Team India: बीसीसीआयकडून बांग्लादेश-इंग्लंड विरूद्धच्या मालिकेसाठी मोठा निर्णय
Bcci Team India: बीसीसीआयने टीम इंडियाच्या 3 सामन्यांच्या ठिकाणात बदल केला आहे. बीसीसीआयने याबाबतची माहिती ही प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यानंतर आता विश्रांतीवर आहे. टीम इंडिया त्यानंतर आपली पुढील मालिका बांगलादेश विरुद्ध खेळणार आहे. टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश यांच्यात कसोटी आणि टी 20i मालिका होणार आहे.त्यासाठी बांगलादेश भारत दौऱ्यावर येणार आहे. त्यानंतर न्यूझीलंड भारत दौऱ्यावर येणार आहे. रोहितसेना त्यानंतर दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया दौरा करणार आहे. तर नववर्षात अर्थात 2025 मध्ये इंग्लंड भारत दौऱ्यावर येणार आहे. टीम इंडियाचं पुढील काही महिन्याचं शेड्यूल पॅक आहे. अशात बीसीसीआयने टीम इंडियाच्या मायदेशातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने 2024-2025 या वर्षांमध्ये भारतात होणार्या आंतरराष्ट्रीय सामन्यांचं सुधारित वेळापत्रक जाहीर केलं आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.
बीसीसीआयने टीम इंडियाच्या 3 सामन्यांच्या वेळापत्रकात बदल केला आहे. बीसीसीआयने बांगलादेश आणि इंग्लंड विरूद्धच्या सामन्यात बदल केला आहे. विशेष बाब म्हणजे इंडिया-बांगलादेश यांच्यात होणारा एक सामना हा नव्या स्टेडियममध्ये होणार आहे. टीम इंडिया-बांगलादेश यांच्यातील 2 सामन्यांची कसोटी मालिका नियोजित वेळापत्रकानुसारच होणार आहे. त्यानंतर उभयसंघात 3 मॅचची टी 20i सीरिज होणार आहे. या टी 20 मालिकेतील सलामीचा सामना 6 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या सामन्याचं ठिकाण बदलण्यात आलं आहे. हा सामना आता ग्वाल्हेर येथे होणार आहे जो आधी हिमाचल प्रदेश येथील धर्मशाला येथे आयोजित करण्यात आला होता. धर्मशालेतील स्टेडियममध्ये दुरूस्तीचं काम सुरु असल्याने ठिकाण बदलण्यात आल्याची माहिती बीसीसीआयने प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.
3 टी 20i सामन्यांचं ठिकाण बदललं
🚨 NEWS 🚨
BCCI issues revised schedule for international home season (2024-25).
All the details 🔽 #TeamIndia https://t.co/q67n4o7pfF
— BCCI (@BCCI) August 13, 2024
इंग्लंड भारत दौऱ्याची सुरुवात 5 सामन्यांच्या टी 20i मालिकेने करणार आहे. तर त्यानंतर 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार आहे. बीसीसीआयने इंग्लंड विरूद्धच्या पहिल्या 2 टी20i सामन्यांचं ठिकाण बदललं आहे. उभयसंघातील पहिला सामना हा 22 जानेवारी रोजी चेन्नईत होणार होता, मात्र आता कोलकातात आयोजित करण्यात आला आहे. तर चेन्नईत 25 जानेवारी रोजी होणारा दुसरा सामना हा चेन्नईत होणार आहे. कोलकाता पोलिसांनी 26 जानेवारीच्या (प्रजासत्ताक दिन) पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने सामन्याचं ठिकाण बदलण्याची मागणी केली होती. त्यानुसार ठिकाण बदललं असल्याचं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे.
