AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BBL: बाबर आझमचा उद्धटपणा! मैदानाबाहेर जाताना सर्वांसमोर केलं असं कृत्य

बिग बॅश लीग स्पर्धेत सिडनी सिक्सर्स आणि सिडनी थंडर यांच्यात सामना पार पडला. हा सामना बाबर आझम खेळत असलेल्या सिडनी सिक्सर्सने 5 विकेट राखून जिंकला. पण संघाच्या विजयानंतरही बाबर आझम हा खलनायक ठरला. कसं काय ते समजून घ्या..

BBL: बाबर आझमचा उद्धटपणा! मैदानाबाहेर जाताना सर्वांसमोर केलं असं कृत्य
BBL: बाबर आझमचा उद्धटपणा! मैदानाबाहेर जाताना सर्वांसमोर केलं असं कृत्यImage Credit source: Getty Images
| Updated on: Jan 16, 2026 | 9:02 PM
Share

पाकिस्तानी खेळाडू बिग बॅश लीग 2025-26 स्पर्धेत खेळत आहेत. त्यामुळे त्यांना एक चांगलं व्यासपीठ मिळाल्याची भावना क्रीडाप्रेमी व्यक्त करत आहेत. पण या व्यासपीठावर पाकिस्तानी क्रिकेटपटूंची सुमार कामगिरी सुरू आहे. कारण या स्पर्धेत पाकिस्तानच्या सर्वच खेळाडूंनी निराशा केली. आता त्यांच्या कृतीमुळे पाकिस्तानचं नाक कापलं जात आहे. बाबर आझमने सिडनी थंडरविरुद्धच्या सामन्यात संथ गतीने फलंदाजी केली. त्यामुळे आधीच क्रीडाप्रेमींनी संताप व्यक्त केला होता. एका बाजूने स्टीव्ह स्मिथ आक्रमक खेळी करून संघाला विजयाच्या वेशीवर घेऊन जात होता. तर दुसऱ्या बाजूला बाबर आझमच्या संथ खेळीमुळे संघ अडचणीत येतो की काय अशी भावना निर्माण झाली होती. 11व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर बाबर आझम एक धाव घेण्याच्या प्रयत्नात होता. पण स्टीव्ह स्मिथने त्याला नकार दिला. त्यामुळे बाबरचा संताप झाला. स्टीव्ह स्मिथला पुढे पावरप्लेचं षटक खेळायचं होतं. त्यामुळे त्याने नकार दिला.

स्टीव्ह स्मिथने पुढच्या षटकात सलग 6 षटकार मारले आणि पाचव्या चेंडूवर 4 मारला. या षटकात एकूण 32 धावा आल्या. त्यानंतरच्या म्हणजेच 13व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर बाबर आझम बाद झाला. त्यामुळे त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. कारण आधीच्या षटकात स्ट्राईक न देता बाबर आझमची लाज काढली होती. त्यात पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्यामुळे मैदानाबाहेर जाताना त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट राग होता. त्याने सीमेरेषेजवळ गेला आणि जोरात बॅट फिरवली. त्याच्या अशा वागण्यावर आता टीका होत आहे.

सिडनी थंडर्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी गमवून 189 धावा केल्या. तसेच विजयासाठी 190 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान सिडनी सिक्सर्सने 17.2 षटकात 5 गडी गमवून पूर्ण केलं. या विजयाचा शिल्पकार ठरला तो कर्णधार स्टीव्ह स्मिथ.. त्याने 42 चेंडूत 5 चौकार आणि 9 षटकार मारत 100 धावा केल्या. स्टीव्ह स्मिथ म्हणाला की, ‘ही एक चांगली विकेट होती, अर्थातच 190 धावांचा पाठलाग करताना सुरुवात चांगली करावी लागली. बाबर आणि माझी तिथे खूप छान भागीदारी झाली ज्यामुळे प्लॅटफॉर्म तयार झाला. मग सर्जवर पोहोचलो आणि वेळ आली. तर, सर्जवर कुंपणावरून काही मारले आणि आम्हाला शर्यतीत पुढे आणले.’

अहिल्यानगरमध्ये भाजप - राष्ट्रवादीचा दणदणीत विजय
अहिल्यानगरमध्ये भाजप - राष्ट्रवादीचा दणदणीत विजय.
मुंबई प्रभाग 199 मध्ये ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा विजय
मुंबई प्रभाग 199 मध्ये ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा विजय.
निवडणूक आयोगाच्या निकालानुसार मुंबईत लागलेले निकाल आले समोर
निवडणूक आयोगाच्या निकालानुसार मुंबईत लागलेले निकाल आले समोर.
Pune Muncipal Result Updates : रवींद्र धंगेकरांच्या पत्नीचा पराभव!
Pune Muncipal Result Updates : रवींद्र धंगेकरांच्या पत्नीचा पराभव!.
मुंबईत MIM चा विजयी पंजा. प्रभाग क्रमांक 139 मधून शबाना शेख यांचा विजय
मुंबईत MIM चा विजयी पंजा. प्रभाग क्रमांक 139 मधून शबाना शेख यांचा विजय.
पवारांच्या तुतारीचा आवाज बंद!अजितदादांच्या घड्याळाचे काटेही उलटे फिरले
पवारांच्या तुतारीचा आवाज बंद!अजितदादांच्या घड्याळाचे काटेही उलटे फिरले.
वसंतदादा पाटलाचं पणतू हर्षवर्धन पाटील विजयी!
वसंतदादा पाटलाचं पणतू हर्षवर्धन पाटील विजयी!.
अनेक पालिकांचे निकाल लागले, मुंबईच्या निकालाची प्रतीक्षा! काय आहे कल?
अनेक पालिकांचे निकाल लागले, मुंबईच्या निकालाची प्रतीक्षा! काय आहे कल?.
'डॅडी' अरूण गवळी यांची हवा, पण दोन्ही मुलींचा दारूण पराभूत
'डॅडी' अरूण गवळी यांची हवा, पण दोन्ही मुलींचा दारूण पराभूत.
नवी मुंबईत प्रभाग क्रमांक 8 मध्ये गणेश सपकाळ यांचा दणदणीत विजय
नवी मुंबईत प्रभाग क्रमांक 8 मध्ये गणेश सपकाळ यांचा दणदणीत विजय.