AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयपीएल स्पर्धेत क्वॉलिफायर 1, क्वॉलिफायर2 आणि एलिमिनेटर संघापैकी कोण सर्वाधिक चॅम्पियन? जाणून घ्या

आयपीएल 2026 स्पर्धेतील फक्त दोन सामन्यांचा खेळ शिल्लक आहे. क्वॉलिफायर 2 आणि अंतिम सामना अशा लढती आहे. पण आतापर्यंत आयपीएल इतिहासात जेतेपदाच्या लढतीत कोणी बाजी मारली आहे? क्वॉलिफायर 1, क्वॉलिफायर 2 की एलिमिनेटर फेरीतील संघाने... चला जाणून घेऊयात.

आयपीएल स्पर्धेत क्वॉलिफायर 1, क्वॉलिफायर2 आणि एलिमिनेटर संघापैकी कोण सर्वाधिक चॅम्पियन? जाणून घ्या
| Updated on: May 28, 2026 | 9:43 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने एन्ट्री मारली आहे. क्वॉलिफायर 1 सामन्यात गुजरात टायटन्सला पराभूत केलं आणि अंतिम फेरीत धडक मारली. तर एलिमिनिटेर फेरीत राजस्थान रॉयल्सने सनरायझर्स हैदराबादचा धुव्वा उडवला आणि क्वॉलिफायर 2 फेरीत एन्ट्री मारली आहे. आता क्वॉलिफायर 2 फेरीत राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात लढत होणार आहे. असं असताना आयपीएलच्या इतिहासात क्वॉलिफायर 1, क्वॉलिफायर 2 आणि एलिमिनेटर फेरीतील किती संघांनी जेतेपद पटकावलं आहे, असा प्रश्न आहे. आतापर्यंत 8 वेगवेगळ्या फ्रेंचायझींनी 18 पर्वात जेतेपद पटकावलं आहे. यात चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्सने प्रत्येकी 5 जेतेपदांवर नाव कोरलं आहे. केकेआरने तीनवेळा जेतपद पटकावलं आहे. तर राजस्थान रॉयल्स, डेक्कन चार्जर्स, सनरायझर्स हैदराबाद, गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्सं बंगळुरू यांनी प्रत्येकी एकदा जेतेपदाला गवसणी घातली आहे. चला जाणून घेऊयात क्वॉलिफायर 1, क्वॉलिफायर 2 आणि एलिमिनेटर जेतेपदाची आकडेवारी

क्वॉलिफायर 1

क्वॉलिफायर 1 मध्ये विजयी झालेल्या संघाने आतापर्यंत 12 वेळा जेतेपदाला गवसणी घातली आहे. पाच संघांनी ही किमया केली आहे. चेन्नई सुपर किंग्सने 2011, 2018, 2021 आणि 2023 मध्ये जेतेपद मिळवलं आहे. त्यानंतर मुंबई इंडियन्सने 2015, 2019, 2020 मध्ये जेतेपद पटकावलं आहे. केकेआरने 2012, 2014, 2024 मध्ये जेतेपदाला गवसणी घातली आहे. तर गुजरात टायटन्सने 2022 आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 2025 मध्ये जेतेपद मिळवलं आहे. तर 2008, 2009 आणि 2019 मध्ये सेमी फायनल पॅटर्न होता. त्यामुळे त्याची गणना नाही.

क्वॉलिफायर 2

क्वॉलिफायर 1 मध्ये पराभूत झाल्यानंतर क्वॉलिफायर 2 मध्ये विजय मिळवून जेतेपद फक्त एका संघाने पटकावलं आहे. मुंबई इंडियन्सने ही कामगिरी 2013 आणि 2017 मध्ये केली आहे. क्वॉलिफायर 1 मध्ये पराभूत झाल्यानतंर मुंबई इंडियन्सने कमबॅक केलं आणि जेतेपदाला गवसणी घातली. 2013 मध्ये मुंबई इंडियन्सला क्वॉलिफायर 1 मध्ये चेन्नईने पराभूत केलं. त्यानंतर मुंबईने क्वॉलिफायर 2 मध्ये राजस्थान रॉयल्सला पराभूत केलं आणि अंतिम फेरी गाठली. चेन्नईला पराभूत करून जेतेपद पटकावलं. तर 2017 मध्ये क्वॉलिफायर 1 मध्ये पुणे रायझिंग सुपरजायंट्सकडून पराभव, क्वॉलिफायर 2 मध्ये केकेआरला नमवून अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत मुंबईने पुण्याला पराभूत केलं आणि जेतेपद पटकावलं.

एलिमिनेटर

एलिमिनेटर फेरीत स्थान मिळवून जेतेपद पटकवण्याची किमया आयपीएल इतिहासात फक्त एकदाच घडली आहे. सनरायझर्स हैदराबादने ही किमया केली आहे. 2016 मध्ये एलिमिनेटर फेरीत कोलकाता नाईट रायडर्सला 22 धावांनी नमवलं. क्वॉलिफायर 2 मध्ये गुजरात लायचन्ला 4 विकेटने पराभूत केलं आणि अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला 8 धावांनी पराभूत केलं आणि जेतेपदावर नाव कोरलं. बाद फेरीत सलग तीन सामने जिंकून जेतेपद पटकावणारा सनरायझर्स हैदराबाद एकमेव संघ आहे.

