IND vs AUS : टेस्ट-वनडे सीरिजसाठी टीम जाहीर, शॉला संधी, पहिला सामना केव्हा?
Australia A tour of India 2025 : क्रिकेट वर्तुळातून या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने भारत दौऱ्यातील एकूण 5 सामन्यांसाठी अ संघाची घोषणा केली आहे.

टीम इंडियाने इंग्लंड दौऱ्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका 2-2 ने बरोबरीत सोडवली. त्यानंतर आता टीम इंडिया थेट आशिया कप 2025 स्पर्धेच्या निमित्ताने मैदानात उतरणार आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना अनेक दिवस प्रतिक्षा करावी लागणार आहे. तर आशिया कप स्पर्धेदरम्यान ऑस्ट्रेलियाचा ए संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध टीम इंडिया ए यांच्यात एकूण 5 सामने होणार आहेत. उभयसंघात 2 चार दिवसीय सामने होणार आहेत. तर त्यानंतर 3 अनऑफिशियल एकदिवसीय सामन्यांचा थरार रंगणार आहे. अशाप्रकारे एकूण 5 सामन्यांसाठी ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने 14-14 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे.
भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाने वरिष्ठ संघातील काही खेळाडूंचा समावेश केला आहे. तसेच या संघात विराट कोहलीला आऊट करणाऱ्या खेळाडूला संधी देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेटने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.
टॉड मर्फीला संधी
निवड समितीने ऑस्ट्रेलियाच्या वरिष्ठ संघाकडून 7 कसोटी सामने खेळलेल्या टॉड मर्फी याला भारत दौऱ्यातील दोन्ही मालिकांसाठी संधी देण्यात आली आहे. मर्फीने 2023 साली 3 कसोटी सामन्यांमधील 6 पैकी 4 डावांत विराट कोहली याला आऊट केलं होतं. मर्फीला भारतात खेळण्याचा अनुभव आहे. त्यामुळे मर्फीच्या अनुभवाचा फायदा ऑस्ट्रेलिया ए टीमला होऊ शकतो.
सॅम कॉन्स्टासचा समावेश
तसेच ऑस्ट्रेलियाच्या वरिष्ठ संघातील सॅम कॉन्स्टास यालाही भारत दौऱ्यासाठी संधी देण्यात आली आहे. सॅमने काही महिन्यांपूर्वी झालेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेत टीम इंडिया विरुद्ध पदार्पण केलं होतं.
2 अनधिकृत कसोटी सामन्यांचं वेळापत्रक
पहिला सामना, 16 ते 19 सप्टेंबर, लखनौ
दुसरा आणि अंतिम सामना, 23 ते 26 सप्टेंबर, लखनौ
3 अनऑफिशियल वनडे सीरिजचं वेळापत्रक
पहिला सामना, 30 सप्टेंबर, ग्रीन पार्क, कानपूर
दुसरा सामना, 3 ऑक्टोबर, ग्रीन पार्क, कानपूर
तिसरा सामना, 5 ऑक्टोबर, ग्रीन पार्क, कानपूर
चार दिवसीय सामन्यांसाठी ऑस्ट्रेलिया ए टीम : झेव्हीयर बार्टलेट, सॅम कॉनस्टास, फर्गस ओनील, कूपर कोनोली, झॅक एडवर्ड्स, आरोन हार्डी, कँपबेल केलावे, नॅथन मॅकस्वीनी, लांस मॉरिस, टॉड मर्फी, ओलिवर पीक, जोश फिलिप, कोरी रोचिचियोली आणि लियाम स्कॉट.
ऑस्ट्रेलिया ए वनडे टीम : कूपर कोनोली, झॅक एडवर्ड्स, हॅरी डिक्सन, सॅम इलियट, जेक फ्रेजर-मॅकगर्क, आरोन हार्डी, मँकेंजी हार्वे, टॉड मर्फी, तनवीर संघा, लियाम स्कॉट, लॅची शॉ, टॉम स्ट्रॅकर, विल सदरलँड आणि कॅलम विडलर.
