AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GT vs PBKS : विजयाच्या आनंदात खेळाडूंनी मिठी मारली, त्याचवेळी शुभमनने…त्याच्याकडून अशी अपेक्षा अजिबात नव्हती

GT vs PBKS : अहमदाबाद येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने 199 धावा केल्या. स्वत: कॅप्टन शुभमन गिल 89 धावांची शानदार इनिंग खेळला. या सीजनमधील त्याच हे पहिलं अर्धशतक आहे. त्याने इतकी दमदार बॅटिंग करुनही गुजरातच्या टीमला होम ग्राऊंडवर विजय मिळवता आला नाही.

GT vs PBKS : विजयाच्या आनंदात खेळाडूंनी मिठी मारली, त्याचवेळी शुभमनने...त्याच्याकडून अशी अपेक्षा अजिबात नव्हती
shubman gill Image Credit source: AFP
| Updated on: Apr 05, 2024 | 8:37 AM
Share

शुभमन गिल आयपीएलमध्ये पहिल्यांदा नेतृत्व करतोय. हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सकडे गेल्यानंतर गुजरात टायटन्सने शुभमन गिलला कॅप्टन बनवलं. आयपीएल 2024 मध्ये शुभमन गिलने कॅप्टनशिप डेब्यु केलाय. या सीजनमध्ये त्याच्या बॅटिंग बरोबर, तो कॅप्टनशिप कशी करतो? यावरही सगळ्यांची नजर असेल. कारण भविष्यातील टीम इंडियाचा लीडर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातय. त्याच्या नेतृत्वाखाली टीम कसं प्रदर्शन करते? हे सुद्धा सगळ्यांना पहायच आहे. पण एक कॅप्टन म्हणून त्याच वर्तन कस आहे? कसे निर्णय घेतो? त्याचा एटीट्यूड कसा आहे? यावर जास्त लक्ष असेल. पंजाब किंग्स विरुद्ध सामन्यात त्याने असं काही केलं, की लोकांना धक्का बसला. कदाचित कोणी शुभमन गिलकडून अशी अपेक्षा केली असेल.

आयपीएल 2024 मध्ये शुभमनच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने सुरुवातीचे 3 पैकी 2 सामने जिंकले होते. हे दोन्ही विजय अहमदाबादमध्ये घरच्या मैदानावर मिळवले होते. 4 एप्रिलला काल घरच्या मैदानात गुजरातचा सामना पंजाब किंग्स विरुद्ध झाला. या मॅचमध्ये गुजरातने पहिली बॅटिंग करताना 199 धावा केल्या. स्वत: गिलने 89 धावांची शानदार इनिंग खेळली. पंजाबचे 70 रन्सवर 4 विकेट गेले होते. मात्र, तरीही अखेरीस पंजाबने गुजरातवर विजय मिळवला.

शशांक सिंह विजयाचा नायक

टायटन्सची फिल्डिंग आणि पंजाबचा फलंदाज शशांक सिहं गुजरातच्या पराभवाला कारण ठरले. शशांकने 29 चेंडूत 61 धावा चोपल्या. पंजाबने विजयी धाव काढली, तेव्हा शशांक सिंह स्ट्राइकवर होता. पंजाबला 2 चेंडूत विजयासाठी 1 रन्सची आवश्यकता होती. दर्शन नालकंडेच्या चेंडूवर शशांकच्या पॅडला लागून चेंडू मागे गेला. त्यावर 1 धाव घेत त्याने विजयी सेलिब्रेशन केलं. पंजाबच्या पूर्ण डगआऊट एरियामध्ये विजयी सेलिब्रेशन सुरु झालं. दुसऱ्याबाजूला गुजरातचे प्लेयर पराभवामुळे निराश झाले. त्यावेळी गिलने असं काही केलं की, ज्याची त्याच्याकडून अजिबात अपेक्षा नव्हती.

गिलने नियमाच्या हिशोबाने काही चुकीच केलं नाही, पण….

पंजाबचे खेळाडू विजयाच्या आनंदात परस्परांची गळाभेट घेत होते, त्याचवेळी गिलने DRS घेऊन सर्वांना धक्का दिला. अचानक पंजाबच्या विजयाची अधिकृत घोषणा थांबली. प्रत्येकाच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. गिलने हा रिव्यू LBW साठी घेतला होता. कारण चेंडू पॅडला लागला होता. तसं पाहिल्यास गिलने काही चुकीच केलं नाही. पण त्याच्या या निर्णयावर प्रश्न यासाठी उपस्थित करण्यात आला, कारण गोलंदाज, विकेटकीपर आणि स्वत: गिलला सुद्धा माहित होतं की, चेंडू शशांकच्या पॅडला लेग स्टम्पच्या खूप बाहेर लागलाय. त्यामुळे तो LBW बाद होणार नाही. मात्र, तरीही गिलने जाणूनबुजून रिव्यू घेतला. जेणेकरुन पंजाबच्या विजयात बाधा उत्पन्न होईल. गिलने नियमाच्या हिशोबाने काही चुकीच केलं नाही, तो त्याचा अधिकार आहे. पण खेळ भावनेच्या दृष्टीने या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण होतं.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.