AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS 3rd Test : पराभवामुळे टीम इंडियाच WTC फायनलमधील प्रवेशाच गणित बघिडलं? पुढे काय?

IND vs AUS 3rd Test : ऑस्ट्रेलियान इंदोर कसोटीत भारताला हरवून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाने आपलं खात उघडलय.

IND vs AUS 3rd Test : पराभवामुळे टीम इंडियाच WTC फायनलमधील प्रवेशाच गणित बघिडलं? पुढे काय?
ind vs ausImage Credit source: PTI
| Updated on: Mar 03, 2023 | 11:45 AM
Share

IND vs AUS 3rd Test : ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताला 9 विकेटने हरवलं. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाने आपलं खात उघडलय. चार कसोटी सामन्यांच्या या सीरीजमध्ये टीम इंडिया पराभवानंतरही 2-1 ने आघाडीवर आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी टीम इंडियाकडेच रहाणार आहे. मात्र इंदोर कसोटी गमावल्यामुळे WTC फायनलमध्ये टीम इंडियाचा प्रवेश अडचणीत सापडला आहे. ऑस्ट्रेलियाने इंदोरमध्ये बाजी मारली व वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश केला.

भारताला WTC च्या फायनलमध्ये प्रवेशासाठी आता चौथ्या कसोटीची वाट पहावी लागणार आहे. सीरीजचा चौथा कसोटी सामना टीम इंडियासाठी आयसीसीच्या सेमीफायनलसारखा असेल.

चौथा कसोटी सामना कधी?

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये चौथा कसोटी सामना अहमदाबादमध्ये 9 मार्चपासून खेळला जाणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियाला काहीही करुन हा कसोटी सामना जिंकावाच लागेल.

फायनलच्या शर्यतीत भारतासोबत कुठली टीम?

टीम इंडियाला चौथ्या कसोटी सामन्यात विजय मिळवता आला नाही, तर त्यांना नशिबावर अवलंबून रहाव लागेल. फायनलच्या शर्यतीत टीम इंडिया बरोबर श्रीलंकेची टीम सुद्धा आहे. अहमदाबादचा कसोटी सामना ड्रॉ राहिला, तरी टीम इंडियाच्या अडचणी वाढतील. त्याचवेळी श्रीलंकेसाठी फायनलचे दरवाजे उघडू शकतात. न्यूझीलंड विरुद्ध 2 टेस्ट मॅच

श्रीलंका या महिन्यात न्यूझीलंड विरुद्ध 2 कसोटी सामने खेळणार आहे. त्यांनी किवी टीमला क्लीन स्वीप केलं, तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्याची श्रीलंकेची शक्यता वाढेल. 68.52 पॉइंटसह ऑस्ट्रेलियाची टीम टॉपवर आहे. त्यांनी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारत 60.29 पॉइंटसह दुसऱ्या आणि श्रीलंका 55.33 पॉइंटसह तिसऱ्या स्थानावर आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.