AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AUS vs IND Semi Final Live Streaming : टीम इंडियासमोर ऑस्ट्रेलियाचं आव्हान, उपांत्य फेरीत कांगारुंना लोळवणार?

Australia vs India Womens World Cup 2025 Semi Final Live Match Score : दक्षिण आफ्रिकेसमोर आयसीसी वनडे वुमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेतील अंतिम फेरीत कोणत्या संघाचं आव्हान असणार? हे 30 ऑक्टोबरला निश्चित होणार आहे.

AUS vs IND Semi Final Live Streaming : टीम इंडियासमोर ऑस्ट्रेलियाचं आव्हान, उपांत्य फेरीत कांगारुंना लोळवणार?
AUS vs IND Womens Semi Final World Cup2025 Live StreamingImage Credit source: Bcci
| Updated on: Oct 29, 2025 | 11:02 PM
Share

आयसीसी वनडे वुमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेत उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडवर मात केली. दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडचा धुव्वा उडवत साखळी फेरीतील पहिल्या पराभवाची अचूक परकफेड केली. तसेच दक्षिण आफ्रिकेने वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली. आता या स्पर्धेत उपांत्य फेरीतील दुसऱ्या सामन्यात यजमान टीम इंडिया विरुद्ध गतविजेता ऑस्ट्रेलिया आमनेसामने असणार आहेत.हरमनप्रीत कौर टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर ताहिली मॅकग्राथ ऑस्ट्रेलियाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळणार आहे. उभयसंघातील हा सामना कधी आणि कुठे होणार? हे जाणून घेऊयात.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया सेमी फायनल मॅच केव्हा?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया सेमी फायनल मॅच गुरुवारी 30 ऑक्टोबरला होणार आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया सेमी फायनल मॅच कुठे?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया सेमी फायनल मॅच नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये होणार आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे. तर अडीच वाजता टॉस होणार आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळणार?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तसेच टीव्ही 9 मराठी या वेबसाईटवर सामन्याबाबत प्रत्येक अपडेट्स जाणून घेता येतील.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे पाहायला मिळेल.

टीम इंडिया साखळी फेरीतील पराभवाची परतफेड करणार?

दरम्यान ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया दोन्ही संघ या स्पर्धेत साखळी फेरीनंतर पहिल्यांदा आमनेसामने असणार आहे. याआधी दोन्ही संघ 12 ऑक्टोबरला साखळी फेरीत भिडले होते. या सामन्यात भारताने 300 पार मजल मारली होती. भारताने ऑस्ट्रेलियासमोर 331 धावांचं आव्हान ठेवलं होतं. त्यामुळे टीम इंडिया हा सामना जिंकेल, अशी आशा चाहत्यांना होती. मात्र ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 49 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून पूर्ण केलं होतं.

भारताला आता या साखळी फेरीतील पराभवाची परतफेड करत वर्ल्ड कप ट्रॉफीच्या आणखी जवळ जाण्याची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा पुन्हा एकदा अंतिम फेरीत धडक देण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे आता अंतिम सामन्यात पोहचणारा दुसरा संघ कोणता असणार? यासाठी चाहत्यांना आणखी काही तास प्रतिक्षा करावी लागणार आहे.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.