AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टीम इंडियाच्या दौऱ्याआधी वेस्ट इंडिज क्रिकेटमध्ये हाहाकार, कॅप्टन निकोलस पूरन बोलायलाही तयार नाही

टीम इंडिया सध्या इंग्लंड (IND vs ENG) मध्ये आहे. वनडे सीरीजचे दोन सामने बाकी आहेत. ही सीरीज संपल्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवाना होईल.

टीम इंडियाच्या दौऱ्याआधी वेस्ट इंडिज क्रिकेटमध्ये हाहाकार, कॅप्टन निकोलस पूरन बोलायलाही तयार नाही
nicholas pooran
| Updated on: Jul 14, 2022 | 1:03 PM
Share

मुंबई: टीम इंडिया सध्या इंग्लंड (IND vs ENG) मध्ये आहे. वनडे सीरीजचे दोन सामने बाकी आहेत. ही सीरीज संपल्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवाना होईल. वेस्ट इंडिज दौऱ्यात भारतीय संघ तीन वनडे आणि पाच टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारतीय संघ वेस्ट इंडिज (India west indies Tour) मध्ये पोहोचण्याआधी तिथल्या क्रिकेट मध्ये हाहाकार उडाला आहे. कॅरेबियाई संघाचा आत्मविश्वास डळमळीत झाला आहे. कॅप्टन निकोलस पूरन चिंतेमध्ये आहे. पूरनच्या चिंतेच कारण आहे भारताचा शेजारी बांगलादेश. वनडे सीरीज मध्ये बांगलादेशने पूरन अँड कंपनीला (WIvsBAL) त्याच्याच घरात पराभवाचा तडाखा दिला आहे. वेस्ट इंडिज आणि बांगलादेश मध्ये तीन वनडे सामन्यांची मालिका सुरु आहे. बांगलादेशच्या टीमकडे 2-0 अशी विजयी आघाडी आहे. 13 जुलैला दुसऱ्या वनडेत बांगलादेशने वेस्ट इंडिजवर 9 विकेटने मोठा विजय मिळवला. 16 जुलैला सीरीज मधला शेवटचा सामना खेळला जाईल.

तो चर्चेता विषय बनलाय

दुसरी वनडे जिंकून बांगलादेशने सीरीज जिंकली. पण ज्या वाईट पद्धतीने वेस्ट इंडिजला हरवलं तो चर्चेता विषय बनलाय. बांगलादेशने प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या वेस्ट इंडिजला 108 धावांवर रोखलं. त्यांना पूर्ण 50 षटकही खेळू दिलं नाही. 35 षटकात त्यांचा डाव संपवला. 108 ही वेस्ट इंडिजची आपल्याच घरातील सर्वात कमी धावसंख्या आहे.

दोन फिरकी गोलंदाजांची महत्त्वाची भूमिका

दुसऱ्या वनडेत वेस्ट इंडिजची इतकी खराब हालत करण्यामध्ये मेहदी हसन आणि नसुम अहमद या दोन फिरकी गोलंदाजांनी महत्त्वाची भूमिका आहे. हसनने चार आणि अहमदने तीन विकेट घेतल्या. बांगलादेशने 109 धावांचे लक्ष्य 21 षटकातच पार केलं.

खूप वाईट आणि कठीण दिवस होता

टीम इंडियाच्या दौऱ्याआधी वेस्ट इंडिजचा मायदेशात झालेला पराभव हे चांगले संकेत नाहीत. कॅप्टन निकोलस पूरन बोलताना हे दु:ख दिसून आलं. “खूप वाईट आणि कठीण दिवस होता. मला या बद्दल बोलायचं नाही. आमचे फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरलेत” अंस पूरन म्हणाला.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.