ट्रेलियासमोर हा सामना जिंकून मालिकेत 2-2 ने बरोबरी करण्याचं आव्हान आहे. त्यामुळे चाहत्यांना या सामन्यात दोन्ही संघात चुरस पाहायला मिळणार आहे.

टीम इंडियाची बॅटिंग

उभयसंघातील पाचवा सामना हा ब्रिस्बेन येथील द गाबा इथे होणार आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजून 45 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 1 वाजून 15 मिनिटांनी टॉस झाला. पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कॅप्टन मिचेल मार्श याने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेत भारताला फलंदाजीसाठी भाग पाडलं आहे.

टीम इंडियाकडून एकमेव बदल

कॅप्टन सूर्यकुमार यादव याने या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये 1 बदल केला आहे. त्यानुसार फिनीशर रिंकु सिंह याला मिडल ऑर्डरमधील मॅच विनर बॅट्समन तिलक वर्मा याच्या जागी संधी देण्यात आली आहे. तिलकने भारतासाठी आशिया कप 2025 फायनलमध्ये आणि त्यानंतर चांगली कामगिरी केलीय. मात्र त्यानंतरही निर्णायक सामन्यासाठी तिलकला संधी देण्यात आली नाही. सूर्याने तिलकला विश्रांती दिल्याचं सांगितलं. तिलकला दुखापत नसूनही त्याला विश्रांती का दिली? असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

तर दुसऱ्या बाजूला ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमने प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. ऑस्ट्रेलियाने चौथ्या टी 20I सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये 4 बदल केले होते. आता त्याच खेळाडूंसह ऑस्ट्रेलिया उतरणार आहे.

पुन्हा भारताच्या विरोधात नाणेफकीचा कौल

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि वरुण चक्रवर्ती.

ऑस्ट्रेलियाचे 11 शिलेदार : मिचेल मार्श (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, जोश इंग्लिस (विकेटकीपर), टीम डेव्हिड, जोश फिलिप, मार्कस स्टोयनिस, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस, ग्लेन मॅक्सवेल, बेन द्वारशुइस, आणि अॅडम झॅम्पा.