AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AUS vs PAK : ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात पराभूत करणार, कॅप्टन मोहम्मद रिझवानला विश्वास

Pakistan Muhammad Rizwan : बाबर आझम याच्या जागी मोहम्मद रिझवान याला पाकिस्तानचा टी 20i आणि वनडे कॅप्टन करण्यात आलं आहे. पाकिस्तान मोहम्मद रिझवान याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलिया दौरा करणार आहे.

AUS vs PAK : ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात पराभूत करणार, कॅप्टन मोहम्मद रिझवानला विश्वास
Muhammad Rizwan pakistanImage Credit source: AP
| Updated on: Oct 29, 2024 | 12:21 AM
Share

पाकिस्तानचा विकेटकीपर फलंदाज मोहम्मद रिझवान याची टी 20I आणि एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बाबर आझम याने टी 20I वर्ल्ड कप 2024 नंतर कर्णधारपदाचा राजीनामा दिल्याने रिझवानची कॅप्टन म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मोहम्मद रिझवान ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून कर्णधारपदाचा पदभार स्वीकारणार आहे. पाकिस्तान ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टी 20i आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. रिझवान कर्णधारपद मिळाल्यानंतर भरभरून बोलला. रिझवानचा हा व्हीडिओ पाकिस्तान क्रिकेटने एक्स अकाउंटवरुन पोस्ट केला आहे.

पाकिस्तानने नुकतंच मायदेशात 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडवर 2-1 ने विजय मिळवला आहे. त्यामुळे पाकिस्तानचा विश्वास दुणावलेला आहे. या मालिकेतील विजयानंतर आम्ही ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरात पराभूत करण्यात यशस्वी होऊ, असा विश्वास रिझवानने व्यक्त केला. यात कोणतीच शंका नाही की आम्हाला ऑस्ट्रेलियात अडचण आली होती.  मागील आकड्यांवरुनच स्पष्ट होतं की आम्हाला तिथे अडचणींचा सामना करावा लागला, मात्र यंदा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणाऱ्या टीमकडून अपेक्षा ठेवू शकता, असंही रिझवानने म्हटलं.

“ऑस्ट्रेलियात गेल्या मालिकेतही आम्ही खेळलो तेव्हा प्रत्येक सामना जिंकू, अशीच स्थिती होती. मात्र फार जवळ येऊन पराभूत झालो. आम्ही काही गोष्टींची नोंद घेतली आहे आणि तिथे गेल्यावर त्यावर अधिक लक्ष केंद्रीत करु. आम्हाला प्रत्येक बाब सकारात्मकने घ्यायची गरज आहे. आम्ही यावेळेस ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात पराभूत करणार”, असंही रिझवानने म्हटलं. बाबर आझम याला दुखापत झाल्याने रिझवानने 2020 साली न्यूझीलंड विरुद्ध नेतृत्वाची जबाबदारी सांभाळली होती.

मोहम्मद रिझवान काय म्हणाला?

ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं वेळापत्रक

एकदिवसीय मालिका

पहिला सामना, सोमवार 4 नोव्हेंबर, मेलबर्न

दुसरा सामना, शुक्रवार 8 नोव्हेंबर, एडलेड

तिसरा सामना, रविवार 10 नोव्हेंबर, पर्थ

टी 20i सीरिज

पहिला सामना, गुरुवार 14 नोव्हेंबर, ब्रिस्बेन

दुसरा सामना, शनिवार 16 नोव्हेंबर, सिडनी

तिसरा सामना, 18 नोव्हेंबर, होबार्ट

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी पाकिस्तान टीम

एकदिवसीय संघ : मोहम्मद रिझवान (कॅप्टन आणि विकेटकीपर), आमिर जमाल, अब्दुल्ला शफीक, अराफात मिन्हास, बाबर आजम, फैसल अकरम, हारिस रऊफ, हसीबुल्लाह (विकेटकीपर), कामरान गुलाम, मोहम्मद हसनैन, मुहम्मद इरफान खान, नसीम शाह, सईम अयूब, सलमान अली आगा आणि शाहीन शाह अफरीदी.

टी20 टीम : मोहम्मद रिझवान (कॅप्टन आणि विकेटकीपर), अराफात मिन्हास, बाबर आजम, हारिस रऊफ, हसीबुल्लाह, जहांदाद खान, मोहम्मद अब्बास अफरीदी,मोहम्मद इरफान खान, नसीम शाह, ओमैर बिन यूसुफ, साहिबजादा फरहान, सलमान अली आगा, शाहीन शाह अफरीदी, सुफियान मोकीम, उस्मान खान.

टी 20I सीरिजसाठी ऑस्ट्रेलिया टीम : सीन एबॉट, झेव्हियर बार्टलेट, कूपर कोनोली, टीम डेव्हिड, नाथन एलिस, झॅक फ्रेजर-मॅकगर्क, आरोन हार्डी, जोश इंग्लिस, स्पेंसर जॉन्सन, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू शॉर्ट, मार्कस स्टोयनिस आणि एडम झॅम्पा.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.