IPL 2021 मध्ये कोरोनासी लढाईसाठी BCCI सज्ज, दररोज 31 सामन्यांदरम्यान 30 हजाराहून अधिक कोरोना टेस्ट, बायो-बबलचे नियम अनिवार्य

बहुचर्चित इंडियन प्रिमीयर लीग अर्थात IPL च्या उर्वरीत सामन्यांच वेळापत्रक काही महिन्यांपूर्वी जाहीर झालं. पहिल्या पर्वाप्रमाणे या पर्वात कोरोनाच्या संकटामुळे कडक नियम असणार आहेत.

IPL 2021 मध्ये कोरोनासी लढाईसाठी BCCI सज्ज, दररोज 31 सामन्यांदरम्यान 30 हजाराहून अधिक कोरोना टेस्ट, बायो-बबलचे नियम अनिवार्य
IPL 2021

मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे मध्ये स्थगित झालेली इंडियन प्रिमीयर लीग आता 19 सप्टेंबरपासून पुन्हा सुरु होणार आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाकडून (BCCI) युएईमध्ये होणाऱ्या या आयपीएलच्या उर्वरीत सामन्यांची (IPL 2021) संपूर्ण तयारी झाली आहे. पुन्हा कोरोनाचं संकट उभं ठाकू नये यासाठी 31 सामन्यांच्या या पर्वात खेळाडू, सपोर्ट स्टाफ अशा सर्वांच्या मिळून तब्बल 30 हजारांहून अधिक RT-PCR टेस्ट करण्यात येणार आहेत. यासाठी दुबईतील एक कंपनी वीपीएस हेल्थकेअरला संपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे.  या कंपनीला स्पर्धेदरम्यान खेळाडूंची सर्व तपासणी आणि काळजी घेण्याचं तसंच हवाई रुग्णवाहिकेपासून सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा पुरवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

आयपीएलच्या दुसऱ्या पर्वात प्रत्येक तिसऱ्या दिवशी RT-PCR टेस्ट करवण्यात येणार आहे. मागील वेळी 2020 साली युएईमध्ये स्पर्धा घेण्यात आली होती तेव्हा में दर पाचव्या दिवशी RT-PCR टेस्ट करण्यात येत होती. आता मात्र दर तिसऱ्या दिवशी टेस्ट होईल.  19 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर दरम्यान पार पडणाऱ्या या स्पर्धेसाठी प्रत्येक संघात खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ तसंच इतर गरजांसाठीचे सदस्य पकडून 100 च्या जवळपास व्यक्तींची संख्या असते. या सर्वांची काळजी घेण्यासाठी प्रत्येक सामन्यादरम्यान मैदानात दोन मेडिकल टीम असणार आहेत. यामध्ये डॉक्टर, नर्स, पॅरामेडिक्स आणि  लॅब टेक्निशियन यांचा समावेश असेल.

उर्वरीत आयपीएलचे संपूर्ण वेळापत्रक

19 सप्टेंबर – मुंबई इंडियन्स VS चेन्नई सुपर किंग्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई
20 सप्टेंबर – कोलकाता नाइट रायडर्स VS रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – अबू धाबी
21 सप्टेंबर – पंजाब किंग्स VS राजस्थान रॉयल्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई
22 सप्टेंबर – दिल्ली कॅपिटल्स VS सनरायझर्स हैदराबाद, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई
23 सप्टेंबर – मुंबई इंडियन्स VS कोलकाता नाइट रायडर्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – अबू धाबी
24 सप्टेंबर – रॉयल चँलेंजर्स बंगळुरू VS चेन्नई सुपर किंग्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – शाहजाह
25 सप्टेंबर – दिल्ली कॅपिटल्स VS राजस्थान रॉयल्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून – अबू धाबी
25 सप्टेंबर – सनयारझर्स हैदराबाद VS पंजाब किंग्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – शाहजाह
26 सप्टेंबर – चेन्नई सुपर किंग्स VS कोलकाता नाईट रायडर्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून – अबू धाबी
26 सप्टेंबर – पंजाब किंग्स VS मुंबई इंडियन्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई
27 सप्टेंबर- सनरायझर्स हैदराबाद VS राजस्थान रॉयल्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई
28 सप्टेंबर – कोलकाता नाइट रायडर्स VS दिल्ली कॅपिटल्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून – शारजाह
28 सप्टेंबर – मुंबई इंडियन्स VS पंजाब किंग्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – अबू धाबी
29 सप्टेंबर – राजस्थान रॉयल्स VS रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई
30 सप्टेंबर – सनरायझर्स हैदराबाद VS चेन्नई सुपर किंग्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – शारजाह
1 ऑक्टोबर – कोलकाता नाइट रायडर्स VS पंजाब किंग्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई
2 ऑक्टोबर – मुंबई इंडियन्स VS दिल्ली कॅपिटल्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून – शारजाह
2 ऑक्टोबर – राजस्थान रॉयल्स VS चेन्नई सुपर किंग्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – अबू धाबी
3 ऑक्टोबर – पंजाब किंग्स VS रॉयल चँलेंजर्स बंगळुरू, दुपारी 3.30 वाजल्यापासून – शारजाह
3 ऑक्टोबर – कोलकाता नाइट रायडर्स VS सनरायझर्स हैदराबाद, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई
4 ऑक्टोबर – दिल्ली कॅपिटल्स VS चेन्नई सुपर किंग्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई
5 ऑक्टोबर – मुंबई इंडियन्स VS राजस्थान रॉयल्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – शारजाह
6 ऑक्टोबर – रॉयल चँलेंजर्स बंगळुरू VS सनरायझर्स हैदराबाद, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – अबू धाबी
7 ऑक्टोबर – चेन्नई सुपर किंग्स VS पंजाब किंग्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून – दुबई
7 ऑक्टोबर – कोलकाता नाइट रायडर्स VS राजस्थान रॉयल्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – शारजाह
8 ऑक्टोबर – सनरायझर्स हैदराबाद VS मुंबई इंडियन्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून – अबू धाबी
8 ऑक्टोबर – रॉयल चँलेंजर्स बंगळुरू VS दिल्ली कॅपिटल्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई
10 ऑक्टोबर – क्वालिफायर, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई
11 ऑक्टोबर – एलिमिनेटर, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – शारजाह
13 ऑक्टोबर – क्वालिफायर 2, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – शारजाह
15 ऑक्टोबर- अंतिम सामना, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई

हे ही वाचा

IPL 2021 : आयपीएलच्या उर्वरीत पर्वामध्ये 9 खेळाडूंची अदला-बदली, वाचा सगळे बदल एका क्लिकवर

IPL 2021 : चेन्नईचा स्टार क्रिकेटर सुरेश रैना म्हणतो, मी JOHN CENA, पाहा रैनाचा WWE स्टंट

IPL 2021 : आरसीबी संघाला मोठा झटका, दुखापतीमुळे धाकड खेळाडू संघाबाहेर, बदली खेळाडू म्हणून ‘या’ युवा खेळाडूची निवड

(BCCI Will take 30000 rtpcr tests in IPL 2021 at UAE to prevent Corona Virus)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI