सामना सुरु असताना कर्णधार मैदानात कोसळली, स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर घेऊन जाण्याची वेळ Video
वुमन्स वर्ल्डकप 2025 स्पर्धेच्या 12वा सामना इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात होत आहे. इंग्लंडने श्रीलंकेसमोर विजयासाठी 253 धावांचं आव्हान ठेवलं आहे. या धावांचा पाठलाग करताना एक विचित्र प्रकार मैदानात घडला. कर्णधाराला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आलं.

वुमन्स वनडे वर्ल्डकप 2025 स्पर्धेतल्या 12व्या सामन्यात इंग्लंड आणि श्रीलंका आमनेसामने आले. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर श्रीलंकेने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. इंग्लंडने 50 षटकात 9 गडी गमवून 253 धावा केल्या आणि विजयासाठी 254 धावांचं आव्हान दिलं. या धावांचा पाठलाग करण्यासाठी श्रीलंकेचा कर्णधार अटापट्टू आणि हसिनी परेरा मैदानात उतरले.सामना जिंकण्यासाठी श्रीलंकेला त्यांच्या कर्णधाराकडून मोठी खेळी आवश्यक होती. कारण श्रीलंकेने आतापर्यंत एकही सामना जिंकलेला नाही. मिळालेला एक गुणदेखील पावसामुळे सामना रद्द झाल्याने मिळाला. त्यामुळे स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी सामना जिंकणं भाग आहे. पण अटापट्टू फलंदाजीने मोठा प्रभाव पाडण्यापूर्वीच तिला दुखापत झाली. इतकंच काय तर ती मैदानात जमिनीवर पडली. त्यामुळे तिला मैदान सोडावे लागले. तिला चालणेही कठीण झाले आणि तिला स्ट्रेचरच्या मदतीने मैदानाबाहेर नेण्यात आले.
श्रीलंकेच्या डावाच्या सहाव्या षटकात हा प्रकार घडला. फिरकी गोलंदाज लिन्सी स्मिथने षटकाचा तिसरा चेंडू टाकला. अटापट्टूने मिड विकेटच्या दिशेने चेंडू तटावला आणि धावली. पण धावताना तिला वेदना जाणवू लागल्या. नॉन-स्ट्राइक एंडवर पोहोचताच तिने बॅट फेकली आणि जमिनीवर कोसळली. तिची स्थिती पाहून हसिनी परेरा, इंग्लंडचे खेळाडू आणि पंचांनी धाव घेतली. श्रीलंकेच्या संघाचे फिजिओ देखील त्यांच्या कर्णधाराची तपासणी करण्यासाठी तात्काळ पोहोचले. तिची स्थिती पाहून तिला मैदानाबाहेर नेण्याचा निर्णय घेतला. पण चालताही येत नसल्याने अखेर तिला स्ट्रेचवरून नेलं. यामुळे काही काळ सामना थांबवावा लागला.
View this post on Instagram
श्रीलंकेची धावसंख्या 18 होती आणि अट्टापट्टू 7 धाावंवर खेळत होती. तेव्हा प्रकार घडला. अटापट्टूची दुखापत गंभीर नव्हती. श्रीलंकेच्या वैद्यकीय पथकाने तिला त्वरित बरे केले आणि 23 व्या षटकात संघाने तिसरी विकेट गमावली तेव्हा अटापट्टू पुन्हा क्रीजवर आला. पण संघाची नाजूक स्थिती पाहून चमारी अट्टापट्टू पुन्हा मैदानात उतरली. पण तिला काही खास करता आलं नाही. 39 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने 15 धावा करून बाद झाली. सोफी एक्सलस्टोनने तिचा त्रिफळा उडवला.