Follow Us
कोस्टल रोडवर भीषण अपघात! प्रचंड धूर... एका पाठोपाठ एक गाड्या उलट दिशेन
Video | कोस्टल रोडवर भीषण अपघात! प्रचंड धूर... एका पाठोपाठ एक गाड्या उलट दिशेने... पहा व्हिडीओ
हे तुम्हाला CCTVमध्ये... शिंदेंच्या दालनातील शरद पवारांच्या बैठकीबबात
हे तुम्हाला CCTVमध्ये... शिंदेंच्या दालनातील शरद पवारांच्या बैठकीबबात सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा
डिलिमिटेशन बिलाबाबात मोठा ट्विस्ट! सुप्रिया सुळेंनी पत्रकार परिषद घेत
डिलिमिटेशन बिलाबाबात मोठा ट्विस्ट! सुप्रिया सुळेंनी पत्रकार परिषद घेत सांगितली पक्षाची भूमिका?
आषाढी वारी पंढरपूरात येण्याआधी मोठा बदल; पंढरपुर देवस्थानाचा थेट
आषाढी वारी पंढरपूरात येण्याआधी मोठा बदल; पंढरपुर देवस्थानाचा थेट निर्णय, आतापासून...
शिवसेना ठाकरे गटदेखील डिलिमीटेशन विधेयकाला पाठिंबा देणार? संजय राऊत
Sanjay Raut | शिवसेना ठाकरे गटदेखील डिलिमीटेशन विधेयकाला पाठिंबा देणार? संजय राऊत काय म्हणाले?
वर्षा बंगल्यावर रात्रीच्या भेटीत नेमकं काय घडलं? जयंत पाटलांनी सांगितल
वर्षा बंगल्यावर रात्रीच्या भेटीत नेमकं काय घडलं? जयंत पाटलांनी सांगितली A टू Z माहिती
डिलिमीटेशन विधेयकाबाबत मोठी अपडेट! भाजपचा मोठा डाव? 'त्या' एका अटीवर
डिलिमीटेशन विधेयकाबाबत मोठी अपडेट! भाजपचा मोठा डाव? 'त्या' एका अटीवर विरोधकांचा मिळणार पाठिंबा, एकाऐकी काय घडलं?
ठाकरेंचे फुटीर खासदार अन् अमित शाहांच्या भेटीची इन्साइड स्टोरी; सुमारे
ठाकरेंचे फुटीर खासदार अन् अमित शाहांच्या भेटीची इन्साइड स्टोरी; सुमारे 50 मिनिटांच्या बैठकीत...
शरद पवार अखेरचा पत्ता कधी उघडणार? जयंत पाटील-तटकरे आणि मुख्यमंत्र्यांच
शरद पवार अखेरचा पत्ता कधी उघडणार? जयंत पाटील-तटकरे आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नेमकं काय ठरलं?
राज्याच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल? बड्या मंत्र्याची जागी मुंडेंना
राज्याच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल? बड्या मंत्र्याची जागा घेणार धनंजय मुंडे?
Supriya Sule: डिलिमिटेशनचा राज्याला’महा’फायदा? 50 टक्के फॉर्म्युल्याने किती जागा वाढणार? सुप्रिया सुळेंकडून महाराष्ट्रातील खासदारकीचे गणित घ्या समजून.

Supriya Sule: डिलिमिटेशनचा राज्याला’महा’फायदा? 50 टक्के फॉर्म्युल्याने किती जागा वाढणार? सुप्रिया सुळेंकडून महाराष्ट्रातील खासदारकीचे गणित घ्या समजून

Coastal Raod Accident : कोस्टलरोडमध्ये भीषण अपघात, बोगद्यात कारच पेटली, शेकडो गाड्या अडकल्या; मोठी खळबळ.

Coastal Raod Accident : कोस्टलरोडमध्ये भीषण अपघात, बोगद्यात कारच पेटली, शेकडो गाड्या अडकल्या; मोठी खळबळ

तुकाराम मुंढेंच्या कारवाईनंतर श्रेयस तळपदेचा मोठा निर्णय; खाद्यपदार्थांमधील भेसळीचा घेतला धसका!.

तुकाराम मुंढेंच्या कारवाईनंतर श्रेयस तळपदेचा मोठा निर्णय; खाद्यपदार्थांमधील भेसळीचा घेतला धसका!

Soft Roti: चपात्या तव्यावरून काढताच कडक किंवा वातड होतात? ना मिठ, ना पाणी कणिक मळतानाच ‘हे’ दोन पदार्थ मिसळा.

Soft Roti: चपात्या तव्यावरून काढताच कडक किंवा वातड होतात? ना मिठ, ना पाणी कणिक मळतानाच ‘हे’ दोन पदार्थ मिसळा

Ladki Bahin Yojana: आता लाडकी बहीण योजनेची… सुप्रिया सुळे यांची मोठी मागणी; राज्य सरकार काय निर्णय घेणार?.

Ladki Bahin Yojana: आता लाडकी बहीण योजनेची… सुप्रिया सुळे यांची मोठी मागणी; राज्य सरकार काय निर्णय घेणार?

Aamir Khan Third Marriage : आमिर खानच्या तिसऱ्या लग्नावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर का झुकणार नाही? नितेश राणेंकडून त्या बद्दल खुलासा.

Aamir Khan Third Marriage : आमिर खानच्या तिसऱ्या लग्नावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर का झुकणार नाही? नितेश राणेंकडून त्या बद्दल खुलासा