AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BAN vs IND : कर्णधाराला बांगलादेशचा पराभव जिव्हारी, रोहित शर्माचं नाव घेत म्हणाला..

Bangladesh vs India CT 2025 Post Match : बांगलादेशचा कर्णधार नजमूल हुसैन शांतो याला पराभवाचा धक्का असह्य झालाय. टीम इंडियाने 6 विकेट्सने विजय मिळवल्यानंतर बांगलादेशचा कॅप्टन काय म्हणाला?

BAN vs IND : कर्णधाराला बांगलादेशचा पराभव  जिव्हारी, रोहित शर्माचं नाव घेत म्हणाला..
Najmul Hossain Shanto On Rohit Sharma
| Updated on: Feb 20, 2025 | 11:58 PM
Share

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत पाकिस्ताननंतर आणखी एका आशियाई संघाला पराभूत व्हावं लागलं आहे. टीम इंडियाने बांगलादेशवर 6 विकेट्सने मात करत स्पर्धेत विजयी सलामी दिली. भारताने विजयासाठी मिळालेलं 229 धावांचं माफक आव्हान हे 4 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पूर्ण केलं. शुबमन गिल याचं नाबाद शतक आणि केएल राहुलची निर्णायक खेळीमुळे भारताला सहज विजयी होता आलं. शुबमन आणि केएल या दोघांनी नाबाद खेळी केली. शुबमनने 101 तर केएलने 41 धावांचं योगदान दिलं. बांगलादेशचा पराभव कर्णधार नजमुल हुसैन शांतोला चांगलाच जिव्हारी लागला. नजमूलने पराभवानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या नावाचा उल्लेख केला. नजमूल काय म्हणाला? हे जाणून घेऊयात.

बांगलादेशचा कर्णधार काय म्हणाला?

टीम इंडिया बॅटिंगसाठी आली तेव्हा आम्ही सुरुवातीला विकेट्स घेतल्या असत्या तर निकाल वेगळा असता, ज्यामुळे सामन्यात फरक पडला असता, असं नजमूलने म्हटलं. नजमूलच्या या प्रतिक्रियेवरुन शुबमन गिल आणि रोहित शर्मा या दोघांनी केलेली 69 धावांची सलामी भागीदारी ही पराभवासाठी कारणीभूत असल्याचं स्पष्ट होतंय. नजमुलनुसार जर बांगलादेशच्या गोलंदाजांनी विकेट्स घेतल्या असत्या तर सामना बदलला असता.

“आम्ही ज्या पद्धतीने पावर प्लेमध्ये बॅटिंग केली, त्यामुळे आम्हाला पराभवाचा सामना करावा लागला. पुढे बॅटिंगसाठी येणाऱ्या फलंदाजांना या अशा प्रतिकूल स्थितीतून बाहेर येणं अवघड होतं. तॉहिद हृदॉय आणि जाकीर या दोघांनी ज्या पद्धतीने बॅटिंग केली ते अप्रतिम होतं”, असंही नजमूलने स्पष्ट केलं.

शुबमन गिल ‘मॅन ऑफ द मॅच’

दरम्यान शुबमन गिल याने 129 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 9 फोरसह नॉट आऊट 101 रन्स केल्या. शुबमनचं हे एकदिवसीय कारकीर्दीतील आठवं शतक ठरलं. शुबमनला या शतकी खेळीसाठी मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव.

बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तांझीद हसन, सौम्या सरकार, तॉहिद हृदॉय, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), मेहदी हसन मिराज, जाकेर अली, रिशाद हुसेन, तन्झीम हसन साकिब, तस्किन अहमद आणि मुस्तफिजुर रहमान.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.