AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026: बीसीसीआयने DRSचा नियम बदलला, इतकंच काय तर संघांची चलाखी देखील होणार बंद!

आयपीएल 2026 स्पर्धेतील डीआरएस नियमात एक मोठा बदल करण्यात आला आहे. यापूर्वी अपील केलं की डीआरचा पूर्ण वापर व्हायचा. आता तसं शक्य नाही. कारण बीसीसीआयने त्यासाठी नियम तयार केला आहे.

IPL 2026: बीसीसीआयने DRSचा नियम बदलला, इतकंच काय तर संघांची चलाखी देखील होणार बंद!
IPL 2026: बीसीसीआयने DRSचा नियम बदलला, इतकंच काय तर संघांची चलाखी देखील होणार बंद!Image Credit source: PTI
| Updated on: Mar 30, 2026 | 5:43 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेतील दोन सामने पार पडले असून तिसरा सामन्याची तयारी सुरू आहे. असं असताना काही नियमांबाबत या स्पर्धेपूर्वी सांगण्यात आलं होतं. पण आता स्पर्धा सुरू झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यातील महत्त्वाचा बदल डीआरएसबाबत घेण्यात आला आहे. त्यामुळे संघांची अपील केल्यानंतर होणारी चालाखी टाळता येणार आहे. यापू्र्वीच्या पर्वात असं निदर्शनास आलं होतं. पण बीसीसीआयने या नियमात बदल करून चालाखीला चाप लावला आहे. आता डीआरएसची अपील ज्या निर्णयासाठी झाली तो निर्णय तपासला जाईल. यापूर्वी असं होत नव्हतं. तिसरा पंच निकाल देण्यापूर्वी सर्व बाजू तपासत होता. क्रिकबझच्या वृत्तानुसार, नवीन पर्व सुरू होण्यापूर्वी झालेल्या एका बैठकीत सर्व 10 कर्णधारांना या बदलाची माहिती देण्यात आली होती. नेमका बदल काय ते सविस्तर जाणून घेऊयात.

आयपीएल 2025 अर्थात मागच्या पर्वापर्यंत कर्णधार एखाद्या निर्णयासाठी डीआरएस घ्यायचा. त्यावेळी पंच सर्वच बाबी तपासून पाहायचे. जसं की झेलबाबत मैदानी नॉट आऊट दिलं आणि डीआरएस घेतला. त्यावेळी बॅटला बॉल लागला की नाही हे तपासताना वाईड बॉलही तपासला जायचा. पण आता क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने झेलसाठी अपील केलं असेल तर टीव्ही पंच फक्त तेवढंच तपासणार आहे. जर फलंदाजाला वाटलं की बॅटला चेंडू घासला नाही तर तो वाइडसाठी अपील करू शकतो. याबाबतीत त्याला अपील सुरूवातीच्या 15 सेकंदात करावं लागेल. टीव्ही पंचांनी निर्णय दिल्यानंतर दुसऱ्या अपीलसाठी अतिरिक्त 15 सेकंद मिळणार नाहीत.

डोक्याला दुखापत झाल्यास काय?

एखाद्या खेळाडूच्या डोक्याला दुखापत झाली तर बदली खेळाडू द्यायचा की नाही याबाबत निर्णय घेतला गेला. एखाद्या खेळाडूला बदलण्याची गरज भासल्यास, संघात त्याच्यासारख्याच दुसऱ्या खेळाडूचा समावेश केला जाईल. पण निवड ‘इम्पॅक्ट सब्स्टिट्यूट्स’ म्हणून निवडलेल्या त्याच पाच खेळाडूंमधून केली जाईल. यष्टीरक्षकाला बदलण्याची गरज भासल्यास, सामन्यासाठी निवडलेल्या संघातील एखाद्या खेळाडूवर जबाबदारी सोपवली जाईल. विदेशी खेळाडूला दुखापत झाल्यास संघातील प्लेइंग 11 मध्ये 3 विदेशी खेळाडू असल्यास त्याला जागा मिळेल. अन्यथा भारतीय खेळाडू मैदानात येईल.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...