भुवनेश्वर कुमार विराट कोहलीला म्हणाला ‘म्हातारा’, आयपीएल फायनलपूर्वी Video व्हायरल

आयपीएल 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने धडक मारली आहे. सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. या यशात गोलंदाजीचं योगदान फार मोठं आहे. असं असताना वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने विराट कोहलीचा उल्लेख म्हातारा असा केला. नेमकं काय घडलं?

भुवनेश्वर कुमार विराट कोहलीला म्हणाला म्हातारा, आयपीएल फायनलपूर्वी Video व्हायरल
भुवनेश्वर कुमार विराट कोहलीला म्हणाला 'म्हातारा', आयपीएल फायनलपूर्वी Video व्हायरल
Image Credit source: PTI
| Updated on: May 28, 2026 | 10:20 PM

आयपीएल 2026 स्पर्धेत भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीला चांगलीच धार चढली आहे. त्याने आपल्या अनुभवाच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघांना गोत्यात आणलं आहे. भुवनेश्वर कुमारने आरसीबीसाठी चांगली कामगिरी केली आहे. त्याने 15 सामन्यात 26 विकेट घेतल्या आहेत. तर फक्त 8 च्या इकोनॉमी रेटने धावा दिल्या आहे. भुवनेश्वर कुमार नव्या आणि जुन्या चेंडूसह विकेट मिळवण्यात तरबेज आहे. त्याच्या याच कामगिरीमुळे आरसीबीला अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास करता आला. अंतिम फेरीपूर्वी त्याने 26 गडी बाद करत पर्पल कॅप मिळवली आहे. त्याने अंतिम फेरीत दोन तीन विकेट घेतल्या तर पर्पल कॅपचा मानकरी ठरू शकतो. असं असताना भुवनेश्वर कुमारचं एक विधान सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याने विराट कोहलीला म्हातारा म्हंटलं आणि बघता बघता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भुवनेश्वर कुमारने विराट कोहलीचा म्हातारा असा उल्लेख का केला? नेमकं काय घडलं हे सविस्तर जाणून घेऊयात..

भुवनेश्वर कुमारने विराटला म्हातारा का म्हणाला?

भुवनेश्वर कुमारने विराट कोहलीवर आरसीबीच्या एक व्हिडीओत ही कमेंट केली. या व्हिडीओत अँकरने भुवनेश्वर कुमारला विचारलं की, सर्व जण सांगत आहेत की तू तुझ्या वयाच्या हिशेबाने खूपच चांगली कामगिरी करत आहे. तुला काय वाटतं की तू म्हातारा झाला आहेस का? त्यावर भुवनेश्वर कुमारने ‘नाही’ असं उत्तर दिलं. त्यानंतर अँकर त्या प्रश्नाची री ओढत पुन्हा प्रश्न केला की, तू विराट कोहलीच्या वयाचा आहेस ना? त्यावर भुवनेश्वर कुमारने सांगितलं की, ‘हो.. विराट कोहली कदाचित म्हातारा झाला आहे. मी नाही.’ भुवनेश्वर कुमारचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

विराट कोहलीची बॅट तळपली

विराट कोहलीने या पर्वातही 600 धावांचा पल्ला गाठत विक्रमाला गवसणी घातली. चार पर्वात 600 धावांचा पल्ला गाठणारा एकमेव फलंदाज ठरला आहे. विराट कोहलीने 15 सामन्यात 50 च्या सरासरीने 600 धावा केल्या आहेत. त्याने 160हून अधिकच्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. यात 1 शतक आणि 4 अर्धशतकांचा समावेश आहे. आता अंतिम फेरीत विराट कोहलीची बॅट आणि भुवनेश्वर कुमारची गोलंदाजी चालली तर आरसीबी दुसऱ्यांदा जेतेपदाला गवसणी घालू शकते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us