AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुस्तफिझुर रहमान भारतात आल्यास बांग्लादेश संघाला धोका! आयसीसीने बीसीबीला सांगितल्या या गोष्टी

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारतात खेळण्यास बांगलादेशने नकार दिला आहे. यासाठी वेगवेगळी कारणं बांग्लादेश क्रिकेट बोर्ड आयसीसीपुढे मांडत आहे. आता बांग्लादेशच्या क्रीडामंत्र्यांनी आश्चर्यकारक दावा केला आहे. भारतात बांग्लादेश संघाला धोका असल्याचं सांगितलं आहे.

मुस्तफिझुर रहमान भारतात आल्यास बांग्लादेश संघाला धोका! आयसीसीने बीसीबीला सांगितल्या या गोष्टी
मुस्तफिझुर रहमान भारतात आल्यास बांग्लादेश संघाला धोका! आयसीसीने बीसीबीला सांगितल्या या गोष्टीImage Credit source: PTI
| Updated on: Jan 12, 2026 | 9:37 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेची जोरदार तयारी सुरू आहे. भारत आणि श्रीलंका हे दोन्ही देश या स्पर्धेच्या यजमानपदासाठी सज्ज आहेत. पण बांग्लादेश क्रिकेट बोर्डाची नाटकं सुरु झाली आहेत. भारतात क्रिकेट खेळण्यास त्यांनी नकार दिला आहे. इतकंच काय तर आयसीसीपुढे गाऱ्हाणं घातलं आहे. भारतात क्रिकेट खेळणं धोक्याचं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. यासाठी वेगवेगळी कारण दिली जात आहेत. असं असताना बांग्लादेशी क्रीडामंत्र्यांनी धक्कादायक दावा केला आहे. बांगलादेशचे क्रीडामंत्री आसिफ नजरूल यांनी मीडियाशी बोलताना दावा केला की, आयसीसीच्या सुरक्षा टीमने आपलं म्हणणं बीसीबीसमोर ठेवलं आहे. त्यात आयसीसीने बांग्लादेश क्रिकेट बोर्डाला सांगितलं की, बांगलादेशी खेळाडूंसाठी सुरक्षेचा मुद्दा मोठा असणार आहे. खासकरू मुस्तफिझुर रहमाना भारतात आल्यानंतर हा प्रश्न आणखी चिघळेल. मंत्र्याने केलेल्या विधानानंतर मुस्तफिझुर रहमान भारतात आला तर बांगलादेशी संघ अडचणीत येऊ शकतो.

बांगलादेशी चाहत्यांनी जर्सी परिधान केली तर…

बांगलादेशच्या क्रीडामंत्र्यांनी केलेल्या दाव्यानुसार, सामना पाहण्यासाठी बांगलादेशी चाहतेही मैदानात हजेरी लावतील. पण त्यांनी जर्सी परिधान केली तर स्टेडियममध्ये काहीही होऊ शकते. निवडणुका जवळ असल्याने हा मोठा मुद्दा होऊ शकतो. सुरक्षेच्या दृष्टीने आयसीसीने बांग्लादेश क्रिकेट बोर्डासमोर प्रस्ताव ठेवला आहे. या प्रस्तावानुसार, बांगलादेशचे सामने चेन्नई किंवा तिरूवनंतपुरम येथे खेळले जातील. पण बांगलादेशच्या क्रीडा सल्लागारांनी हा प्रस्ताव मूर्खपणा असल्याचे सांगून फेटाळून लावला आहे. त्यामुळे नेमकं खरं कोण आणि खोटं कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दरम्यान, बांग्लादेश क्रीडामंत्र्यांनी केलेला दावा खोटा असल्याचं स्पष्ट झालं आहे. मिडिया रिपोर्टनुसार, आयसीसीने हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. या प्रकरणी आयसीसी लवकरच अधिकृत निवेदन जाहीर करण्याची अपेक्षा आहे. दुसरीकडे, बीसीसीआय बांगलादेशचे सर्व सामने कोलकाता आणि मुंबईहून विशाखापट्टणम आणि चेन्नईला शिफ्ट करू शकते. पण याबाबत स्पष्ट असं काहीच समोर आलेलं नाही. आता आयसीसी या प्रकरणी काय खुलासा करते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...